AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाणारच्या जमिनी शेतकऱ्यांना परत देणार, जमीन खरेदी-विक्रीचे सर्व व्यवहार रद्द करणार; राऊतांचा गौप्यस्फोट

नाणार प्रकल्प करण्यासाठी शिवसेनेने हालचाली सुरु केल्याच्या चर्चा सुरू असतानाच शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. (Vinyak Raut on Nanar refinery)

नाणारच्या जमिनी शेतकऱ्यांना परत देणार, जमीन खरेदी-विक्रीचे सर्व व्यवहार रद्द करणार; राऊतांचा गौप्यस्फोट
विनायक राऊत
| Updated on: Jan 03, 2021 | 1:27 PM
Share

सिंधुदुर्ग: नाणार प्रकल्प करण्यासाठी शिवसेनेने हालचाली सुरु केल्याच्या चर्चा सुरू असतानाच शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. नाणारमधील शेतकऱ्यांनी विकलेल्या जमिनी त्यांना परत देण्यात येणार आहे. नाणार प्रकल्पासाठी जमिनी खरेदी-विक्रीचे करण्यात आलेले सर्व व्यवहार रद्द करण्यात येणार असल्याचा दावा विनायक राऊत यांनी केला आहे. त्यामुळे नाणारवासियांना मोठा दिलासा मिळाला असून नाणार प्रकल्प होणार नसल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. (Vinyak Raut on Nanar refinery)

खासदार विनायक राऊत देवगडमध्ये आले होते. एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हा गौप्यस्फोट केला. नाणार रिफायनरी प्रकल्प कुठल्या परिस्थितीत होणार नाही, असं राऊत यांनी स्पष्ट केलं. नाणार प्रकल्पासाठी शेतकऱ्यांनी 7 लाख रुपये एकराने त्यांच्या जमिनी विकल्या. हा प्रकल्प झाला तर त्याचे मूल्य 90 लाख एकरी होणार आहे. दलालांनी जमिनी लाटून शेतकऱ्यांची लुबाडणूक केली आहे. 224 गुजराती आणि मारवाडी लोकांनी या जमिनी विकत घेतल्या आहेत. त्यामुळे हे सर्व व्यवहार रद्द करण्यात येईल, असं त्यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी नाणार प्रकल्पाचे समर्थक भाजपचे माजी आमदार प्रमोद जठार यांच्यावरही टीका केली.

नाणार प्रकल्प घोषित केल्यानंतर नाणारमध्ये 2200 एकर जमीन खरेदी करण्यात आली. तर अध्यादेश निघाल्यानंतर 800 एकर जमिनीची खरेदी झाली होती. हे व्यवहार संशयास्पद असल्याने त्याची चौकशी करण्यासाठी सरकारने आधीच चौकशी समिती बसवली आहे. त्यामुळे नाणारमधील जमीन खरेदीचे सर्व व्यवहार रद्द होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (Vinyak Raut on Nanar refinery)

दरम्यान, शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांनी नाणार प्रकल्पाचं समर्थन केलं होतं. 90 टक्के स्थानिकांनी मोबदला स्वीकारल्याने जैतापूर प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्याच धर्तीवर नाणार प्रकल्पात स्थानिकांचा विरोध मावळला तर महाविकास आघाडी पुढचा निर्णय घेईल, असं राजन साळवी यांनी म्हटलं होतं. त्यानंतर त्यांच्यावर पक्षातूनच टीका झाल्याने त्यांनी सारवासारव करत हे आपलं वैयक्तिक मत असल्याचं म्हटलं आहे. नाणारबाबत मी मांडलेली भूमिका ही माझी वैयक्तिक भूमिका आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवसेना आणि महाविकास आघाडीशी त्याचा कोणताही संबंध नाही, असं साळवी यांनी म्हटलं होतं. (Vinyak Raut on Nanar refinery)

संबंधित बातम्या:

प्रताप सरनाईकांच्या नावे 112 सातबारे; पुरावे घेऊन किरीट सोमय्या थेट ED कार्यालयात

शिवसेनेसोबत कायम राहायचंय, स्थानिक‌ पातळीवर जमवून घ्या, अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सूचना

भाजप आमदार देवयानी फरांदे यांचा आरोपीच्या समर्थनार्थ मोर्चा, नाशिकमध्ये गुन्हा दाखल

(Vinyak Raut on Nanar refinery)

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या