AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nana Patekar: ‘नटसम्राट’ हरपला, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर काळाच्या पड्याआड, निधनाची प्रत्येक अपडेट जाणून घ्या tv9 marathi वर

| Updated on: Oct 08, 2026 | 8:54 AM
Share

Veteran actor Nana Patekar passes away News LIVE Updates in Marathi: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन झाले आहे. वयाच्या ७५ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. या ज्येष्ठ अभिनेत्याचे डोना पौला येथील एका खाजगी रुग्णालयात निधन झाले

Nana Patekar: 'नटसम्राट' हरपला, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर काळाच्या पड्याआड, निधनाची प्रत्येक अपडेट जाणून घ्या tv9 marathi वर

LIVE NEWS & UPDATES

  • 08 Oct 2026 08:54 AM (IST)

    Nana Patekar Passes Away: नाना पाटेकर शासकीय इतमामात अंतिम संस्कार पुण्यात होणार

    नाना पाटेकर शासकीय इतमामात अंतिम संस्कार पुण्यात होणार. डोनजे गाव भोर तहसील इथे होणार असल्याची माहीती. नाना पाटेकर यांची अंतिम इच्छा होती की त्यांचे शेवटचे कार्य हे पुणे डोणजे येथील शेतामध्येच व्हावे अशी त्यांची अंतिम इच्छा होती.

  • 08 Oct 2026 08:50 AM (IST)

    मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला शोक

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला शोक, म्हणाले,”ज्येष्ठ अभिनेते आणि माझे निकटचे मित्र नाना पाटेकर यांची अशी अकाली आणि अचानक ‘एक्झिट’ मनाला मोठा धक्का देणारी आहे. मन प्रचंड दुःखी आहे. नाना जितके पडद्यावर मोठे, तितकेच मनाने सुद्धा मोठे होते. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीला त्यांनी एक कालखंड दिला. त्यातून प्रामुख्याने एक राष्ट्रभक्त अशीच त्यांची प्रतिमा प्रेक्षकांना भावली. ‘क्रांतिवीर’ ते ‘नटसम्राट’ या त्यांच्या प्रवासात जो दमदार आणि कसदार अभिनयाचा पट त्यांनी उभा केला, त्याला तोड नाही. त्यामुळे अभिनेता म्हणून त्यांचे जाणे ही मोठी हानी आहे. परखडपणा, बेधडकपणा हे स्वभावगुण त्यांचे व्यक्तिमत्त्व खुलवणारे ठरले. पण मी मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांच्यातील हळवा माणूस कायम पाहत आलो आहे. आम्ही जलयुक्त शिवार अभियान हाती घेतले, तेव्हा त्याला पाठिंबा देण्यासाठी स्वतः नाना पुढे आले होते. मकरंद अनासपुरेजी आणि त्यांनी सोबत येत ‘नाम फाऊंडेशन’ची स्थापना केली आणि स्वतः शिवारात जाऊन काम केले. शेतकऱ्यांसाठी मदत करणे असो, दुष्काळी कालखंडात मदतीचा हात पुढे करणे असो, नाना कायम अग्रणी राहिले. यंदाही आपण दुष्काळाचा सामना करीत असताना नाना कधीच मागे राहिले नसते, पण ते अचानक सोडून निघून गेले. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या, चाहत्यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. ॐ शांति

  • 08 Oct 2026 08:47 AM (IST)

    Nana Patekar Passes Away: प्रताप सरनाईक यांची प्रतिक्रिया

    प्रताप सरनाईक म्हणाले, “नाना गेले… पण नानांचा आवाज, त्यांचा रांगडा अभिनय, त्यांच्या संवादातील धार आणि माणुसकीची ऊब कधीच जाणार नाही… रंगभूमीपासून रुपेरी पडद्यापर्यंत आपल्या असामान्य अभिनयाने अनेक पिढ्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन मनाला चटका लावून जाणारे आहे. त्यांच्या जाण्याने केवळ एक अभिनेता हरपला नाही, तर मराठी मातीशी नाळ जोडलेला एक संवेदनशील, ताकदीचा आणि अस्सल कलावंत काळाच्या पडद्याआड गेला आहे. नानांनी साकारलेली प्रत्येक व्यक्तिरेखा जिवंत होती… कारण त्या व्यक्तिरेखेत नानांचा आत्मा असायचा. त्यांचा आवाज कानावर पडला की आजही अंगावर शहारा येतो आणि त्यांचा पडद्यावरील चेहरा डोळ्यांसमोर आला की मन नकळत भावुक होते. नाना पाटेकर नावाचा हा ‘अभिनयाचा विद्यापीठ’ आता प्रत्यक्षात नसला, तरी त्यांच्या कलेच्या रूपाने तो सदैव आपल्या सोबत राहील. भावपूर्ण श्रद्धांजली! ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो आणि त्यांच्या कुटुंबीयांना व असंख्य चाहत्यांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो.”

  • 08 Oct 2026 08:46 AM (IST)

    Nana Patekar Passes Away: नाना पाटेकर यांच्या निधनाच्या बातमीने रोहित पवार यांना दु:ख

    रोहित पवार म्हणाले,  “सामाजिक जाण आणि भान असलेले ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याचं वृत्त अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारं आहे. त्यांच्या निधनाने भारतीय चित्रपटसृष्टीने एक संवेदनशील, प्रभावी आणि अष्टपैलू कलाकार गमावला आहे. ‘परिंदा’, ‘क्रांतिवीर’, ‘प्रहार’, ‘खामोशी’, ‘अग्निसाक्षी’, ‘नटसम्राट’, ‘वेलकम’ यांसारख्या असंख्य चित्रपटांमधून त्यांनी आपल्या दमदार अभिनयाची अमीट छाप उमटवली. पडद्यावरील अभिनयासोबतच ‘नाम फाउंडेशन’च्या माध्यमातून शेतकरी, दुष्काळग्रस्त आणि ग्रामीण भागातील जनतेसाठी केलेले त्यांचं सामाजिक कार्य त्यांच्या संवेदनशील मनाची साक्ष देणारं आहे. कलेच्या माध्यमातून लाखो मनांवर अधिराज्य गाजवणाऱ्या आणि सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या या महान कलाकाराला माझी भावपूर्ण श्रद्धांजली. ॐ शांती!”

  • 08 Oct 2026 08:44 AM (IST)

    आशिष शेलार यांनी हळहळ व्यक्त केली

    आशिष शेलार यांच्याकडून शोक व्यक्त, म्हणाले, “करारी अभिनेता आपण गमावला ! मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील आपल्या अभिनयाने अजरामर ठसा उमटविणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. आपल्या दमदार अभिनयाने अनेक भूमिका जिवंत करणाऱ्या नानांनी रंगभूमी, चित्रपट आणि सामाजिक कार्याच्या माध्यमातून आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. त्यांच्या जाण्याने भारतीय चित्रपटसृष्टीने एक संवेदनशील, करारी, प्रतिभावान आणि अस्सल कलावंत गमावला आहे. महाराष्ट्र शासनानाच्या वतीने देण्यात येणाऱ्या स्वर्गीय राज कपूर विशेष योगदान पुरस्कार २०१३ पुरस्कारासह चित्रपट क्षेत्रातील अनेक पुरस्कारांचे ते मानकरी ठरले होते. मध्यमवर्गीय कामगार मराठी कुटुंबातून पुढे आलेल्या नाना पाटेकर यांनी अपार मेहनत व आपल्या वेगळ्या शैलीने अभिनयात ठसा उमटवला. आमच्या गिरणगावातील एक अस्सल, इरसाल, उत्सव प्रेमी मराठी माणूस आम्ही आज गमावला आहे. नाना पाटेकर यांच्या स्मृतींना भावपूर्ण श्रद्धांजली! ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो. त्यांच्या असंख्य चाहत्यांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो. ॐ शांती! 

  • 08 Oct 2026 08:42 AM (IST)

    जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया

     जितेंद्र आव्हाड म्हणाले,” ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले,हे वृत्त अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणार आहे.गेली 5 दशके आपल्या अष्टपैलू अभिनयाच्या जोरावर सिनेसृष्टीवर अधिराज्य गाजवणाऱ्या या नटसम्राटाला भावपूर्ण श्रद्धांजली..!!”
  • 08 Oct 2026 08:40 AM (IST)

    Nana Patekar Passes Away: महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी व्यक्त केले दु:ख

    महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दु:ख व्यक्त केले आहे, त्या म्हणाल्या, “अभिनयाचा एक युगपुरुष हरपला… ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाची बातमी मनाला अक्षरशः चटका लावणारी आहे. अभिनयाचा अस्सल आविष्कार आणि संवेदनशील सामाजिक जाणिवांचा सुंदर संगम असलेल्या नानांनी रंगभूमीपासून रुपेरी पडद्यापर्यंत आपल्या दमदार अभिनयाने असंख्य व्यक्तिरेखा अजरामर केल्या. ‘नटसम्राट’, ‘क्रांतिवीर’, ‘परिंदा’ यांसारख्या कलाकृतींमधून त्यांनी आपल्या अभिनयाची अमीट छाप उमटवली. नाना पाटेकर यांचे दादांशी अतिशय जिव्हाळ्याचे आणि आपुलकीचे संबंध होते. त्यामुळे त्यांच्या निधनाने झालेली पोकळी माझ्यासाठी आणि आमच्या कुटुंबासाठीही विशेष दुःखद आहे. कलेसोबतच सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी समाजातील वंचित घटक आणि शेतकरी बांधवांसाठी केलेले कार्यही सदैव प्रेरणादायी राहील. आज अभिनयविश्वातील एक संवेदनशील मन, एक दमदार आवाज आणि एक अस्सल कलाकार हरपला आहे. या अष्टपैलू, संवेदनशील कलाकाराला माझी भावपूर्ण श्रद्धांजली. नानांच्या स्मृती, त्यांच्या भूमिका आणि त्यांचे अमूल्य योगदान सदैव आपल्या मनात जिवंत राहील.”

  • 08 Oct 2026 08:37 AM (IST)

    मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हळहळ व्यक्त केली

    मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हळहळ व्यक्त केली आहे, ते म्हणाले,  “प्रख्यात अभिनेते, सशक्त नाट्य-कलाकार आणि संवेदनशील समाजसेवक पद्मश्री नाना पाटेकर जी यांचे निधन ही कलाविश्वासाठी कधीही भरून न येणारी हानी आहे. आपल्या असाधारण अभिनयाद्वारे त्यांनी भारतीय चित्रपटसृष्टी समृद्ध केली, तसेच सामाजिक जाणीवेतून समाजाप्रती असलेली आपली बांधिलकीही जपली. भगवान श्रीराम दिवंगत आत्म्यास आपल्या श्रीचरणांशी स्थान देवोत आणि शोकाकुल परिवार व चाहत्यांना हे दुःख सहन करण्याचे बळ देवोत, हीच प्रार्थना. ॐ शांती.”

  • 08 Oct 2026 08:35 AM (IST)

    केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही व्यक्त केला शोक

    केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही व्यक्त केला शोक, म्हणाले, “भारतीय चित्रपट सृष्टीतील दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाचे वृत्त अतिशय धक्कादायक आणि दुःखद आहे. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. नानांचे आणि माझे अतिशय जवळचे आणि मैत्रीपूर्ण संबंध होते. आपल्या दमदार अभिनयाने पाच दशकांहून अधिक काळ नाना पाटेकर यांनी मराठी व हिंदी चित्रपटांच्या माध्यमातून रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. आपल्या वैशिष्ट्यपूर्ण संवाद शैलीने त्यांनी चित्रपटातील अनेक पात्रे अजरामर केली व आपली वेगळी ओळख निर्माण केली. त्यांचे जाणे ही भारतीय चित्रपटसृष्टीची मोठी हानी आहे. ‘नाम फाऊंडेशन’च्या माध्यमातून पाणी संरक्षण, संचयन क्षेत्रांत महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय आणि महत्त्वपूर्ण आहे. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांसाठी त्यांनी दिलेला मदतीचा हात अनेक कुटुंबांचा आधार बनला. नाना एक उत्तम कलाकार-अभिनेते असण्याबरोबरच समाजाप्रती संवेदनशील असलेले एक व्यक्तिमत्त्व होते. ईश्वर दिवंगत आत्म्यास शांती प्रदान करो. ॐ शांती.”

  • 08 Oct 2026 08:33 AM (IST)

    नाना पाटेकर यांच्या बातमीने रितेश देशमुख यांना धक्का बसला

    रितेश देशमुख यांना धक्का बसला आहे. अभिनेते आणि सहकलाकार रितेश देशमुख यांनी ‘एक्स’ (X) वर लिहिले: “मला शब्दांत व्यक्त करता येणार नाही इतका मोठा धक्का बसला आहे. जणू काही एखाद्या ट्रकची धडक बसली आहे, असे वाटत आहे. नाना पाटेकर जी यांच्या निधनाची बातमी ऐकून अत्यंत दुःख झाले. अभिनयात अद्वितीय आणि कोणाचीही बरोबरी होऊ शकत नाही असे व्यक्तिमत्त्व; त्यांनी आपल्या अनोख्या शैलीने आणि अभिनयाच्या खास ठसक्याने लोकांच्या हृदयात स्वतःचे स्थान निर्माण केले. अशी कोणतीही भूमिका किंवा पात्र नव्हते जे ते साकारू शकले नाहीत. मग तो भव्य-दिव्य नायक असो, भीतीदायक खलनायक असो किंवा त्यांचा तो भावशून्य चेहऱ्याचा (poker-faced) विनोदी अभिनय असो – त्यांनी प्रत्येक भूमिका लीलया पेलली. ते पडद्याबाहेरही खरे नायक होते आणि जनहितार्थ आपल्या सेवाभावी कार्याद्वारे त्यांनी अविरत काम केले. ‘ब्लफमास्टर’ आणि ‘हाऊसफुल ५’ मध्ये त्यांच्यासोबत काम करण्याचे भाग्य मला लाभले, परंतु एखाद्या मराठी चित्रपटात त्यांच्यासोबत काम करण्याची माझी इच्छा मात्र कायमची अपूर्णच राहील. त्यांचे कुटुंब, आप्तस्वकीय आणि लाखो चाहत्यांप्रती मी माझ्या मनापासून संवेदना व्यक्त करतो. खरोखरच, एका युगाचा अंत झाला आहे. तुमचे मार्गदर्शन, आपल्या गप्पा, माझ्या पाठीवर दिलेली शाबासकीची थाप, आपण एकत्र अनुभवलेला हास्यविनोद आणि एक व्यक्ती म्हणून मला समृद्ध केल्याबद्दल तुमचे आभार. तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली!!!!”

  • 08 Oct 2026 08:31 AM (IST)

    नील नितीन मुकेशने व्यक्त केले दु:ख

    नील नितीन मुकेशने नाना पाटेकर यांच्या निधनाच्या बातमीवर प्रतिक्रिया देताना म्हटले  आहे, ” नाना पाटेकर जी यांच्या निधनामुळे अत्यंत दुःख झाले आहे. अभिनयात अद्वितीय कौशल्य असलेल्या आणि स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या अशा या महान कलाकाराला भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या दमदार अभिनयाची आठवण सदैव राहीलच, पण त्यासोबतच असंख्य उदयोन्मुख कलाकारांना स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी त्यांनी दिलेली प्रेरणा आणि बळही कायम स्मरणात राहील. भारतीय चित्रपटसृष्टीतील एक खरा दिग्गज. सर, तुमचा वारसा सदैव जिवंत राहील. ओम शांती.

  • 08 Oct 2026 08:29 AM (IST)

    पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांनी व्यक्त नाना पाटेकर यांच्या निधनावर व्यक्त केला शो

    पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांनी व्यक्त नाना पाटेकर यांच्या निधनावर व्यक्त केला शोक. पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी ‘एक्स’ (X) वर लिहिले: “प्रख्यात अभिनेते श्री. नाना पाटेकर यांच्या अचानक निधनाची अत्यंत दुःखद बातमी ऐकून मला मोठा धक्का बसला असून माझे मन हेलावून गेले आहे. भारतीय चित्रपटसृष्टीने आपला एक अत्यंत प्रभावी, अस्सल आणि ज्याची जागा कोणीही भरून काढू शकत नाही असा आवाज गमावला आहे. नानाजींनी केवळ भूमिका साकारल्या नाहीत, तर त्यांनी प्रत्येक पात्रात जिवंत आणि निर्भीड सत्य ओतले. ‘परिंदा’, ‘क्रांतीवीर’ आणि ‘प्रहार’ मधील स्फोटक अभिनयापासून ते ‘अब तक छप्पन’ मधील उत्कट तीव्रतेपर्यंत, त्यांच्या अभिनयाने असा एक मापदंड प्रस्थापित केला ज्यापर्यंत पोहोचण्याची आशा फार कमी लोक करू शकतात. रुपेरी पडद्यापलीकडे, त्यांची साधेपणा, अगाध नम्रता आणि सामाजिक कार्ये व ग्रामीण समुदायांप्रती असलेली निस्वार्थ निष्ठा यांतून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे खरे मोठेपण दिसून येत असे.”

  • 08 Oct 2026 08:28 AM (IST)

    कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार नाना पाटेकर यांच्या निधनावर काय म्हणाले?

    कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार नाना पाटेकर म्हणाले,” ज्येष्ठ अभिनेते श्री. नाना पाटेकर यांच्या निधनामुळे अत्यंत दुःख झाले आहे. आपल्या असाधारण प्रतिभेने, पडद्यावरील प्रभावी उपस्थितीने आणि अविस्मरणीय अभिनयाने त्यांनी भारतीय चित्रपटसृष्टीला काही अत्यंत अविस्मरणीय पात्रे दिली आहेत. पडद्यापलीकडे, शेतकऱ्यांविषयीची त्यांची तळमळ आणि समाजसेवेप्रती असलेली त्यांची निष्ठा त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील खोली दर्शवते. या कठीण काळात त्यांच्या कुटुंबीयांना आणि चाहत्यांना मी माझ्या मनापासून संवेदना व्यक्त करतो. ओम शांती.”

  • 08 Oct 2026 08:24 AM (IST)

    नाना पाटेकर यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, नेमकं काय घडलं?

    नाना पाटेकर यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. गोव्यातील डोना पावलामधील घरी हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना मणिपाल रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र तिथेच उपचारादरम्यान नाना पाटेकर यांचं निधन झाल्याची माहिती समोर आली. मणिपाल रुग्णालयाचे कर्करोग विभाग प्रमुख डॉ. शेखर सालकर यांनी 45 मिनिटे सतत सीपीआर देऊनही नाना पाटेकर यांना वाचवता आले नाही.

  • 08 Oct 2026 08:18 AM (IST)

    नाना पाटेकर यांच्या निधनाची बातमीवर जयवंत वाडकर यांची प्रतिक्रिया

    नाना पाटेकर यांच्या निधनाची बातमी समजताच जयवंत वाडकर म्हणाले की, ” मला कळलं आताच खरं तर शब्द सुचत नाहीये, खरंच काय बोलू मी, एवढं काम त्याच्याबरोबर केले आहे, आमची सुरुवात त्याच्यासोबत झाली आहे, सतिश पुळेकर आमचे गुरु, आमच्या सगळ्या वन एक्च प्लेला गायडन्स करणं, म्हणजे आता खूप खूप आठवणी आठवतं आहे,  त्याच्यासोबत शेवटचे काम केले होते ते नटसम्राटमध्ये, त्या चित्रपटातील आठवणी तर आहेतच. “

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन झाले आहे. वयाच्या ७५ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. या ज्येष्ठ अभिनेत्याचे डोना पौला येथील एका खाजगी रुग्णालयात निधन झाले. ते गोव्यातील डोना पौला येथील त्यांच्या घरी बेशुद्ध अवस्थेत आढळले आणि त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. असे वृत्त आहे की, नाना पाटेकर यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला, त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी सुमारे ४५ मिनिटे त्यांच्यावर उपचार करण्यात आले पण बॉडीने काही रिस्पॉन्स केला नसल्याने शेवटची त्यांना मृत घोषित केले. आता या बातमीनंतर अनेकांना झटका बसला आहे, राजकीय क्षेत्रातून, अभिनय क्षेत्रातून त्यांच्या निधनाच्या बातमीने शोकाकुळ व्यक्त केला जात आहे.

Published On - Oct 08,2026 8:14 AM

Follow Us
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकून मोठा धक्का बसला- सुप्रिया सुळे
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकून मोठा धक्का बसला, मी... सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकताच... मराठी सिनेसृष्टीतील...
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकताच... मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्याची भावनिक प्रतिक्रिया
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांचं निधन; वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेर
Nana Patekar | ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांचं निधन; वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेर
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आज तोडगा? दोन मंत्री पुण्यात येणार...
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आज तोडगा? दोन मंत्री पुण्यात येणार, रोहित पवारांची मोठी माहिती
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं