Sudhir Mungantiwar: तुम्ही जो दगा दिला… आता व्याजासहित परतफेड, सुधीर मुनगंटीवार यांची उद्धव ठाकरे यांच्यावर बोचरी टीका
Sudhir Mungantiwar on Uddhav Thackeray: ऑपरेशन टायगरवर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मोठे वक्तव्य केले. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी 2019 मधील घडामोडींची आठवणही त्यांनी करून दिली. काय म्हणाले मुनगंटीवार?

Sudhir Mungantiwar on Operation Tiger: काल शिवसेनेचा 60 वा वर्धापन दिन होता. दोन्ही गटांनी तो साजरा केला. त्यावेळी ऑपरेशन टायगरचे पडसाद उमटले. उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणात ऑपरेशन टायगरच्या अनुषंगाने जोरदार फटकेबाजी समोर आली. उद्धव ठाकरे यांनी कालच्या भाषणात गद्दारांना फटके देण्याचे, तुडवण्याचे वक्तव्य केले. या सर्व घडामोडींवर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मोठे भाष्य केले आहे. त्यांनी 2019 मधील घडामोडींची आठवण करून देत मुनगंटीवार यांनी जोरदार निशाणा साधला.
तुम्ही जो दगा दिला…
उद्धव ठाकरे निराशेतून तुडवा शब्द वापरतात. आपल्यासोबत कोणीच नाही, या जाणिवेतून ते असे शब्द वापरतात. उद्धवजी बद्दल सन्मान होता. पण २०१९ ला त्यांना भाजपशी नातं तोडत त्यांनी विश्वासघात केला. त्यामुळे तुमच्या नशिबात व्याजासहीत अशा घटना येणार. उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबत दगा केला, जनतेसोबत विश्वासघात केल्याने त्यांच्यावर व्याजासहीत हे दिवस आले आहेत, अशी बोचरी टीका केली. पद सोडतो हे वारंवार सांगायचं आणि सोडायचे नाही. यातून लोकांना मनात विश्वास जातो. उद्धव ठाकरे यांनी जे बोलले ते करायला हवं, शब्दाचं पक्कं असायला हवं असा टोलाही त्यांनी लगावला.
भाजप शिंदेसाबाच्या सेनेत विलीन होईल. असं म्हणून ते स्वत:ची प्रतिमा खुजी करत आहे. जेव्हा तुम्ही वाईट वागाल, तेव्हा तुमच्या वाट्याला ते येणार. ठाकरे गटाचे आमदार नाराज असण्याचं कारण नाही. आम्ही कमी असतानाही जनतेचे प्रश्न मांडत होतो. त्यांच्या पक्षाची अवस्था झाली. यामुळे उद्धव ठाकरे यांचा भाजपवर रोष असणारंच, असे मुनगंटीवार म्हणाले.
आमच्या मनात उद्धव ठाकरेंबद्दल सन्मान होता. त्यांना भाजपसोबत नात तोडून जनतेचा विश्वास घात केला. पक्षप्रमुख पद, तो त्यांचा प्रश्न आहे, त्यांनी असा भावही व्यक्त करू नये. वारंवार सांगूनही सोडत नाही, लोकांच्या मनात भाव निर्माण होईल. अशी कोणतीही गोष्ट बोलू नये, ते करू शकत नाही. आम्ही दगा दिला असता तर आम्ही अडचणीत असतो. तुम्ही वाईट वागणार तेव्हा तुमच्या वाटेला वाईटपण येणार असे सुधीर मुनगंटीवार उद्धव ठाकरे यांना म्हणाले.