AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘दररोज शाह आणि मोदींसमोर भिकेचा कटोरा घेऊन…’, उद्धव ठाकरे यांचा कुणावर निशाणा?

उद्धव ठाकरे यांनी रामटेकमध्ये आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला. यासोबतच उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर सडकून टीका केली.

'दररोज शाह आणि मोदींसमोर भिकेचा कटोरा घेऊन...', उद्धव ठाकरे यांचा कुणावर निशाणा?
उद्धव ठाकरे
| Updated on: Sep 29, 2024 | 8:49 PM
Share

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरुढ पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. यावेळी उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात भाजप, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. “शिवाजी महाराजांनी सुल्तानी संकट रोखलं. म्हणून हे दिल्लीवाले पाहत आहे. आज दिल्लीवाले पाहत आहे. त्यांना महाराष्ट्रातील जनता कमकुवत वाटते की काय. तुमच्या साक्षीने सांगतो, मोदी आणि शहा यांना सांगतो तुमची भीक नको. हक्काचं पाहिजे. आम्ही स्वाभिमानी आहोत. आम्ही शिवरायांचे मावळे आहोत. आम्ही हक्काचं मागत आहोत. आम्हाला फुकटचं काही नको. त्यांना वाटतं मी म्हणजे कोणी तरी आहे. दररोज शाह आणि मोदींसमोर भिकेचा कटोरा घेऊन उभे राहतात”, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. “ही वेळ येऊ देणार नाही. मिंधे म्हणजे महाराष्ट्र नाही. गुलाबी जॅकेटवाले महाराष्ट्र नाही. ही जनता महाराष्ट्र आहे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

“लाडकी बहीण योजना. तुमच्या खिशातील पैसे देत नाही. माझ्या जनतेच्या खिशातील पैसे देत नाही. मी शेतकऱ्यांची कर्ज माफी केली. पण कधी एक कार्यक्रम घेऊन पैसे देत असल्याचं म्हटलं नाही. कर्जमुक्ती मेळावे घेतले नाही. कारण मी तुमच्या हक्काचं तुम्हाला दिलं. आमच्याकडे आज काही नाही. तुम्ही आमचा पक्ष आणि निशाणीही चोरली आहे. माझ्याकडे देण्यासारखं काही नाही. महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करायला लावता. मी तुम्हाला १५०० रुपयेही देत नाही. तरीही तुम्ही आला. तुम्हाला पैसे दिले नाही, नाश्ता दिला नाही. तरीही तुम्ही आला”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

‘मी तुम्हाला वचन देतो…’

“उद्धव ठाकरे म्हणजे माणूस नाही तर शिवसेनाप्रमुखांचा पुत्र आहे. मी तुम्हाला वचन देतो. हे सरकार उलथवून टाकायचंच. उलथवून टाकायचंच. मला निसटता विजय नको. दणदणती विजय हवा. नागपूरमधील त्या व्यक्तीला पाडायचं आहे. सरकार आल्यावर पहिल्याप्रथम महाराष्ट्राची लूट थांबवून दाखवेल”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

“मी मुख्यमंत्री असताना एक तरी उद्योग बाहेर गेल्याची बातमी आली का? मिंधे झाल्यावर कशी आली? त्यांना शिवसेना रोखायची आहे. कारण त्यांच्या महाराष्ट्र लुटीच्या आड शिवसेना आहे. पवार आहेत, काँग्रेस आहे. ही स्वाभिमानाची लढाई आहे. रामटेकच्या सहाच्या सहाही जागा आल्याच पाहिजे. उमेदवार शिवसेनेचा असो राष्ट्रवादीचा असेल किंवा काँग्रेसचा असेल. तुम्ही मला सहाहीच्या सहाही जागा निवडून देण्याचं वचन दिलं पाहिजे. मला वचन द्या”, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.