Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोरोनासारखीच लक्षणं… HMPV व्हायरसची नागपुरात दोघांना लागण, आरोग्य खातं अलर्ट मोडवर; केंद्रीय आणि राज्याच्या आरोग्य मंत्र्यांनी आज बोलावली तातडीची बैठक

HMPV Virus : चीनमधील नवीन HMPV व्हायरसने राज्यात हजेरी लावली आहे. या ह्युमन व्हायरसचे नागपूरात 2 संशयित रूग्ण आढळले आहेत. परिणामी आरोग्य खातं अलर्ट मोडवर आले आहे, केंद्रीय आणि राज्याच्या आरोग्य मंत्र्यांनी आज तातडीची बैठक बोलावली आहे.

कोरोनासारखीच लक्षणं... HMPV व्हायरसची नागपुरात दोघांना लागण, आरोग्य खातं अलर्ट मोडवर; केंद्रीय आणि राज्याच्या आरोग्य मंत्र्यांनी आज बोलावली तातडीची बैठक
HMPV Virus चे दोन रूग्ण नागपूरात
Follow us
| Updated on: Jan 07, 2025 | 11:40 AM

HMPV (ह्यूमन मेटान्यूमोव्हायरस) ने भारतात हजेरी लावली आहे. चीनमध्ये या व्हायरसने रुग्णालयात रुग्णांची एकच गर्दी होत असल्याचा दावा समाज माध्यमांवर करण्यात येत आहे. तर दुसरीकडे राज्यात सुद्धा या व्हायरसने एंट्री केली आहे. या ह्युमन व्हायरसचे नागपूरात 2 संशयित रूग्ण आढळले आहेत. परिणामी आरोग्य खातं अलर्ट मोडवर आले आहे, केंद्रीय आणि राज्याच्या आरोग्य मंत्र्यांनी आज तातडीची बैठक बोलावली आहे. यापूर्वी कर्नाटकात 2, गुजरातमध्ये 1, पश्चिम बंगालमध्ये 1 आणि तामिळनाडू राज्यात 2 प्रकरणे समोर आली होती.

दोन संशयित रूग्ण

नागपूरमध्ये एक 13 वर्षांची मुलगी आणि एक 7 वर्षाच्या मुलीत ही लक्षणं दिसली आहे. सतत दोन दिवसांचा ताप आल्यानंतर कुटुंबाने एका खासगी लॅबमध्ये तपासणी केली असता त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. या अहवालानंतर कुटुंबाला धक्का बसला. या दोन्ही मुलांना रुग्णालयात भरती करण्यात आले नाही. त्यांच्यावर घरीच उपचार करण्यात येत आहे. त्यांची तब्येत चांगली असल्याचे समोर येत आहे.

हे सुद्धा वाचा

मुंबई महापालिका अलर्ट मोडवर

मुंबई महानगरपालिका पण अलर्ट मोडवर आली आहे. जेजे आणि सेंट जॉर्ज रुग्णालयात त्यासाठी मुख्य कक्ष स्थापन करण्यात आला आहे. याठिकाणी संशयित रुग्णावर उपचार करण्यात येणार आहे. तर नागरिकांना पण सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. केंद्रीय आणि राज्यातील आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे.

आरोग्य विभागाची तातडीची बैठक

एचएमपीव्ही व्हायरस संदर्भात आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांनी आरोग्य विभागाची तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीला केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधवही उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. नागपूरात दोन संशयित रूग्ण सापडल्यानंतर तातडीची बैठक होत आहे. आज दुपारी ३ वाजता सेंट जॉर्ज रुग्णालयातील आरोग्य भवनात आयोजित करण्यात आली आहे.

भीतीचे कारण नाही, मास्क वापरा, काळजी घ्या

नागपुरातही ‘एचएमपीव्ही’चे दोन संशयीत रुग्ण आढळले. दोन लहान मुलांचा रिपोर्ट एचएमपीव्ही संशयीत असल्याची माहिती समोर आली आहे. या दोन्ही मुलांना खोकला आणि ताप होता, थोडे वेगळे लक्षणं असल्याने त्यांचे सॅम्पल NIV ला पाठवण्यात आली आहे. दोन्ही मुलांना हॉस्पिटल मध्ये दाखल करण्याची गरज पडली नाही आणि दोन्ही रुग्ण आजारातून बरे झाले आहे.

“पालकांनी चिंता करण्याची गरज नाही, हा व्हायरस कोरोनासारखा नाही. माईल्ड आहे”. शक्य असल्यास मुलांनी मास्क घालावा, असे आवाहन नागपूर येथील शासकीय वैद्यकीय आणि रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे यांनी केले आहे.

संसदेत होणार छावाचं स्क्रीनिंग; पंतप्रधान मोदींसह खासदारांची उपस्थिती
संसदेत होणार छावाचं स्क्रीनिंग; पंतप्रधान मोदींसह खासदारांची उपस्थिती.
अन् एकनाथ शिंदेंनी 'त्या' मजूर कुटुंबाची जबाबदारी उचलली
अन् एकनाथ शिंदेंनी 'त्या' मजूर कुटुंबाची जबाबदारी उचलली.
भर उन्हात बरसल्या अवकाळी पावसाच्या सरी
भर उन्हात बरसल्या अवकाळी पावसाच्या सरी.
मग तुम्ही हजामत करत होते का? जयंत पाटलांनी सरकारला धरलं धारेवर
मग तुम्ही हजामत करत होते का? जयंत पाटलांनी सरकारला धरलं धारेवर.
आदित्य ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना बघणं टाळलं
आदित्य ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना बघणं टाळलं.
ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच...
ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच....
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?.
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका.
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार.
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है.