Praveen Togadia | भाजपची सत्ता असताना भोंगे बंद का केले नाही? नागपुरात डॉ. प्रवीण तोगडिया यांचा भाजपवर हल्लाबोल

मशिदीवरील भोंग्यांवरून राज्यात अशांतता निर्माण करण्याचा कट केला जात असल्याचा आरोप भाजपवर होतोय. आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे अध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया यांनी भाजपवर हल्लाबोल केलाय. आधी भाजपशासित राज्यातील भोंगे बंद करा. महाराष्ट्रात भाजपची सत्ता होती तेव्हा भोंगे बंद का केले नाही, असा सवाल तोगडिया यांनी केलाय.

Praveen Togadia | भाजपची सत्ता असताना भोंगे बंद का केले नाही? नागपुरात डॉ. प्रवीण तोगडिया यांचा भाजपवर हल्लाबोल
हिंदू परिषदेचे अध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया
Follow us
| Updated on: Apr 20, 2022 | 12:34 PM

नागपूर : नागपूर : हिंदू परिषदेचे अध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया (Dr. Praveen Togadia) यांनी मंगळवारी नागपुरात पत्रपरिषद घेतली. ते म्हणाले, भाजपने व केंद्र सरकारने (Central Government) आधी भाजपशासित राज्यातील मशिदीवरील भोंगे उतरवावेत. केंद्राने यासंदर्भात आदेश काढावा. दोन दिवसांत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन व्हावे. रात्री दहा वाजतानंतर सकाळी सूर्योदयापर्यंत भोंगा वाजवू शकत नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशांचे पालन सर्व राज्य शासनांनी करणे अपेक्षित आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकार चालवित आहे. केंद्रात भाजपची सत्ता आहे. केंद्र सरकार जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्तांना भोंगे काढण्याचे थेट आदेश देऊ शकतो. मशिदीवरील भोंग्यांवरून राज्यात अशांतता निर्माण करण्याचा कट केला जात असल्याचा आरोप भाजपवर होतोय. आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे (International Hindu Council) अध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया यांनी भाजपवर हल्लाबोल केलाय. आधी भाजपशासित राज्यातील भोंगे बंद करा. महाराष्ट्रात भाजपची सत्ता होती तेव्हा भोंगे बंद का केले नाही, असा सवाल तोगडिया यांनी केलाय.

हिंदूंनी सावध राहीलं पाहिजे

देशात महागाईवरून लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी दंगली पेटविण्याचे काही षडयंत्र रचल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला. शिवाय हिंदूंनी यापासून सावधान राहायला हवे, असं आवाहनही त्यांनी केलं. राज्यात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत. भाजपने मेहबुबा मुफ्तीसोबत युती केली तेव्हा भाजपने हिंदुत्व सोडले, अशी टीका कुणी केलेली नव्हती. आता शिवसेनेने भाजपला सोडले म्हणून हिंदुत्व सोडले, असे म्हणणे चुकीचे आहे, असंही ते म्हणाले.

पदभरती करण्याची मागणी

राष्ट्रीय स्वंयसंघाचे सरसंघचालकांनी पंधरा वर्षांत अखंड भारत होईल, असे वक्तव्य केले. त्यांच्या वक्तव्याचे स्वागत आहे. पण, सत्तेत नसताना आश्‍वासन दिले जाते. सत्ता स्वयंसेवकांकडे आहे तर त्वरित पावले उचलली गेली पाहिजे, असं तोगडिया म्हणाले. गेल्या सात वर्षांत काश्मीरमधील हिंदूंना परत आणता आले नाही. केंद्र व राज्य शासनात एक कोटी पदे रिक्त आहेत. ही पदे भरली जावी अन्यथा बेरोजगारांना एकत्रित करून मोठे आंदोलन करण्यात येईल, असा इशारादेखील यावेळी त्यांनी दिला.

Car Birthday | भंडाऱ्यात मालकाने साजरा केला चक्क कारचा वाढदिवस, 34 वर्षे अविरत सेवा

11th Class Admissions| राज्यात अकरावी प्रवेशासाठी आता वेटिंग लीस्ट, प्रथम येणाऱ्यास प्राधान्य फेरी बंद

Nagpur ST | आधी एसटी बससमोर नतमस्तक, नंतर लालपरीचं स्टेअरिंग हाती; नागपूर विभागात 327 कर्मचारी रुजू

Non Stop LIVE Update
पवारांच्या वक्तव्यावर शशी थरूर म्हणाले,तर रेड कार्पेट टाकून स्वागत करू
पवारांच्या वक्तव्यावर शशी थरूर म्हणाले,तर रेड कार्पेट टाकून स्वागत करू.
मोदींच्या गुलामांच्या फौजेत आणखी एक भर, राज ठाकरेंवर कुणाचा निशाणा?
मोदींच्या गुलामांच्या फौजेत आणखी एक भर, राज ठाकरेंवर कुणाचा निशाणा?.
'राज ठाकरे बाळासाहेबांचे प्रतिरूप, त्यांना धनुष्यबाणाच्या मंचावर....'
'राज ठाकरे बाळासाहेबांचे प्रतिरूप, त्यांना धनुष्यबाणाच्या मंचावर....'.
फडणवीस राजकारणातलं कच्चं मडकं, ठाकरे गटातील बड्या नेत्याचा घणाघात
फडणवीस राजकारणातलं कच्चं मडकं, ठाकरे गटातील बड्या नेत्याचा घणाघात.
पवारांनी माझा राजीनामा मागितला...खडसे भाजपात येण्यापूर्वी काय म्हणाले?
पवारांनी माझा राजीनामा मागितला...खडसे भाजपात येण्यापूर्वी काय म्हणाले?.
ठाकरेंना 1999 पासूनच मुख्यमंत्रिपदाची स्वप्न, पण...फडणवीसांचा हल्लाबोल
ठाकरेंना 1999 पासूनच मुख्यमंत्रिपदाची स्वप्न, पण...फडणवीसांचा हल्लाबोल.
११ महिन्यांच्या चिमुकल्यासह महिला कर्मचारी निवडणुकीच्या ड्युटीवर
११ महिन्यांच्या चिमुकल्यासह महिला कर्मचारी निवडणुकीच्या ड्युटीवर.
अमित शाह-मोदी, शिंदेंवर राऊतांचे प्रश्न अन उद्धव ठाकरेंची रोखठोक उत्तर
अमित शाह-मोदी, शिंदेंवर राऊतांचे प्रश्न अन उद्धव ठाकरेंची रोखठोक उत्तर.
मी औरंगजेबाचा फॅन..., विरोधकांच्या 'त्या' टीकेवर ठाकरेंचा पलटवार काय?
मी औरंगजेबाचा फॅन..., विरोधकांच्या 'त्या' टीकेवर ठाकरेंचा पलटवार काय?.
त्यांना सद्गृहस्थ म्हणायचं का काय म्हणायचं? उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
त्यांना सद्गृहस्थ म्हणायचं का काय म्हणायचं? उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.