AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chandrapur Accident | दुर्दैवी..! अपघातात घटनास्थळी मायलेकीचा मृत्यू, उपचारादरम्यान वडिलांनी सोडले प्राण

अपघाताची ही घटना रविवारला सायंकाळी आठ वाजताच्या सुमारास घडली. सायत्रा मोतीराम मेश्राम (वय 65, रा. खापरी), कमल चुनारकर (वय 45, रा. चंद्रपूर) व मोतीराम मेश्राम (वय 70, रा. खापरी) अशी मृतांची नावे आहेत.

Chandrapur Accident | दुर्दैवी..! अपघातात घटनास्थळी मायलेकीचा मृत्यू, उपचारादरम्यान वडिलांनी सोडले प्राण
| Edited By: | Updated on: Dec 06, 2021 | 10:20 AM
Share

चंद्रपूर : तेरवीच्या कार्यक्रमासाठी निघालेल्या वाहनाचा पिंपळनेरी-खापरी मार्गावर भीषण अपघात झाला. या अपघातात मायलेकीचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर चंद्रपुरात उपचारादरम्यान वडिलांनी प्राण सोडले. अन्य दोघे गंभीर जखमी आहेत. जखमींना उपचारासाठी चंद्रपुरात हलविण्यात आले. अपघाताची ही घटना रविवारला सायंकाळी आठ वाजताच्या सुमारास घडली. सायत्रा मोतीराम मेश्राम (वय 65, रा. खापरी), कमल चुनारकर (वय 45, रा. चंद्रपूर) व मोतीराम मेश्राम (वय 70, रा. खापरी) अशी मृतांची नावे आहेत.

तेरवीच्या कार्यक्रमाला जात होते

जिल्ह्यातील खापरी धर्मू येथील मेश्राम आणि चुनारकर कुटुंबीय चारचाकी वाहनाने सरडपार येथे तेरवीच्या कार्यक्रमासाठी निघाले होते. पिंपळनेरी-खापरी मार्गावरील उमरी फाट्याजवळ वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळं वाहन उलटले. या भीषण अपघातात सायत्रा मोतीराम मेश्राम, कमल चुनारकर या मायलेकीचा घटनास्थळी मृत्यू झाला. जखमी अवस्थेत असलेले वडील मोतीराम मेश्राम यांना उपचारासाठी चंद्रपुरात हलविण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तर उत्तम चुनारकर (वय 45, रा. चंद्रपूर) व अंकित राजू मेश्राम (वय 10, रा. खापरी) हे गंभीर जखमी झाले. त्यांना चंद्रपुरात रेफर करण्यात आले. या घटनेने खापरी गावात शोककळा पसरली आहे. तपास चिमुर पोलीस करीत आहेत.

Nagpur | बाबासाहेबांच्या वस्तू टिकणार 100 वर्षे, प्रयोगशाळेत केली जातेय रासायनिक प्रक्रिया

Nagpur Deekshabhoomi | बाबासाहेबांच्या निर्वाणाचा सांगावा पोचवणारे दामू मोरे, महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वसंध्येला आठवणीला उजाळा

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.