.
AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! या 2 पैकी एका बड्या नेत्याला एकनाथ शिंदेंकडून थेट गिफ्ट, काही वेळातच घोषणा..

विधानपरिषद उपसभापतीपदाबाबत घोषणा होणार आहे. यापूर्वी मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. शिंदे गटात मोठी रस्सीखेच या पदावरून बघायला मिळतंय. काही आमदारांनी याबाबतचे पत्रही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले.

मोठी बातमी! या 2 पैकी एका बड्या नेत्याला एकनाथ शिंदेंकडून थेट गिफ्ट, काही वेळातच घोषणा..
Eknath Shinde
| Updated on: Jun 30, 2026 | 8:53 AM
Share

ऑपरेशन टायगरच्या माध्यमातून शिवसेना शिंदे गटाने ठाकरे गटाचे तब्बल 6 खासदार फोडले. यादरम्यानच मोठ्या घडामोडींना वेग येत आहे. खासदार ओमराजे निंबाळकर आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल झाले होते. ज्यानंतर काहीतरी मोठे घडण्याची चर्चा आहे. ओमराजे निंबाळकर यांनी शिवसेना ठाकरे गटातून मोठी बंडखोरी केली. यादरम्यानच दोन दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे ओमराजे निंबाळकर यांच्या मतदार संघात होते. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याकडून फुटीर खासदारांवर मोठी टीका केली जात आहे. परभणीचे खासदार संजय ऊर्फ बंडू जाधव यांच्यावर खालच्या पातळीवर संजय राऊत यांनी सभेवेळी टीका केली. यादरम्यानच शिवसेना नेते खासदार श्रीकांत शिंदे यांनी राऊतांवर कारवाई व्हावी, अशी मागणी केली होती.

यादरम्यानच आता आज सकाळी 10.30 वाजता उपसभापती पदाबाबत महत्वाचा निर्णय होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. शिंदेंच्या शिवसेनेच्या वाट्याला जाणार विधानपरिषद उपसभापतीपदाबाबत घोषणा होणार आहे. यादरम्यानच शिंदे गटात मोठी चुरस बघायल मिळत आहे. शिंदेंच्या शिवसेनेत उपसभापती पदावरून दोन जणांमध्ये मोठी चुरस आहे.

चंद्रकांत रघुवंशी आणि कृपाल तुमाने, यांच्यात चढाओढ बघायला मिळतंय. दोघांकडूनही पद मिळवण्याकरिता प्रयत्न केली जात आहेत. चंद्रकांत रघुवंशी हे उपसभापती व्हावेत यासाठी जिल्हातील 9 आमदारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र दिले. मोठी रस्सीखेच शिंदे गटात बघायला मिळतंय. अमोल पाटील, गोकुळ गिते, सतजीत तांबे, अमशा पाडवी, किशोर पाटील, चंद्रकांत सोनावणे, चंद्रकांत पाटील, मंजूळा गावित, तुळशीराम गावित यांनी पत्र दिले.

एकनाथ शिंदे आता या पत्रानंतर काही निर्णय नक्की घेतात, हे अगदी थोड्यावेळातच स्पष्ट होईल. या आमदारांचे पत्रही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. एकनाथ शिंदे उपसभापती पदाची माळ नक्की कोणाच्या गळ्यात टाकतात, हे पाहण्यासारखे ठरणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या खासदारांनंतर काही आमदारही शिवसेना शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचा दावा केला जात आहे.

Follow Us
टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; दादा भुसे यांची मोठी घोषणा
Dada Bhuse On Paper Leak | टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; शिक्षणमंत्री दादा भुसे यांची विधानसभेत मोठी घोषणा
मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर....
Nashik | मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर, नेमकं घडलं काय?
नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
CM Devendra Fadnavis | चिमुकलीला अखेर न्याय! नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी
Mallikarjun Kharge | मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी; संसदेकडून अधिकृत बुलेटिन जारी
पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या
Pune Protest | पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या भिंतीवर चढल्या, मागणी काय?
सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा सोहळा
Sindhudurg Vatpurnima Celebration | ऐकावं ते नवलच! सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा अनोखा सोहळा
नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त
Uddhav Thackeray | नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त; उद्धव ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर घणाघात
ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा समाचार
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा घेतला समाचार
एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार
Chhatrapati Sambhajinagar | एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार; आरोपी 12 तासांत गजाआड
TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
मोठी बातमी! TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर