शिवछत्रपती पुरस्कार, 8 गोल्ड मेडल, तरीही करावं लागतंय पेट्रोल पंपावर काम, प्रवीण वाहलेंच्या व्यथा सरकार जाणून घेणार ?

| Updated on: Aug 21, 2021 | 5:18 PM

नागपुरातील प्रवीण वाहले या खेळाडूला आट्या-पाट्या या खेळात 2006 साली शिवछत्रपती पुरस्कार मिळाला होता. सोबतच आठ गोल्ड मेडलसुद्धा यांनी पटकावलेले आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हाताने वाहले यांना छत्रपती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं होतं. स्पोर्ट कोट्यातून त्यांना नोकरी मिळणं अपेक्षित होतं. मात्र तसं झालं नाही.

शिवछत्रपती पुरस्कार, 8 गोल्ड मेडल, तरीही करावं लागतंय पेट्रोल पंपावर काम, प्रवीण वाहलेंच्या व्यथा सरकार जाणून घेणार ?
Praveen Wahle
Follow us on

नागपूर : आपल्या देशात काही खेळाडूंना मोठा मान मिळतो तर काहींना मात्र कोणी विचारतही नाही. नागपुरातील प्रवीण वाहले या शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त विजेत्या खेळाडूच्या बाबतीतही असंच झालं आहे. आर्थिक संकटात सापडल्यामुळे त्यांच्यावर पोटाची खळगी भरण्यासाठी चक्क पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्याचं काम करावं लागत आहे. (Shiv Chhatrapati award 8 gold medal winner Nagpur Player Praveen Wahle still working on petrol pump wants help from state government)

प्रवीण वाहले यांना छत्रपती पुरस्कार

नागपुरातील प्रवीण वाहले या खेळाडूला आट्या-पाट्या या खेळात 2006 साली शिवछत्रपती पुरस्कार मिळाला होता. सोबतच आठ गोल्ड मेडलसुद्धा यांनी पटकावलेले आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हाताने वाहले यांना छत्रपती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं होतं. स्पोर्ट कोट्यातून त्यांना नोकरी मिळणं अपेक्षित होतं. मात्र तसं झालं नाही.

पेट्रोल पंपावर करावं लागतंय काम

आज त्यांना आपल्या परिवारांचं पालन-पोषण करण्यासाठी एका पेट्रोल पंपावर गाड्यांमध्ये पेट्रोल भरण्याचं काम करावं लागत आहे. या ठिकाणी वाहले यांना तुटपुंज्या पगारात काम करावं लागत आहे. महिनाभर काम करुन त्यांना 8 हजार रुपये पगार मिळतो.

आजही नवीन खेळाडूंना मार्गदर्शन करतात

प्रवीण वाहले यांना राज्यातील सन्मानाचा पुरस्कार मिळाला असला तरी त्यांना आपल्या चरितार्थासाठी संघर्ष करावा लागत आहे. आपली आर्थिक परिस्थिती बिकट असली तरी त्यांनी खेळाबद्दलचे त्यांच्यावरचे प्रेम कमी होऊ दिलेले नाही. त्यांनी आजही खेळ सोडलेला नाही. आजही वेळ मिळेल त्याप्रमाणे ते नवीन खेळाडूंना मार्गदर्शन करतात. नव्या खेळाडूंना ते शिकवतात.

नवीन पिढी आट्या-पाट्या, खो-खोसारख्या खेळाकडे वळेल का ?

मात्र त्यांच्या मनात एक खंत अजूनही घर करून आहे. सरकार देशी खेळांना प्राधान्य देऊन त्याला वाढविण्याचा प्रयत्न करत नाही. राज्यातील सर्वात महत्वाचा पुरस्कार मिळवूनसुद्धा साधी नोकरी मिळाली नाही. मग खरंच नवीन पिढी आट्या-पाट्या आणि खो-खोसारख्या खेळाकडे वळेल का ? असा प्रश्न त्यांच्या मनात आहे. त्यांनी खेळासाठी जीवन वाहिलेलं आहे. मात्र आज परिवार चालविण्यासाठी प्रवीण वाहले यांना खस्ता खाव्या लागत आहेत. सरकारने याचा विचार करावा अशी प्रवीण यांची अपेक्षा आहे.

इतर बातम्या :

राज्य सरकारच्या महत्त्वकांक्षी समृद्धी महामार्गाचे काम 74 टक्के पूर्ण; एकनाथ शिंदेंकडून पाहणी

भारतीय खेळाडूंचे हे ‘एडिटेड’ फोटो तुम्ही पाहिले का?, विराटचा फोटो तर पाहाच

IPL 2021: UAE मध्ये मुंबई आणि चेन्नई संघाची धमाल, कोणी खेळतंय फुटबॉल तर कोणी वॉलीबॉल, पाहा VIDEO

(Shiv Chhatrapati award 8 gold medal winner Nagpur Player Praveen Wahle still working on petrol pump wants help from state government)