केंद्र सरकारने कृषी कायदे रद्द करावेत, अन्यथा आंदोलनात सहभागी होणार: नाना पटोले

१७ डिसेंबर पर्यंत केंद्र सरकारने हे कायदे रद्द केले नाही तर आम्ही सुद्धा या आंदोलनात सहभागी होऊ, असा इशारा नाना पटोलेंनी दिला आहे. (Nana Patole Modi Govt)

केंद्र सरकारने कृषी कायदे रद्द करावेत, अन्यथा आंदोलनात सहभागी होणार: नाना पटोले

गोंदिया: देशात शेतकऱ्यांचं कृषी कायद्याविरोधात आंदोलन सुरु आहे. केंद्र सरकारनं केलेले तीन कायदे रद्द करावेत, यासाठी मागील १५ दिवसापासून देशातील शेतकरी दिल्लीत धडकले आहेत. त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्राच्या विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी मोदींना पात्र पाठवून हा कायदा रद्द करावा, अशी मागणी केली केली आहे. (Nana Patole demanded to Modi Govt cancelled agriculture)

नाना पटोले यांनी संविधानिक खुर्चीवर जरी बसलो असलो तरी तरी मी शेतकरी आहे, असा उल्लेख केला आहे. तर, २०१७ मध्ये शेतकऱ्यांच्या विषयाला घेऊन नाना पटोले यांनी खासदारकीचा राजीनामा दिला होता. मात्र, आता पुन्हा १७ डिसेंबर पर्यंत केंद्र सरकारने हे कायदे रद्द केले नाही तर आम्ही सुद्धा या आंदोलनात सहभागी होऊ, असा इशारा नाना पटोलेंनी दिला आहे.

पटोलेंचे नरेंद्र मोदींना पत्र

विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी गोंदिया येथे बोलताना,”मी पहिल्यांदा शेतकरी आहे. केंद्र सरकारनं शेतकऱ्यांवर अन्याय करणारे काळे कायदे आणले आहेत. जिथं शेतकऱ्यांवर अन्याय होत असेल त्याविरोधी आंदोलनात सहभागी होऊन त्यांना पाठिंबा देणे माझे कर्तव्य आहे, असेही ते म्हणाले. (Nana Patole demanded to Modi Govt cancelled agriculture)

दिल्लीत केंद्र सरकारच्या विरोधात कोट्यावधी शेतकरी आंदोलन करत आहेत.नरेंद्र मोदी यांनी यामध्ये लक्ष घालावे. मात्र, त्यांनी अजूनही या प्रकरणी लक्ष घातले नाही. टिकरी बॉर्डरवर शेतकरी मृत्यू पावला. संविधानिक पदावर असलो तरी मी पहिल्यांदा शेतकरी आहे. काळे कायदे रद्द केले नाही तर आंदोलनात सहभागी होऊ, असा इशारा विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे.

केंद्र सरकारचे चर्चेचे आवाहन

दरम्यान, कृषी कायद्याच्या मुद्द्यावरून गेल्या 15 दिवसांपासून शेतकरी आणि केंद्र सरकारमध्ये जोरबैठका सुरू असून त्यातून काहीही तोडगा निघालेला नाही. त्यामुळे केंद्र सरकारने पुन्हा एकदा आंदोलक शेतकऱ्यांना चर्चेची नवी तारीख देण्यास सांगितलं आहे. आम्हाला ईगो नाही. आम्ही चर्चेला तयार आहोत, असं केंद्र सरकारकडून सांगण्यात आलं आहे.

केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी पत्रकार परिषद घेऊन हे आवाहन केलं आहे. शेतकऱ्यांना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जोखडातून मुक्त करण्याची आमची इच्छा आहे. शेतकऱ्यांच्या मालाच्या खरेदी-विक्रीवर टॅक्स लागू नये त्यासाठी आमचा प्रयत्न आहे, असं तोमर यांनी सांगितलं. तसेच शेतकरी संघटनांनी चर्चेची तारीख सांगावी, आम्ही त्यांचे संपूर्ण समाधान होईपर्यंत चर्चा करण्यास तयार आहोत, असंही ते म्हणाले.(Nana Patole demanded to Modi Govt cancelled agriculture)

संबंधित बातम्या:

BHARAT BAND | शेतकऱ्यांच्या ‘भारत बंद’चा देशभरात परिणाम, कुठे परिक्षा रद्द, रेल्वे अडवल्या, तर कुठे नवदाम्पत्य फसलं!

‘आजच्या आंदोलनात फूट पाडण्याचेही प्रयत्न करायचे असेच सत्ताधाऱ्यांचे मनसुबे’

(Nana Patole demanded to Modi Govt cancelled agriculture)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI