AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जगविख्यात मूर्तिकार राम सुतारांचे नाव गोंदूर विमानतळाला द्या, मनपा प्रशासनाला RPI चे निवेदन

मात्र हजारो स्मारकं, शिल्पं साकारलेल्या राम सुतार यांनी सरदार पटेलांच्या स्मारकाचं शिवधनुष्य लीलया पेललं. त्यामुळेच त्यांचा गौरव करण्यात आला. Gondur Airport Ram Sutar

जगविख्यात मूर्तिकार राम सुतारांचे नाव गोंदूर विमानतळाला द्या, मनपा प्रशासनाला RPI चे निवेदन
| Edited By: | Updated on: Jun 02, 2021 | 4:38 PM
Share

धुळे : जगविख्यात मूर्तिकार आणि पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित असलेले राम सुतार यांचे नाव गोंदूर विमानतळास देण्याचा ठराव धुळे महापालिकेच्या महासभेत एकमताने मंजूर करावा, अशा मागणीचे निवेदन आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने महापौर चंद्रकांत सोनार यांना देण्यात आले. यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. राम सुतार हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे मुक्त शिल्पकार आहेत. यांचा जन्म इ.स. 1925 मध्ये धुळे जिल्ह्यातील गोंदूर येथे झाला. सुतार यांनी 200 हून अधिक शिल्पे जगातील पाचही खंडांत बनवलीत. (Name Of The world Famous Sculptor Ram Sutar At Gondur Airport, RPI’s Statement To The Municipal Administration)

पद्मश्री, पद्मभूषण या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित

अशा जगविख्यात मूर्तिकार राम सुतार यांची भारत सरकारने दखल घेत त्यांना पद्मश्री पद्मभूषण या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित केलं. ही बाब धुळे शहरासाठी गौरवाची, अभिमानास्पद आहे. राम सुतार हे धुळे जिल्ह्यातील रहिवासी आहेत, ते जरी दिल्ली येथे वास्तव्यात राहत असले तरी त्यांची स्मृती कायम आपल्या मनाशी राहावी म्हणून धुळे शहरातील गोंदूर विमानतळाला राम सुतार यांचे नाव देण्यात यावे, असंही या निवेदनात म्हटलं आहे.

दत्त मंदिर चौक देवपूर ते गोंदूर पोवेतोच्या रस्त्याला राम सुतार यांचे नाव देण्याची मागणी

धुळे शहरातील दत्त मंदिर चौक देवपूर ते गोंदूर पोवेतोच्या रस्त्याला राम सुतार यांचे नाव देण्याचा ठराव धुळे महापालिकेत मंजूर करावा, अशा मागणी आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने महापौर चंद्रकांत सोनार यांच्याकडे करण्यात आली. निवेदन देतेवेळी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष वाल्मिक अण्णा दामोदर, तसेच कामगार नेते एमजी ढिवरे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष शशी वाघ आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

सरदार पटेल यांच्या पुतळ्याचे शिल्पकार मराठमोळे राम सुतार यांचा मोदींच्या हस्ते गौरव

विशेष म्हणजे सरदार पटेल यांच्या पुतळ्याचे शिल्पकार मराठमोळे राम सुतार यांचा गौरव मोदींच्या हस्ते झाला होता. राम सुतार यांनी ही मूर्ती साकारली आहे. स्टॅच्यू ऑफ युनिटी या मोदींच्या ड्रीम प्रोजेक्टचं प्रत्यक्ष काम लार्सन अँड टर्बो या कंपनीने केलं. मात्र त्यापूर्वी पुतळ्याचं रेखाचित्र, पटेलांच्या कपड्याच्या घडीपासून ते चेहऱ्यावरील सुरकुत्यापर्यंत सर्व साकारलं ते मराठमोळे राम सुतार यांनी. मूळचे धुळ्याचे असलेले राम सुतार यांनी वयाची नव्वदी पार केली आहे. मात्र हजारो स्मारकं, शिल्पं साकारलेल्या राम सुतार यांनी सरदार पटेलांच्या स्मारकाचं शिवधनुष्य लीलया पेललं. त्यामुळेच त्यांचा गौरव करण्यात आला. ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’साठी ब्राँझच्या आठ मिमी जाडीच्या 7000 हून अधिक शीट्स जोडून या पुतळ्याला आकार देण्यात आला.

संबंधित बातम्या

स्टॅच्यू ऑफ युनिटी: तीन मराठी माणसं, ज्यांना मोदींनी सलाम केला!

Name Of The world Famous Sculptor Ram Sutar At Gondur Airport, RPI’s Statement To The Municipal Administration

ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.