AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sharad Pawar: जगामध्ये जिथे-जिथे हुकुमशाही आली, ती लयास गेली; सत्तेचा गैरवापर करणाऱ्यांना शरद पवारांचा सबूरीचा सल्ला; विधानसभेसाठी महत्त्वाचा निर्णय

नागपूर: जगामध्ये जिथे-जिथे हुकुमशाही (Dictatorship) आली, ती लयास गेली. श्रीलंकेत राष्ट्रपतींच्या घरात सामान्य लोकं घुसली आणि सत्ताधारी कुटुंबं देशाबाहेर निघून गेली. त्यामुळे सत्तेचा गैरवापर कुणी करत असेल तर लोकं त्याविरोधात आवाज उठवतात, हे श्रीलंकेत दिसून आले असा इशारा देतानाच भारतातही जे काही घडत आहे, त्याची चिंता न करता आपण एकसंध राहिले पाहिजे असे आवाहन राष्ट्रवादी […]

Sharad Pawar: जगामध्ये जिथे-जिथे हुकुमशाही आली, ती लयास गेली; सत्तेचा गैरवापर करणाऱ्यांना शरद पवारांचा सबूरीचा सल्ला; विधानसभेसाठी महत्त्वाचा निर्णय
| Updated on: Jul 15, 2022 | 8:59 PM
Share

नागपूर: जगामध्ये जिथे-जिथे हुकुमशाही (Dictatorship) आली, ती लयास गेली. श्रीलंकेत राष्ट्रपतींच्या घरात सामान्य लोकं घुसली आणि सत्ताधारी कुटुंबं देशाबाहेर निघून गेली. त्यामुळे सत्तेचा गैरवापर कुणी करत असेल तर लोकं त्याविरोधात आवाज उठवतात, हे श्रीलंकेत दिसून आले असा इशारा देतानाच भारतातही जे काही घडत आहे, त्याची चिंता न करता आपण एकसंध राहिले पाहिजे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (NCP Leader Sharad PAwar) यांनी नागपूर (Nagpur) येथे केले. लोकशाही टिकवण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला आदर्श घालून दिला आहे. हा आदर्श टिकवण्यासाठी आपल्याला एका जबरदस्त संघटनेची आवश्यता आहे आणि ती संघटना राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचा आत्मविश्वासही शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना दिला.

आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नागपूर येथील कार्यकर्ता मेळाव्यास उपस्थित राहून शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले.

केंद्रसरकारच्या हुकुमशाही विरोधात

आम्ही केंद्रसरकारच्या हुकुमशाही विरोधात सातत्याने आवाज उठवत आहोत. त्याची जबरदस्त किंमत आमच्या नवाब मलिक व अनिल देशमुख या दोन सहकाऱ्यांना मोजावी लागली आहे. असे सांगतानाच शरद पवार यांनी आज ज्यांच्या हातात देशाची सत्ता आहे, त्यांनी सत्ता केंद्रीत करुन विरोधी पक्षांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू केला असल्याचा आरोपही त्यांच्याकडून करण्यात आला.

अधिकारांचा गैरवापर

मध्यप्रदेशमध्ये कमलनाथ यांचे राज्य पाडून भाजपचे राज्य आणले. कर्नाटकातदेखील आमिषे दाखवून काँग्रेसचे सरकार घालवले. त्यानंतर महाराष्ट्रात शिवसेनेचे काही लोक हाताशी धरून राज्यात चांगले काम करणारे सरकार बाजूला केले. आज ठिकाठिकाणी अधिकारांचा गैरवापर केला जातो आहे. दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. पण हे जास्त काळ चालणार नाही असा स्पष्ट इशाराही शरद पवार यांनी भाजपला दिला.

खासदारांसाठी अध्यादेश काढला

आज दिल्लीत खासदारांसाठी एक अध्यादेश काढण्यात आला आहे. संसदेत काम करत असताना सभागृहात जर खासदारांचे म्हणणे सरकारने ऐकले नाही तर खासदार पुन्हा-पुन्हा आपली बाजू मांडतात. सरकारने लक्ष दिले नाही तर खासदार सभात्याग करुन, बाहेर जाऊन महात्मा गांधीजींच्या पुतळ्यासमोर निषेध आंदोलन करतात. हा खासदारांचा लोकशाहीतील अधिकार आहे. पण आता खासदारांना संसदेच्या आवारातही आंदोलन आणि घोषणाबाजी करण्यास बंधन घालण्यात आले आहे याबाबत शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली.

आपली शक्ती मर्यादित होती

विदर्भात आणि विशेषतः नागपूर शहरात आपली शक्ती मर्यादित होती. यासाठी अनिल देशमुख आणि इतर सहकारी प्रयत्न करत होते. पण दुर्दैवाने त्यांच्यावरच संकट आले. तरीही शहराध्यक्ष, जिल्हाध्यक्ष यांनी ही जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आणि पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी त्यांना साथ दिली. त्यामुळे इथे पक्षाचे चित्र नक्कीच सुधारेल असा विश्वासही शरद पवार यांनी व्यक्त केला.

अधिक जागा लढविण्यासंबंधी चर्चा

मागच्या वेळी आपण कमी जागा लढविल्या होत्या, यावेळी अधिक जागा लढविण्यासंबंधी स्थानिक नेत्यांनी बसून चर्चा करावी. तुमचा जो निर्णय असेल त्याला पक्ष पाठिंबा देईल. पक्षाचा पाया मजबूत करायचा असेल तर विधानसभा निवडणुकीला इथे सामोरे जावेच लागेल असेही शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले.

इथला माणूस गरीब असेल पण तो लाचार नाही

नागपूरमध्ये आज भाजपचे वर्चस्व वाढले असले तरी खऱ्या अर्थाने नागपूरच्या लोकांची मानसिकता ही पुरोगामी मानसिकता आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांविरोधात लढा देण्यासाठी काँग्रेसच्या नागपूरमधील अधिवेशनात ठराव झाला होता. महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू त्या अधिवेशनास उपस्थित होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीदेखील धर्म परिवर्तनाचा महत्त्वाचा निकाल याच नागपूर शहरात घेतला. त्यामुळे नागपूर शहर हे ऐतिहासिक निर्णय घेण्यासाठी प्रसिद्ध आहे. इथला माणूस गरीब असेल पण तो लाचार नाही. तो एकत्र आला तर अन्यायाच्या विरोधात पेटून उठतो आणि चित्र पालटतो. त्यामुळे आज सबंध राज्य व देशात सत्तेचा गैरवापर होत असताना याविरोधात संघर्ष करण्यासाठी नागपूर कधीही मागेपुढे पाहणार नाही, असा विश्वास शरद पवार यांनी यावेळी व्यक्त केला.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.