नाणार परत येणार? पडद्याआड काय काय घडतंय? मुख्यमंत्री भेट देणार?

रिफायनरी प्रकल्प समर्थ समन्वय समितीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना (Uddhav Thackeray) भेटीसाठी वेळ मागितल्याने प्रशाकीय पातळीवर नेमंक काय घडत आहे; हा प्रश्न सर्वांना पडत आहे.

नाणार परत येणार? पडद्याआड काय काय घडतंय? मुख्यमंत्री भेट देणार?
नाणार प्रकल्पावर चर्चा करण्यासाठी नाणार रिफायनरी प्रकल्प समन्वय समितीने मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी वेळ मागितली आहे.
Follow us
| Updated on: Jan 21, 2021 | 9:47 AM

रत्नागिरी : नाणार रिफायनरी प्रकल्पाच्या (Nanar project) समर्थनार्थ घडामोडींना वेग आला आहे. रिफायनरी प्रकल्प समर्थ समन्वय समितीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी वेळ मागितली आहे. शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी 3 जानेवारी 2021 रोजी नाणार प्रकल्पाबाबत एक मोठं विधान केलं होतं. त्यांनी नाणार प्रकल्पासाठी जमिनी खरेदी-विक्रीचे करण्यात आलेले सर्व व्यवहार रद्द करण्यात येणार असल्याचा दावा केला होता. त्यानंतर आता रिफायनरी प्रकल्प समर्थ समन्वय समितीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना (Uddhav Thackeray) भेटीसाठी वेळ मागितल्याने प्रशाकीय पातळीवर नेमंक काय घडत आहे; हा प्रश्न सर्वांना पडला आहे. तसेच नाणार प्रकल्पाविषयी तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. (Nanar project supporters demands time to meet chief minister Uddhav Thackeray)

मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेकडे लक्ष

रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या सीमेवर उभारण्यात येणाऱ्या नाणार प्रकल्पाला शिवसेनेने विरोध केला होता. शिवसेनेच्या विरोधामुळे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांना या प्रकल्पाला स्थगिती द्यावी लागली होती. त्यानंतर आता राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. या सरकारच्या कार्यकाळाततरी नाणार रिफायनरी प्रकल्पाचे काम सुरु व्हावे अशी अपेक्षा नाणार प्रकल्पाचे समर्थन करणाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

या पार्श्वभूमीवर आता नाणार रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनार्थ अनेक घडामोडी घडत आहेत. रिफायनरी प्रकल्प समर्थ समन्वय समितीने मुख्य़मंत्र्यांना भेटण्यासाठी वेळ मागितली आहे. या समन्वय समितीमध्ये एकूण 45 संघटाना आहेत. विशेष म्हणजे समितीने आपल्या लेडरहेडवर पत्र लिहून मुख्यमंत्र्यांना वेळ मागितल्याचे समितीचे अध्यक्ष शशिकांत सुतार यांनी सांगितले आहे. समितीच्या या मागणीनंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय भूमिका घेतील याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.

जमिनी खरेदी-विक्रीचे व्यवहार रद्द होणार

नाणार रिफायनरी प्रकल्पासाठी ज्या जमिनींचे खरेदी व्यवहार झाले होते, ते सर्व व्यवहार रद्द करण्यात येणार असल्याचे यापूर्वी विनायक राऊत यांनी सांगितले होते. “नाणार प्रकल्पासाठी शेतकऱ्यांनी 7 लाख रुपये एकराने त्यांच्या जमिनी विकल्या. हा प्रकल्प झाला तर त्याचे मूल्य 90 लाख एकरी होणार आहे. दलालांनी जमिनी लाटून शेतकऱ्यांची लुबाडणूक केली आहे. 224 गुजराती आणि मारवाडी लोकांनी या जमिनी विकत घेतल्या आहेत. त्यामुळे हे सर्व व्यवहार रद्द करण्यात येईल,” असं राऊत म्हणाले होते. त्यांच्या या विधानानंतर रिफायनरी प्रकल्प रद्द करण्यात येणार असल्याची शक्यता वर्तविली जात होती.

दरम्यान, या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाणार प्रकल्प समर्थन समन्वय समितीला भेटण्यासाठी वेळ देतील का?, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

संबंधित बातम्या :

नाणारवरुन शिवसेनेतच जुंपली, स्थानिक आमदार-खासदारांच्या मतांनी सेनेच्या भूमिकेबाबत संभ्रम

Pravin Darekar | नाणारबद्दल मुख्यमंत्र्यांकडून सकारात्मक निर्णयाची अपेक्षा : प्रवीण दरेकर

(Nanar project supporters demands time to meet chief minister Uddhav Thackeray)

Non Stop LIVE Update
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.