AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“जिथं संकट तिथं नाना पाटेकर मदतीला…”, गोव्यातील जीएमसी रुग्णालयात अंत्यदर्शनानंतर शरद पवार भावुक

Nana Patekar Passes Away : नाना पाटेकर यांचं आज पहाटे गोव्यात निधन झालं. त्यांच्या निधनाने अनेकांना धक्का बसला. थोड्याच वेळापूर्वी शरद पवार गोव्यातील जीएमसी रुग्णालयात पोहचले. नानांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शनानंतर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. त्यावेळी ते भावुक झाले होते.

जिथं संकट तिथं नाना पाटेकर मदतीला..., गोव्यातील जीएमसी रुग्णालयात अंत्यदर्शनानंतर शरद पवार भावुक
शरद पवार, नाना पाटेकर
| Updated on: Oct 08, 2026 | 1:20 PM
Share

Sharad Pawar on Nana Patekar: अत्यंत संवेदनशील अभिनेते नाना पाटेकर यांचे आज पहाटे निधन झाले. 75 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने सिनेसृष्टी आणि नाट्य क्षेत्रात शोककळा पसरली आहे. राज्याचा राजकारणापासून ते समाजकारणापर्यंत अनेक दिग्गजांनी त्यांच्या जाण्याने शोक व्यक्त केला. दरम्यान ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी तातडीने गोवा जवळ केले. गोव्यातील जीएमसी रुग्णालयात त्यांनी नानांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतले. त्यानंतर माध्यमांना सामोरं जाताना ते भावुक झाल्याचे दिसले. त्यांनी नाना पाटेकर यांच्यासोबतच्या आठवणींना आणि त्यांच्या कार्याला यावेळी उजाळा दिला.

नाना पाटेकर लोकांच्या मदतीला धावून जात

“नाना पाटेकर आता आपल्यात नाहीत. हे अत्यंत दुःखद आहे. ते अनेक ठिकाणी योगदान देणारे देशाचे नागरीक होते. जिथे जिथे संकट असेल, तिथे लोकांना मदत करण्यासाठी ते जात. मला आठवतंय 5 वर्षांपूर्वी महाराष्ट्रात दुष्काळ पडला होता. त्यावेळी नाना आणि मकरंद अनासपुरे यांनी नाम फाऊंडेशन नावाने शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी संस्था स्थापन केली होती. जे संकटात आहेत, त्यांना मदत केली होती. आम्ही अनेक वर्षांपासून एकमेकांना ओळखतो. माझ्या पुणे जिल्ह्यात ते राहत होते. ते मदतीला धावून जात असत. त्यांच्या कुटुंबियांना बळ मिळो अशी प्रार्थना करतो.” अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी यावेळी दिली.

चित्रपटसृष्टीतील प्रभावी पर्व संपले

तर सकाळी नाना पाटेकर यांच्या निधनाची वार्ता समजल्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर भावनांना वाट मोकळी करून दिली. त्यांनी एक्सवर एक पोस्ट लिहिली. नाना पाटेकर यांच्या जाण्याने भारतीय सिनेसृष्टीतील एक असामान्य, संवेदनशील आणि प्रभावी पर्व संपल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाचे दुःखद वृत्त अत्यंत वेदनादायी आहे. त्यांच्या जाण्याने भारतीय चित्रपटसृष्टीतील एक असामान्य, संवेदनशील आणि प्रभावी पर्व आज संपले आहे. आपल्या दमदार अभिनयाने, आगळ्या संवादफेकीने आणि प्रत्येक भूमिकेतील विलक्षण सहजतेने त्यांनी रसिकांच्या मनावर कायमची अमिट छाप उमटवली. परिंदा, क्रांतिवीर, अग्निसाक्षी, अब तक छप्पन, वेलकम, नटसम्राट अशा अनेक चित्रपटांमधून त्यांच्या अभिनयाचे विविध पैलू रसिकांना अनुभवायला मिळाले, असे या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले आहे.

Follow Us
अखेरचा कॉले केला तो देखील... नाना पाटेकरांच्या 'नाम फाऊंडेशन'च्या...
अखेरचा कॉले केला तो देखील... नाना पाटेकरांच्या 'नाम फाऊंडेशन'च्या पदाधिकाऱ्याने दिली मोठी माहिती
चेहऱ्यावर निखळ आनंद आणि साधे हावभाव...नाना पाटेकरांचा व्हिडीओ...
चेहऱ्यावर निखळ आनंद आणि साधे हावभाव... नाना पाटेकरांचा अखेरचा व्हिडीओ पाहून चाहत्यांचे डोळे पाणावले
नाना पाटेकर यांच्या निधनाने उद्धव ठाकरे भावुक; म्हणाले, 'विश्वासच...
नाना पाटेकर यांच्या निधनाने उद्धव ठाकरे भावुक; म्हणाले, 'विश्वासच बसत नाही की...
नाना पाटेकरांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा; CM फडणवीसांची भावनिक...
नाना पाटेकरांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा; CM फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया, म्हणाले...
नाना पाटेकरांच्या निधनाने सुनेत्रा पवार भावुक; म्हणाल्या...
नाना पाटेकरांच्या निधनाने सुनेत्रा पवार भावुक; म्हणाल्या, ‘सिनेसृष्टीतल ही पोकळी भरून निघणार नाही’
डॉक्टरांचं पथक घरी पोहोचलं तेव्हा नाना पाटेकर बेशुद्ध अवस्थेत होते...
डॉक्टरांचं पथक घरी पोहोचलं तेव्हा नाना पाटेकर बेशुद्ध अवस्थेत होते; 45 सीपीआर दिला मात्र...  काय घडलं?
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकून मोठा धक्का बसला- सुप्रिया सुळे
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकून मोठा धक्का बसला, मी... सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकताच... मराठी सिनेसृष्टीतील...
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकताच... मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्याची भावनिक प्रतिक्रिया
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांचं निधन; वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेर
Nana Patekar | ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांचं निधन; वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेर
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आज तोडगा? दोन मंत्री पुण्यात येणार...
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आज तोडगा? दोन मंत्री पुण्यात येणार, रोहित पवारांची मोठी माहिती