Video – Nagpur Crime | संशयास्पद स्थितीत ट्रक आढळला; ट्रकमध्ये सापडले 17 लाखांचे घबाड

सिगारेटस्च्या पाकीटवर कोणत्याही प्रकारचा वैधानिक इशारा लिहिलेला नाही. पोलिसांनी हा 7 लाख, 15 हजारांचा मुद्देमाल तसेच 10 लाख, 50 हजारांचा ट्रक असा एकूण 17 लाख, 65 हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

Video - Nagpur Crime | संशयास्पद स्थितीत ट्रक आढळला; ट्रकमध्ये सापडले 17 लाखांचे घबाड
जप्त करण्यात आलेल्या मांजासह लकडगंज पोलीस.
Follow us
| Updated on: Dec 24, 2021 | 11:27 AM

नागपूर : नागपुरात बनावट सिगारेट्स आणि नायलॉन मांजा (Manja) जप्त करण्यात आलाय. 17 लाख रुपयांच्या मुद्देमालासह जय रोड लाईन्सच्या एजंटला अटक करण्यात आली. दिल्लीच्या ट्रान्सपोर्टवरही गुन्हा दाखल करण्यात आलाय. एक ट्रक संशयास्पद अवस्थेत दिसला. पोलिसांनी ट्रकची पाहणी केली असता त्यात 130 मांजाच्या चक्री आढळल्या. पोलिसांनी त्या जप्त केल्या. सोबतच 200 सिगारेटसचे पाकीट्ही जप्त केले. या सिगारेटसची किंमत 6 लाख, 50 हजार रुपये आहे.

17 लाख, 65 हजारांचा मुद्देमाल जप्त

विशेष म्हणजे, सिगारेटस्च्या पाकीटवर कोणत्याही प्रकारचा वैधानिक इशारा लिहिलेला नाही. पोलिसांनी हा 7 लाख, 15 हजारांचा मुद्देमाल तसेच 10 लाख, 50 हजारांचा ट्रक असा एकूण 17 लाख, 65 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त गजानन राजमाने यांच्या पथकानं लकडगंजमध्ये ही कारवाई केली. एपीआय विलास पाटील, सतीश गवई आणि सहकारी गुरुवारी दुपारी गस्त घालत होते. जय रोड लाईन्सचा एक ट्रक त्यांना संशयास्पद स्थितीत दिसला. मांजाच्या चक्री दिसल्यानं पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला.

दोन लाखांचा गुटखा जप्त

नवीन कामठी परिसरात ऑटोमध्ये दोन लाख 30 हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आला. याप्रकरणी यादवनगर येथील ऑटोचालक श्याम मिरसिंग कटारे याला अटक करण्यात आली. परिमडंळ पाचचे पोलीस उपायुक्त मनीष कलवानिया यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष वैरागडे, एपीआय सुरेश कन्नाके आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कामगिरी केली.

Agrovision | नागपुरात आजपासून शेतकऱ्यांची पंढरी! चार दिवस अॅग्रोव्हिजन कृषी प्रदर्शन, जाणून घ्या कृषीतील आधुनिक तंत्रज्ञान

Nagpur Omicron | ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर चिंता वाढली, दुसरा ओमिक्रॉनबाधित सापडला; प्रशासन अलर्ट झोनमध्ये

Gondia Saras| सारस पक्ष्यांबद्दल उदासीनता बरी नव्हे! उच्च न्यायालयाने अधिकाऱ्यांना खडसावले; पुढच्या सुनावणीला उपस्थित राहण्याचे आदेश

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.