Nagpur Medical | अबब! महिलेच्या पोटात होता आठ किलोंचा गोळा; नागपूरच्या मेडिकलमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया

सुनील ढगे

सुनील ढगे | Edited By: गोविंद हटवार, Tv9 मराठी

Updated on: Jan 31, 2022 | 10:27 AM

नागपुरातील एका महिलेच्या पोटात गेल्या काही दिवसांपासून खूप दुखत होते. पोटही जास्तच सुटले होते. मेडिकलमध्ये तपासणी केली असता तिच्या पोटात गोळा असल्याचं सांगण्यात आलं. तो गोळा काढण्यात आलाय.

Nagpur Medical | अबब! महिलेच्या पोटात होता आठ किलोंचा गोळा; नागपूरच्या मेडिकलमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया
मेडिकलचे संग्रहित छायाचित्र

नागपूर : अयोध्यानगरातील एक महिला पोटदुखीच्या त्रासासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (Government Medical College and Hospital) (मेडिकल) दाखल झाली. उषा कडवे असं त्यांचं नाव. ही महिला साठ वर्षे वयाची आहे. तिच्या वेदना लक्षात घेता डॉक्टरांनी तिला भरती करून घेतले. गेल्या काही दिवसांपासून त्रास असल्याचं तिनं डॉक्टरांना सांगितलं. मेडिकलमध्ये तिचे सोनोग्राफी, सीटी स्कॅन (Sonography, CT scan) करण्यात आले. यामध्ये तिच्या पोटात अंडाशयाची गाठ असल्याचे डॉक्टरांना कळलं. कॅन्सरसदृश्य गोळा असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला. मात्र, यानंतर सर्व चाचण्या करण्यात आल्यात. डॉक्टरांनी सल्लामसलत करून शस्त्रक्रिया (Surgery) करण्याचा निर्णय घेतला. महिलेच्या पोटातून अंडाशयाचा चक्क आठ किलोचा गोळा काढण्यात डॉक्टरांना यश आले. डॉक्टरांच्या प्रसंगावधानाने संबंधित महिलेचे प्राण वाचले.

कॅन्सरयुक्त गोळा असल्याचे निदान

महिलेच्या पोटात हा ट्यूमर कसा तयार झाला यासंदर्भातील तपासणीसाठी बायोप्सी करणे आवश्यक होते. डॉक्टरांनी बायोप्सीसाठी हिस्टोपॅथॉलॉजीकडे पाठवले होते. कॅन्सरयुक्त गोळा असल्याचे तपासणीतून पुढे आले. सध्या त्या महिलेची प्रकृती बरी असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे. मेडिकलच्या ऑपरेशन थिएटरमध्ये डॉ. कांचन गोलावार, डॉ. अनिल हुमने यांनी ही शस्त्रक्रिया केली. डॉ. वर्षा, डॉ. अपर्णा, डॉ. शोभना, डॉ. शिवांगी, डॉ. तुहिना यांनी शस्त्रक्रियेत सहकार्य केले.

किमोथेरपीसाठी महिलेला पाठविण्यात येणार

महिलेच्या पोटात आठ किलो वजनी अंडाशयाचा गोळा होता. तो गोळा यशस्वी शस्त्रक्रियेव्दारे आता काढण्यात आला आहे. विविध तपासणीतून कॅन्सरचा गोळा असल्याचे निदान झाले. सध्या किमोथेरपीसाठी महिलेला पाठविण्यात येईल. रुग्ण महिलेची प्रकृती उत्तम आहे, अशी माहिती मेडिकल हॉस्पिटलमधील स्त्री व प्रसूतीरोग विभागाच्या सहयोगी प्राध्यापक डॉ. कांचन गोलावार यांनी दिली. काही महिला या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळं त्यांनी सुरुवातीपासूनच काळजी घ्यावी. दुखत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. जास्त झाल्यानंतर खूप अडचण होते. एवढा मोठा गोळा पोटात असताना संबंधित महिलेनं सुरुवातीला डॉक्टरांना दाखविलं असतं तर धोका कमी राहिला असता. योग्य उपचार झाले असते. जास्त झाल्यानंतर संबंधित व्यक्तीलाच त्रास होतो.

एसटीचे स्टेअरिंग येणार महिला कर्मचाऱ्यांच्या हाती; काय आहे परिवहन महामंडळाचा प्लान?

Nagpur Mihan | मिहानमध्ये तारांकित हॉटेलची होणार उभारणी; रोजगार निर्मितीला कशी मिळेल चालना?

Nagpur NMC Election | नागपूर महापालिका निवडणुकीचा धुरळा; भाजपा उमेदवार निवडीसाठी करणार सर्व्हे

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI