LIVE | उरणच्या चिरनेर खिंडींत महामार्गावर गॅस टँकरमधून वायूगळती

| Updated on: Dec 28, 2020 | 4:04 PM

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, मुंबईसह महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडी एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर

LIVE | उरणच्या चिरनेर खिंडींत महामार्गावर गॅस टँकरमधून वायूगळती

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 23 Dec 2020 11:33 PM (IST)

    उरणच्या चिरनेर खिंडींत महामार्गावर गॅस टँकरमधून वायूगळती

    चिरनेर ते खारपाडा मार्गावर टँकर पलटी होऊन गळती सुरु झाल्याने वाहतूक रोखण्यात आली आहे. पोलीस घटनास्थळी दाखल. याठिकाणी अग्नीशमन दल पाचारण करण्यात आले आहे. उरण तालुक्यातुन चिरनेर मार्गे मुंबई-गोवा हायवेवर पेणकडे येणाऱ्या मार्गावर ही घटना घडली.

  • 23 Dec 2020 11:04 PM (IST)

    भरधाव ट्रकची बैलगाडीला धडक; शेतकऱ्यासह बैल ठार

    वाशिमच्या पुसद महामार्गावर रेल्वे उड्डाणपुलानजीक भरधाव ट्रकची बैलगाडीला धडक. भीषण अपघातात शेतकरी पती पत्नी सह एक बैल ठार तर एक बैल गंभीर जखमी. शेतातून घरी येत असताना झाला अपघात. लक्ष्मण नकले (वय 60 ) आणि राजू बाई नकले ( वय 55 ) अशी मृतांची नावे.

  • 23 Dec 2020 11:01 PM (IST)

    विहंग गार्डन अनधिकृत बांधकाम; किरीट सोमय्या ठाणे महानगरपालिका आयुक्तांना भेटणार

    विहंग गार्डनच्या अनधिकृत बांधकाबाबात किरीट सोमय्या गुरुवारी ठाणे महानगरपालिका आयुक्तांची भेट घेणार. यापूर्वीही किरीट सोमय्या यांनी याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तेव्हाही सोमय्यांनी आयुक्त विपीन शर्मा यांची भेट घेतली होती.

  • 23 Dec 2020 09:53 PM (IST)

    मराठा समाजाला EWS आरक्षण देण्याच्या निर्णयाचे ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांच्याकडून स्वागत

    राज्य सरकारने मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) प्रवर्गातंर्गत आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाचे ओबीसी ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांच्याकडून स्वागत करण्यात आले आहे.

  • 23 Dec 2020 09:50 PM (IST)

    अहमदनगर: 767 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी पहिल्या दिवशी सहा अर्ज

    अहमदनगर: 767 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी पहिल्या दिवशी सहा अर्ज

    नगर तालुका- 3 श्रीरामपूर- 1 नेवासा -1 श्रीगोंदा- 1

  • 23 Dec 2020 09:19 PM (IST)

    राज्यात दिवसभरात कोरोनाचे 3,913 नवे रुग्ण; 7620 जणांना डिस्चार्ज

    राज्यात आज 3913 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 7620 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या 54573 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 94.51% झाले आहे.

  • 23 Dec 2020 09:02 PM (IST)

    MBBS, MD प्रवेशाचे रॅकेट उघड, सायन रुग्णालयातीलअसिस्टंट डीनसह 6 जणांना अटक

    मेडिकल कालेज मध्ये एमडी, एमबीबीएसला प्रवेश देणाऱ्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. या प्रकरणी सायन रुग्णालयाच्या असिस्टंट डीन राकेश रामनारायण वर्मा सोबत एक डॉक्टरला अटक करण्यात आली आहे. डॉ. राकेश वर्मा यांच्यावर एमडी मध्ये अ‌ॅडमिशन देण्याच्या नावाखाली 50 लाख रुपये घेतल्याच्या गंभीर आरोप करण्यात आला आहे. तर इतर एका प्रकरणात एमबीबीएस मध्ये प्रवेश देण्याच्या नावाखाली लाखो रूपयांची फसवणूक केल्याच्या आरोप करण्यात आलाय. दोन्ही प्रकरणात एकूण 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे.

  • 23 Dec 2020 08:43 PM (IST)

    एल्गार परिषदेला पुणे पोलिसांनी परवानगी नाकारली

    पुण्यात 31 डिसेंबरला आयोजित करण्यात आलेल्या एल्गाल परिषदेला पोलिसांनी परवानगी नाकारली.

  • 23 Dec 2020 08:34 PM (IST)

    GST ची खोटी बिलं सादर करणाऱ्यांना CBIC चा दणका, 365 जणांना अटक

    GST ची खोटी बिलं सादर करणाऱ्यांना CBIC नं दणका दिला आहे.  खोटी बिलं प्रकरणी 12 हजार प्रकरणांमध्ये 365 जणांना अटक करण्यात आल्याची माहिती सीबीआयसीनं दिली आहे.

    केंद्रीयअप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क बोर्डाचे ट्विट

  • 23 Dec 2020 08:05 PM (IST)

    EWS च्या निर्णयावरून मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी आक्रमक

    पुण्यातील मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. राज्य सरकारने एसईबीसीच्या उमेदवारांना EWS चा लाभ देण्याचा निर्णय घेतल्यानं मराठा समाज संतप्त झालाय. उद्या मराठा समाजाचे समन्वयक पुण्यात येणार एकत्र आहेत. गुरुवारी सकाळी पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली जाईल.

  • 23 Dec 2020 08:00 PM (IST)

    EWS च्या निर्णयावरून मराठा समाज संतप्त; पुण्यातील मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी आक्रमक

    राज्य सरकारने मराठा समाजाला EWS अंतर्गत शिक्षण आणि नोकरीत आरक्षण देण्याच्या निर्णय घेतल्यानंतर मराठा क्रांती मोर्चा पुन्हा आक्रमक होण्याची शक्यता आहे. EWS च्या निर्णयावरून मराठा समाज संतप्त. उद्या मराठा समाजाचे समन्वय पुण्यात येणार एकत्र. पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट करणार.

  • 23 Dec 2020 07:56 PM (IST)

    पुणे मनपा हद्दीतील 23 गावांचा समावेशाचा निर्णय राजकीय हेतूने: चंद्रकांत पाटील

    राज्य सरकारचा पुणे महापालिका हद्दीत 23 गावांचा समावेश करण्याचा निर्णय हा घिसाडघाईने आणि राजकीय हेतू डोळ्यापुढे ठेऊन घेतला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी 23 गावांच्या पुणे महापालिका हद्दीत समावेशावरुन राज्य सरकारवर टीका केली आहे.

  • 23 Dec 2020 07:35 PM (IST)

    ठाण्यातून जाणाऱ्या बुलेट ट्रेनला सेनेचा विरोध, ठाणे महापालिकेत ठराव मंजूर

    मुंबईच्या मेट्रो आणि बुलेट ट्रेन जागे संधर्भात वाद सुरु असताना  ठाण्यातून जाणाऱ्या बुलेट ट्रेनला शिवसेनेने विरोध केला आहे.आजच्या ऑनलाईन महासभेत ठाणे महापालिका हद्दीतून म्हणजेच शीळ डायघर व इतर गावातून जाणारी बुलेट ट्रेनची जागा त्याबाबत सर्वपक्षीयांनी या प्रस्तावाला नामंजूर करत पाठींबा दर्शवला आहे. त्यामध्ये भाजपने देखील पाठिंबा दिला असल्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी सांगितले.

  • 23 Dec 2020 07:23 PM (IST)

    कंगनाला न्यायालयाकडून आणखी एक दणका

    दिंडोशी न्यायालयानं कंगनाच्या खार मधील घरात केलेले वाढीव बांधकाम अनधिकृत असल्याचं जाहीर केलंय. या निर्णयाविरोधात हायकोर्टात अपिल करण्यासाठी कंगनाला 6 आठवड्यांची मुदत देण्यात आलीय.

  • 23 Dec 2020 07:08 PM (IST)

    मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना आणि बेरोजगारांना EWS चा लाभ मिळणार: अनिल परब

    राज्य मंत्रिमंडळाने एसईबीसी उमेदवारांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आरक्षणाचा लाभ देण्याचा निर्णय घेतला. शैक्षणिक प्रवेश, सेवाभरतीसाठी देणार हा निर्णय त्वरित अमलात येईल, असं परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितले. मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना आणि बेरोजगारांना याचा लाभ मिळणार आहे, असंही ते म्हणाले.

  • 23 Dec 2020 07:02 PM (IST)

    पुण्यात कात्रजचे दूध महागणार; गायीच्या दूधात १ तर म्हशीचे दूध २ रुपयांनी महाग

    पुण्यात कात्रजचे दूध महागणार; गायीच्या दूधात १ तर म्हशीचे दूध २ रुपयांनी महागणार आहे. येत्या १ जानेवारीपासून गायीच्या दूधासाठी १ रुपया तर म्हशीच्या दूधासाठी २ रुपये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची ६१वी वार्षिक सर्वसाधारण सभेत हा निर्णय घेण्यात आला.

  • 23 Dec 2020 06:59 PM (IST)

    पुणे महापालिका हददीत २३ गावांचा अखेर समावेश, अध्यादेश जारी

    पुणे महापालिकेच्या हद्दवाढीवर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. महापालिका क्षेत्राला लागून असलेल्या 23 गावांचा महापालिकेत समावेश करण्याच्या निर्णयाचा अध्यादेश जारी करण्यात आला आहे.

  • 23 Dec 2020 06:48 PM (IST)

    असंगब दरम्यान मालगाडीचे इंजिन बंद पडले, लांब पल्ल्याच्या गाड्या रखडल्या

    असंगब दरम्यान मालगाडीचे इंजिन बंद पडल्याने लांब पल्ल्याच्या गाड्या रखडल्या. लखनौ,नंदिग्राम एक्सप्रेस रखडल्या. तर अटगाव खर्डी येथे जाणारे प्रवासी पायी चालत  निघाले.

  • 23 Dec 2020 06:44 PM (IST)

    धर्माबाद मनमाड एक्सप्रेस उद्यापासून होणार सुरू

    धर्माबाद मनमाड एक्सप्रेस उद्यापासून सुरू होणार आहे.  8 महिन्यानंतर मनमाड धर्माबाद एक्सप्रेस धावणार आहे. आरक्षित प्रवाश्यांना प्रवासाची संधी मिळणार आहे. उद्या पहाटे 4 वाजता धर्माबाद स्टेशनवरून एक्सप्रेस सुटणार आहे. औरंगाबाद जालना परभणी नांदेड या जिल्ह्यातील प्रवाशांना फायदा होणार आहे. धर्माबाद मनमाड एक्सप्रेस 18 डब्यांची असेल.

  • 23 Dec 2020 06:29 PM (IST)

    मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय, मराठा समाजाला EWS चा लाभ, शिक्षण-नोकरीत फायदा

    राज्य मंत्रिमंडळाचे महत्वाचे पाच निर्णय

    गृह/राज्य उत्पादन शुल्क विभाग

    कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन काळात राज्यातील परवानाधारक (अनुज्ञप्ती) मद्यविक्रीची दुकाने बंद होती. या बंद असलेल्या दुकानांचे परवाना (अनुज्ञप्ती )शुल्कात सूट देण्याची मागणी होती. त्यानुसार या परवानाधारक मद्यविक्रेत्यांना हे शुल्क भरण्यास सूट देण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता

    पशुसंवर्धन, दुग्ध विकास विभाग

    ‌राष्ट्रीय सहकार विकास निगम पुरस्कृत योजनेतील कुक्कुट पालन सहकारी संस्थांची थकबाकी प्रथम एक मुस्त करार (वन टाईम सेटलमेंट) पध्दतीने भरण्यास मंत्रिमंडळाची मान्यता.

    शालेय शिक्षण विभाग

    क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती महिला शिक्षण दिन म्हणून साजरी करणार

    सार्वजनिक बांधकाम विभाग

    महाराष्ट्रातील प्राचीन मंदिरांचे जतन व संवर्धन करणार

    सामान्य प्रशासन

    एसईबीसी उमेदवारांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आरक्षणाचा लाभ शैक्षणिक प्रवेश, व सेवाभरतीसाठी देणार

  • 23 Dec 2020 06:23 PM (IST)

    कंगना रानौत प्रकरणात राज्य मानवाधिकार आयोगाकडून आयुक्त इकबाल सिंह चहल यांना समन्स

    बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत हिचे मुंबईतील कार्यालय पाडण्याची कृती उच्च न्यायालयाने अयोग्य ठरवल्यानंतर आयुक्त इकबाल सिंह चहल यांना राज्य मानवाधिकार आयोगाकडून नोटीस पाठवण्यात आली आहे.

  • 23 Dec 2020 06:06 PM (IST)

    भाजप आमदार देवयानी फरांदे यांचा आरोपीच्या समर्थनार्थ मोर्चा, नाशिकमध्ये गुन्हा दाखल

    नाशिक : भाजप आमदार देवयानी फरांदे अडचणीत आल्या आहेत. आरोपीच्या समर्थनात पोलीस ठाण्यावर मोर्चा काढल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. आमदार देवयानी फरांदे यांच्यांवर इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. आमदार देवयानी फरांदे यांनी संशयित आरोपी इरफान शेख याच्या समर्थनार्थ काल मोर्चा काढला होता.

  • 23 Dec 2020 06:03 PM (IST)

    परळीत कुलरच्या गोदामाला भीषण आग, कारण अस्पष्ट

    परळीत कुलरच्या गोदामाला भीषण आग लागली आहे. आधुनिक वसाहतीमध्ये ही घटना घडली आहे. अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले असून आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

  • 23 Dec 2020 05:58 PM (IST)

    मनसे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुका लढवणार, मुंबईत तातडीची बैठक

    मुंबई : जिल्ह्यातील 8 तालुक्यातील 70 ग्रामपंचायत निवडणुका होणार आहेत. या सर्व निवडणुक मनसे लढवणार आहे. निवडणुकीच्या तयारीसाठी मनसेने तातडीची बैठक बोलावली आहे. मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील पदाधिकारी जे मुंबई, ठाण्यात राहतात यांची राजगडवर तातडीची बैठक होत आहे.

  • 23 Dec 2020 05:55 PM (IST)

    वाशिम जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणूक पहिल्याच दिवशी प्राप्त नामनिर्देशनपत्रांची संख्या: 00

    वाशिम जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूकीमुळे गावपुढारी व कार्यकर्ते मंडळी मधील लगबग चांगलीच वाढली आहे. मात्र, अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही.

  • 23 Dec 2020 05:46 PM (IST)

    पाच तासांच्या चौकशीनंतर विहंग सरनाईक ईडीच्या कार्यालयातून बाहेर

    आर्थिक गैरव्यवहारप्रकरणात 'ईडी'च्या रडारवर असलेल्या विहंग सरनाईक यांची पाच तास चौकशी करण्यात आली. यापूर्वीही विहंग सरनाईक यांची जवळपास इतकेच तास चौकशी झाली होती.

  • 23 Dec 2020 05:20 PM (IST)

    स्वाभिमानीचं टोकाचं पाऊल, कोल्हापूर क्षेत्र अधिकाऱ्याला नदीकिनारी बांधून घातलं

    स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कोल्हापूरच्या क्षेत्र अधिकारी सचिन हरबड यांना तेरवाड बंधाऱ्यावर बांधून ठेवले. क्षेत्र अधिकारी सचिन हरबड हे बंधाऱ्याजवळ मृत माश्याचा पंचनामा करून इथल्या परिस्थितीचा अहवाल देण्यास आले होते. यावेळी संघटनेचे युवा तालुकाध्यक्ष बंडू पाटील, विश्वास बालीघाटे यांनी प्रदूषण मंडळातील प्रादेशिक अधिकारी आंधळे, उप प्रादेशिक अधिकारी प्रशांत गायकवाड यांची निलंबन करा, अशी मागणी केली.

  • 23 Dec 2020 05:08 PM (IST)

    पायधुनी परिसरातून साढे सहा किलो गांजा जप्त

    पायधुनी परिसरातून साढे सहा किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. गांजाची किमंत 1 लाख 30 हजार इतकी आहे. या प्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. गांजाच्या तस्करीसाठी वापरलेली कार देखील जप्त करण्यात आली आहे. पायधुनी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. पायधुनी पोलिसांनी काही दिवसांपूर्वी 20 किलो गांजा जप्त केला होता. त्याच्या तपासात ही माहिती मिळाल्याने ही कारवाई करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष दूधगावकर यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

  • 23 Dec 2020 05:01 PM (IST)

    ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप मुसंडी मारण्यासारखे वातावरण: प्रवीण दरेकर

    ग्रामपचांयतीमध्ये भाजपला मोठी मुसंडी मारता येईल, असं वातावरण सध्या महाराष्ट्रात आहे. देशामध्ये ज्या ज्या ठिकणी निवडणुका झाल्या त्याठिकाणी प्रचंड यश भाजपला मिळतेय असं विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सांगितले.

  • 23 Dec 2020 04:57 PM (IST)

    कोरोना दिवसा फिरत नाही, अस सांगितलं आहे का ?, इम्तियाज जलील यांचा सवाल

    "मला सरकारला प्रश्न विचारायला आहे, कोरोना दिवसा फिरत नाही, अस सांगितलं आहे का ?" रात्रीची संचारबंदी म्हणजे काय? मला कळत नाही की सरकार असे निर्णय का घेत आहे ? एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांचा राज्य सरकारला सवाल

  • 23 Dec 2020 04:41 PM (IST)

    नाईट कर्फ्यूचे आदेश न पाळणाऱ्या 16 आस्थापनांच्या चालकांविरोधात गुन्हे दाखल

    नाईट कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर डोंबिवलीतील मानपाडा पोलिसांनी 16 आस्थापनांच्या चालकांविरोधात कारवाई केली आहे. त्यात ढाबे, हॉटेल, रेस्टॉरंट चालकांचा समावेश आहे. ही कारवाई पुढेही सुरु राहणार आहे. पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी ही माहिती दिली आहे.

  • 23 Dec 2020 04:17 PM (IST)

    शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचं मराठा आरक्षण प्रश्नी महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांना पत्र

    काँग्रेसची भूमिका ही मराठ्यांच्या बाजूने की विरोधात ते स्पष्ट करण्याचं आवाहन शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी महसूलमंत्री काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना केले आहे. मंत्री नितीन राऊत आणि अशोक चव्हाण यांच्या कामावर मराठा समाज नाखूष असल्याचा पत्रात उल्लेख करण्यात आला आहे. जसं दलित,आदिवासींच्या विकासासाठी सोनियाजींनी पत्र लिहीलं, तसा पुढाकार मराठ्यांसाठी कधी घेणार असा प्रश्न विचारण्यात आला आहे.

  • 23 Dec 2020 04:09 PM (IST)

    शनी शिंगणापूर देवस्थान विश्वस्त मंडळ जाहीर,जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या समर्थकांची वर्णी

    शनी शिंगणापूर देवस्थान विश्वस्त मंडळ जाहीर झाले आहे.11 सदस्यीय विश्वस्त मंडळांची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. अहमदनगर धर्मदाय आयुक्तांनी विश्वस्त मंडळाची घोषणा केली आहे. 84 ग्रामस्थांनी दिल्या होत्या मुलाखती त्यापैकी मुलाखती नंतर 11 सदस्यीय विश्वस्त मंडळ जाहीर करण्यात आले.आता शिर्डी विश्वस्त मंडळाच्या घोषणेची प्रतीक्षा, जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या समर्थकांची वर्णी लागली आहे.

  • 23 Dec 2020 04:04 PM (IST)

    भाजप नेते किरीट सोमय्या ईडी कार्यालयात दाखल

    भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या ईडी कार्यालयात दाखल झाले आहेत. आज ईडी कार्यालयात प्रताप सरनाईक यांचे चिरंजीव विहंग सरनाईक यांची चौकशी होत आहे.

  • 23 Dec 2020 04:01 PM (IST)

    साताऱ्याचे शहीद जवान सुजित किर्दत अनंतात विलीन

    सातारा जिल्ह्यातील चिंचणेर निंब गावचे जवान सिक्कीममध्ये कर्तव्य बजावताना रविवारी शहीद झाले होते. त्यांचे पार्थिव आज चिंचणेर येथे आणण्यात आले. भारतीय सेना दलाच्या वतीने शहीद सुजित किर्दत यांना मानवंदना देण्यात आली.बंदुकीच्या तीन फैरया झाडून सुजित किर्दत यांना मानवंदना देण्यात आली. शहीद सुजित किर्दत यांच्या पार्थिवाला चिरंजीव आर्यन किर्दत वय 9 याने मुखाग्नी दिला. शहीद सुजित किर्दत अमर रहे या जय घोषात सुजित किर्दत अनंतात विलीन झाले.

  • 23 Dec 2020 03:40 PM (IST)

    महाराष्ट्रात गुंतवणूक येते याचा आम्हाला आनंद: देवेंद्र फडणवीस

    विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात गुंतवणूक येते याचा आम्हाला आनंद आहे, असं म्हटलंय. यातील काही प्रोजेक्ट आमच्या काळात आले आह. चीन मधील गुंतवणूक आता भारतात येत आहे ती महाराष्टात यायला पाहिजे. विदेशी गुंतवणुकीत गुजरात पहिल्या क्रमांकावर, कर्नाटक दुसऱ्या आणि महाराष्ट तिसऱ्या क्रमांकावर आहे, फडणवीस म्हणाले.

  • 23 Dec 2020 03:35 PM (IST)

    विहंग सरनाईक यांची ईडीकडून चौकशी तीन तासानंतरही सुरुच

    शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचे चिरंजीव विहंग सरनाईक यांची ईडीकडून तीन तास झाले तरी चौकशी सुरु आहे.तर, पूर्वेश सरनाईक ईडीसमोर अद्याप हजर झालेले नाहीत. पूर्वेश यांना अद्यापपर्यंत दोन समन्स बजावण्यात आले आहेत. विहंग यांची दुसऱ्यांदा ईडीकडून चौकशी सुरू आहे.

  • 23 Dec 2020 03:32 PM (IST)

    प्रकरण न्याय प्रविष्ठ, कांजूरची कागदोपत्री जागा महाराष्ट्राची, विरोधकांनी सहकार्य करावे: एकनाथ शिंदे

    मेट्रो कारशेड प्रकरणी बीकेसी जागेबाबत आढावा घेतला जात आहे. पण प्रकरण न्यायालयात असल्याने त्यावर काही बोलता येत नाही. नाणार प्रकल्प रद्द झालेला आहे. कांजूर कारशेड प्रकरण न्याय प्रविष्ट असल्याने त्यावर आम्ही विचार करत आहोत. यामध्ये राजकारण आणण्याचं प्रयत्न होत आहे, कागदोपत्री ही जागा महाराष्ट्र सरकारची असल्याचे दिसत आहे. विरोधकांनी सुद्धा सहकार्य करावे, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

  • 23 Dec 2020 03:22 PM (IST)

    शिवसेनेबरोबर स्थानिक‌ पातळीवर जमवून घ्या,आपल्याला शिवसेनेबरोबर कायम राहायचे: अजित पवार

    उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना 'शिवसेनेबरोबर स्थानिक‌ पातळीवर जमवून घ्या', असे निर्देश दिले आहेत. अजित पवार यांनी शिवसेनेसोबत कायम राहायचे असल्याचे सांगतिले. महाविकास आघाडी‌ झाल्यानंतर स्थनिक पातळीवर खटके उडत आहे पण आपल्याला सेनेबरोबर जुळवून घ्यायचे आहे, असंही ते म्हणाले. महामंडळांचे वाटप लवकरच करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केले.

  • 23 Dec 2020 03:12 PM (IST)

    नांदेड हिंगोलीचे पालकमंत्री बदलून काँग्रेस ऐवजी शिवसेनेकडे पालकमंत्री पद द्या: खासदार हेमंत पाटील

    नांदेड हिंगोलीचे पालकमंत्री बदला, काँग्रेस ऐवजी शिवसेनेकडे पालकमंत्री पद द्या, खासदार हेमंत पाटील यांची वनमंत्र्याकडे मागणी, ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आयोजित मेळाव्यात खासदारांनी केली मागणी, दोन्ही जिल्ह्याचे पालकमंत्री काँग्रेसचे असल्याने कामे होत नसल्याचा आरोप खासदार हेमंत पाटील यांनी केला आहे.

  • 23 Dec 2020 03:10 PM (IST)

    मंचर ग्रामपंचायत आता नगरपंचायत होणार

    पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील मंचर ग्रामपंचायतीचे आता नगरपंचायतीमध्ये रुपांतर करण्यात आल्याची घोषणा राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. या प्रसंगी कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील आंबेगाव चे आमदार, तसेच शिरूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील उपस्थित होते.

  • 23 Dec 2020 02:39 PM (IST)

    आरोग्य विभागाचा ट्रेनिंगचा भाग पूर्ण झाला आहे - राजेश टोपे

    या लशी दोनवेळा द्याव्या लागणार आहेत, यामध्ये महत्त्वाचा भाग म्हणजे आरोग्य विभागाचा ट्रेनिंगचा भाग पूर्ण झाला आहे, 16 हजार आरोग्य कर्मचारी आहेत, त्यांना ट्रेनिंग देण्यात आलं आहे, कोल्ड चेन्स आहेत, जिथे कमी पडतील तिथे केंद्र सरकार देणार असं आश्वासन देण्यात आलं आहे

  • 23 Dec 2020 02:35 PM (IST)

    जनतेने रात्रीच्या कर्फ्यूला प्रतिसाद द्यावा - राजेश टोपे

    नवीन वर्ष आणि नाताळ या सणानिमित्त होणारी गर्दी असेल, त्यावर नियंत्रण मिळवायचं आहे, म्हणून मुक्यमंत्र्यांनी रात्रीच्या कर्फ्यूचा निर्णय घेतला, जनतेने या निर्णयांना प्रतिसाद द्यावा, कोरोनाच्या परिस्थितीत संपूर्ण काळजी घ्यावी, नियमांचं पालन करावं.

  • 23 Dec 2020 02:32 PM (IST)

    कोरोनाचा नवीन स्ट्रेन अधिक संसर्गजन्य असल्याने आपल्याला त्याचा संपर्क टाळायचा आहे- राजेश टोपे

    कोरोनाचा नवीन स्ट्रेन अधिक संसर्गजन्य असल्याने आपल्याला त्याचा संपर्क टाळायचा आहे, त्यामुळे युकेहून आलेल्या लोकांना आपण संस्थात्मक क्वारंटाईन करत आहोत, - राजेश टोपे

  • 23 Dec 2020 01:48 PM (IST)

    भिवंडीतील काँग्रेसच्या 16 नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

    भिवंडीतील काँग्रेसच्या 16 नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश, या 16 नगरसेवकांनी काँग्रेस सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला, भिवंडीतील काँग्रेसमधील  अंतर्गत वादामुळे हे नगरसेवक काँग्रेस सोडून राष्ट्रवादीत दाखल झाले आहेत

  • 23 Dec 2020 01:43 PM (IST)

    मी भाजपात प्रवेश केला असता, तर ती माझी राजकीय आत्महत्या ठरली असती : अब्दुल सत्तार

    मी भाजपात प्रवेश केला असता, तर ती माझी राजकीय आत्महत्या ठरली असती, शिवसेना प्रवेशाचे महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले समर्थन, राजकीय आयुष्यात अनेक राजकीय निर्णय चुकत असतात तसाच माझा हा निर्णय चुकला असता तर ही माझी राजकीय आत्महत्या राहिली असती

  • 23 Dec 2020 01:07 PM (IST)

    महाराष्ट्राच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकातही नाईट कर्फ्यू, रात्री 10 ते सकाळी 6 संचारबंदी

    महाराष्ट्राच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकातही नाईट कर्फ्यू, रात्री 10 ते सकाळी 6 संचारबंदी, 2 जानेवारीपर्यंत संचारबंदी राहणार

  • 23 Dec 2020 01:05 PM (IST)

    नागपूर महानगरपालिकेने कोरोना लशीसंदर्भात ट्रेनिंग द्यायला सुरुवात

    नागपूर महानगरपालिकेने कोरोना लशीसंदर्भात आज ट्रेनिंग द्यायला सुरुवात, आज 80 वैद्यकीय अधिकार्‍यांना ट्रेनिंग दिले जात आहे, पहिल्या फेजमध्ये महानगरपालिका 19,000 फ्रंट लाईन वर्कर्सला देणार कोरोना लस

  • 23 Dec 2020 01:02 PM (IST)

    राज्यमंत्री अब्दुल सत्तार नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर, ग्रामपंचायत निवडणुकांसाठी सज्ज असल्याचा दावा

    राज्यमंत्री अब्दुल सत्तार नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर, होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुका शिवसेना कोणत्याही परिस्थितीत जिंकण्यासाठी लढणार, राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांसाठी सज्ज असल्याचा दावा

  • 23 Dec 2020 12:45 PM (IST)

    नाशकात तीन महिन्यांच्या बाळाचा कोरोनामुळे मृत्यू

    नाशकात तीन महिन्यांच्या बाळाचा कोरोनामुळे मृत्यू, आठवड्यापासून सुरु होते खाजगी रुग्णालयात उपचार, कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने प्रशासनाची धाकधूक पुन्हा वाढली

  • 23 Dec 2020 12:31 PM (IST)

    सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाअंतर्गत येणारी महाविद्यालयं लवकरचं सुरु होण्याची शक्यता

    सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत येणारी महाविद्यालयं लवकरचं सुरु होण्याची शक्यता, महाविद्यालय सुरु करावीत का? यासाठी विद्यापीठानं केली समिती स्थापन, व्यवस्थापन परिषद सदस्य असलेल्या डॉ. व्ही गायकवाड यांच्या समितीचा प्रस्ताव आल्यावर होणार शिक्कामोर्तब, अहवाल लवकर सादर करण्याची व्यवस्थापन परिषदेची मागणी, पुणे, नगर आणि नाशिक जिल्ह्यातील महाविद्यालयं सुरु होणार का? यावर आठवड्यात निर्णय होण्याची शक्यता, समिती करणार विद्यापीठाला शिफारशी, शिफारशी मान्य करुन महाविद्यालय होणार सुरु?

  • 23 Dec 2020 11:48 AM (IST)

    राष्ट्रवादीच्या‌ मंत्र्यांची‌ बैठक, अजित पवार, धनंजय मुंडे, अनिल देशमुख उपस्थित

    राष्ट्रवादी‌च्या मंत्र्यांची‌ बैठक, अजित पवार, धनंजय मुंडे, अनिल देशमुख, जयंत‌‌ पाटील बैठकीला उपस्थित, पक्ष संघटन वाढीबाबत‌ बैठक

  • 23 Dec 2020 11:31 AM (IST)

    पूर्वेश सरनाईक आज ईडीसमोर हजर राहण्याची शक्यता

    पूर्वेश सरनाईक आज ईडीसमोर हजर राहण्याची शक्यता, विहंग सरनाईक यांनाही आज ईडीसमोर हजर राहण्यासाठी समन्स, टॉप सिक्योरिटी आर्थिक गैरव्यवहार प्रकरण, विहंग यांना आज सहावा समन्स, विहंग यांची एकदा पाच तास चौकशी झाली आहे, पूर्वेश यांना दुसरा समन्स, पूर्वेश एकदाही ईडीसमोर हजर झालेले नाहीत

  • 23 Dec 2020 11:24 AM (IST)

    राष्ट्रवादीची पक्ष बांधणीला सुरुवात, विधानसभा आणि लोकसभेला पराभूत झालेल्या उमेदवारांची बैठक

    विधानसभा आणि लोकसभेला पराभूत झालेल्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांची बैठक, वाय बी चव्हाण प्रतिष्ठानला 11 वाजता बैठक, प्रदेशाध्यक्ष आणि काही मंत्री राहणार उपस्थित, पराभवाची कारणं आणि त्यावर उपाय यावर होणार चर्चा, आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन राष्ट्रवादीची पक्ष बांधणीला सुरुवात

  • 23 Dec 2020 11:20 AM (IST)

     25 कोटींची पाणीपुरवठा योजना महाविकास आघाडीमुळे रखडली, भाजपचं भोगवती नदीत जलसमाधी आंदोलन

    वरणगाव येथे भोगवती नदीमध्ये भाजप नगराध्यक्ष सुनील काळे यांच्यासह कार्यकर्ते पाण्यामध्ये उतरुन जलसमाधी, 25 कोटींची पाणीपुरवठा योजना महाविकास आघाडीने रखडवल्याने करणार जलसमाधी आंदोलन, फक्त राजकारण करुन योजना थांबविण्याचा भाजपा नगराध्यक्षांचा आरोप

  • 23 Dec 2020 10:52 AM (IST)

    आरक्षण सोडत निवडणुकीनंतर, सरकारच्या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका

    राज्यातील 14 हजार 234 ग्रामपंचायतीच्या निवडणुका राज्यभर सुरु आहेत, पण ग्रामपंचायतीच्या सरपंचाची आरक्षण सोडत ही निवडणुकीनंतर करण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला, राज्य सरकारच्या या निर्णयाला आव्हान देणारी एक महत्वपूर्ण याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सादर करण्यात आली, औरंगाबाद खंडपीठातील वकील देविदास शेळके यांनी ही याचिका सादर केली, निवडणुकीनंतर सरपंच पदाची आरक्षण सोडत काढणे हा निर्णय घटनात्मक दृष्ट्या अवैध असल्याची भूमिका या याचिकेत घेण्यात आली, ही याचिका अद्याप न्यायालयाने दाखल करुन घेतलेली नाही, मात्र याचिकेवर निर्णय घेण्यासाठी कोर्टाने 7 जानेवारी रोजीची तारीख दिली

  • 23 Dec 2020 10:11 AM (IST)

    सिक्कीममध्ये अपघाती मृत्यू झालेल्या शहीद जवान सुजित नवनाथ किर्दत यांचे पार्थिव पुण्यातून साताऱ्याकडे निघाले

    सिक्कीम येथे अपघाती मृत्यू झालेल्या साताऱ्यातील शहीद जवान सुजित नवनाथ किर्दत यांचे पार्थिव पुण्यातून साताऱ्याकडे निघाले, 12 वाजता त्यांच्या मूळ गावी चिंचणेर निंबला पोहचणार पार्थिव, त्यानंतर त्यांच्यावर शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

  • 23 Dec 2020 10:09 AM (IST)

    ग्रामपंचायत निवडणूकीच्या रणसंग्रामात विदर्भात मनसेही आघाडीवर

    ग्रामपंचायत निवडणूकीच्या रणसंग्रामात विदर्भात मनसेही आघाडीवर, आजपासून विदर्भातील मनसे इच्छूक उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु करणार, विदर्भातील जास्तीत जास्त ग्रामपंचायतीमध्ये मनसे लढवणार निवडणूक, विजयी ग्रामपंचायत सदस्यांना राज ठाकरे यांच्या भेटीला नेणार, मनसेच्या विदर्भातील नेत्यांची माहिती, राज ठाकरेंच्या आदेशानंतर निवडणूक असलेल्या गावात मनसे नेत्यांचे दौरे सुरु, विदर्भात जास्तीत जास्त ग्रामपंचायत सदस्य निवडणूक आणण्याचा मनसेचा निर्धार

  • 23 Dec 2020 09:54 AM (IST)

    बीड बिनविरोध ग्रामपंचायतींना 21 लाखांचा निधी, आष्टीचे आमदार बाळासाहेब आजबे यांची घोषणा

    बीड बिनविरोध ग्रामपंचायतींना 21 लाखांचा निधी, आष्टीचे आमदार बाळासाहेब आजबे यांची घोषणा, 10 लाखांचा निधी आमदार फंडातून, उर्वरित निधी सीएसआर फंडातून देणार

  • 23 Dec 2020 09:51 AM (IST)

    पंकजा मुंडेंच्या वैद्यनाथ साखर कारखान्यात चोरी, 37 लाख 84 हजार लंपास

    बीड येथे पंकजा मुंडेंच्या कारखान्यात चोरी, वैद्यनाथ साखर कारखान्यात चोरी, तब्बल 37 लाख 84 हजारांची चोरी, गोडाऊनमधून दोन महिन्यांपूर्वी झाली चोरी, परळी ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल

  • 23 Dec 2020 09:50 AM (IST)

    धुळे शहराच्या तापमातात मोठी घट, शहराचे तापमान 5.7 अंश

    धुळे शहराच्या तापमात मोठी घट झाली आहे, शहराचे तापमान 5.7 अंश सेल्सिअसवर पोहोचले, शेतकऱ्यांना रब्बी पिकांसाठी फायदा

  • 23 Dec 2020 09:44 AM (IST)

    नाशिक शहरातील स्मार्ट पार्किंग अडचणीत, आर्थिक व्यवहार अडचणीत आल्याने प्रकल्प रखडणार

    नाशिक शहरातील स्मार्ट पार्किंग अडचणीत, आर्थिक व्यवहार अडचणीत आल्याने प्रकल्प रखडणार, वार्षिक सभेत चर्चा होऊन तोडगा निघण्याची शक्यता, शहरात 33 ठिकाणी होणार होते ऑन स्ट्रीट आणि ऑफ स्ट्रीट पार्किंग

  • 23 Dec 2020 09:43 AM (IST)

    उस्मानाबाद जिल्ह्यातील 428 ग्रामपंचायत निवडून अर्ज भरण्यास आजपासून सुरुवात

    उस्मानाबाद जिल्ह्यातील 428 ग्रामपंचायत निवडून अर्ज भरण्यास आजपासून सुरुवात, 1 हजार 377 प्रभागातून 3 हजार 652 ग्रामपंचायत सदस्यांची निवड होणार, 428 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 1 हजार 462 मतदान केंद्रचा आराखडा प्रशासनाने तयार केला, अनेक मातब्बर नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

  • 23 Dec 2020 09:11 AM (IST)

    तिहारच्या धर्तीवर नागपूरच्या कारागृहातील फाशी यार्डचं नूतनीकरण

    तिहारच्या धर्तीवर नागपूरच्या कारागृहातील फाशी यार्डचं नूतनीकरण, ब्रिटिशकालीन नागपूर कारागृह देशातील टॉप टेन कारागृहात येत, याकूब मेमनच्या फाशीनंतर नागपूर कारागृहातील फाशी यार्ड देशविदेशात चर्चेला आलं होतं, नागपूर कारागृहातील फाशी यार्डच्या नूतनिकरणासाठी सरकार कडून 1 कोटी रुपये प्रशासकीय खर्चाला मान्यता, 156 वर्ष जुने असलेल्या नागपूर कारागृहात सध्या 12 फाशीची शिक्षा झालेले आरोपी असून त्यात जर्मन बेकरी, मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपीचा समावेश, महाराष्ट्रात फाशी देण्याची व्यवस्था येरवडा, पुणे आणि नागपूर कारागृहातच

  • 23 Dec 2020 08:10 AM (IST)

    औंध प्रभाग समितीचे माजी अध्यक्ष आणि नगरसेवक विजय बाबुराव शेवाळे यांचे निधन

    औंध प्रभाग समितीचे माजी अध्यक्ष व नगरसेवक विजय बाबुराव शेवाळे यांचे अल्पशा आजाराने निधन, पुणे महानगरपालिकेच्या क्रिडा समितीचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते

  • 23 Dec 2020 08:09 AM (IST)

    रात्रीच्या संचार बंदीची कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रांत होणार प्रभावी अंमलबजावणी

    रात्रीच्या संचार बंदीची कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रांत होणार प्रभावी अंमलबजावणी, पोलिसांकडून शहरात पोलीस दलाकडून रुट मार्च, नियमांच पालन करण्याचं केलं आवाहन, शहरातील मुख्य रस्ते आणि वसाहती मध्ये निघाला पोलिसांचा रुट मार्च, रुट मार्चमध्ये वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील झाले सहभागी

  • 23 Dec 2020 08:04 AM (IST)

    वाढदिवसाचा केक तलवारीन कापण पडलं महागात, तिघांवर गुन्हा दाखल

    वाढदिवसाचा केक तलवारीन कापण पडलं महागात, कोल्हापूरच्या जयसिंगपूर मधील प्रकार, तलवारीने केप कापून दहशत माजवल्या प्रकरणी एका संघटनेच्या अध्यक्षा सह तिघांवर जयसिंगपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, राहुल कांबळे, राहुल पवार, फकीरचंद पाथरुट अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नाव

  • 23 Dec 2020 08:00 AM (IST)

    महिनाभरात विदेशातून आलेल्या प्रवाशांची माहिती द्या, नागपूर मनपा आयुक्तांचं आवाहन

    महिनाभरात विदेशातून आलेल्या प्रवाशांची माहिती द्या, ब्रिटन, दक्षिण आफ्रिका, मिडल इस्ट, युरोपमधून आलेल्यांची माहिती द्या, नागपूर मनपा आयुक्त राधाकृष्ण बी यांचं आवाहन, कोरोनाच्या नव्या व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारी, कोरोना नियंत्रणासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचं आवाहन

  • 23 Dec 2020 07:58 AM (IST)

    वर्षाच्या शेवटच्या दिवसात पर्यटकांची पावले ताडोबाकडे, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची तोबा गर्दी

    वर्षाच्या शेवटच्या दिवसात पर्यटकांची पावले ताडोबाकडे, सलग सुट्या आणि ख्रिसमस यामुळे ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची तोबा गर्दी, कोरोना काळ विसरून 2020 अंती वन्यजीव दर्शनाला प्राधान्य, नव्या वर्षाच्या सुरुवातीपर्यंत ताडोबा हाऊसफुल्ल, गेले 8 महिने रखडलेले पर्यटन रुळावर येण्याची चिन्हे, सध्याच्या कडाक्याच्या थंडीतही आबालवृद्ध व्याघ्रदर्शनासाठी आसुसले

  • 23 Dec 2020 07:52 AM (IST)

    लांबचा प्रवास जलद व्हावा म्हणून पीएमपीएलएमच्या 11 प्रमुख मार्गांवर जलद बससेवा

    पुण्यात लांब पल्ल्याच्या मार्गावरील प्रवास जलद गतीने होण्यासाठी पीएमपीएलएमच्या 11 प्रमुख मार्गांवर जलद बससेवा सुरु करण्याचा निर्णय, या मार्गांवर ई-बस सोडणार असून केवळ ठराविक थांब्यांवरच बस थांबविली जाणार, 25 डिसेंबरपासून ही सेवा सुरु होणार असल्याची पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र जगताप यांची माहिती

  • 23 Dec 2020 07:48 AM (IST)

    पुण्यातही नाईट कर्फ्यू, ग्रामीण भागाबाबत आज निर्णय

    ब्रिटनमध्ये आढळलेल्या करोनाच्या नव्या प्रकाराच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या आदेशानुसार पुणे शहरामध्ये मंगळवारपासून रात्री संचारबंदी लागू, परंतू जिल्ह्याच्या ग्रामीण भागात संचारबंदी लागू करायची की नाही, याबाबतचा निर्णय जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख हे बुधवारी घेणार, ग्रामीण भागात करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तयार केलेल्या कृती दलाच्या अधिकाऱ्यांची बैठक आज होणार, या बैठकीमध्ये करोनाच्या सद्यस्थितीचा आढावा घेऊन संचारबंदीबाबत निर्णय घेणार

  • 23 Dec 2020 07:46 AM (IST)

    नागपूरसह विदर्भाच्या अनेक भागात कापूस वेचणी महागली, शेतकरी हवालदील

    नागपूरसह विदर्भाच्या अनेक भागात कापूस वेचणी महागली, कापूस वेचणीचा खर्च 10 रुपये किलो, मजुरांची समस्या असल्याने कापूस वेचणीचा दर वाढला, कापसाचा दर 45 ते 50 रुपये किलो, वेचणीला 10 रुपये किलोचा दर, कापूस वेचणीचा खर्च वाढल्याने शेतकरी हवालदील, आधीच बोंडअळीमुळे कापसाचं उत्पादन घटलं, त्याच वेचणीच्या खर्चात वाढ

  • 23 Dec 2020 07:44 AM (IST)

    निफाडचा किमान पारा घसरला, 7.6 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद

    निफाडचा किमान पारा घसरला, 7.6 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद, कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रातील हवामान विभागात नोंद

  • 23 Dec 2020 07:43 AM (IST)

    मालमत्ता खरेदीवरील मुद्रांक शुल्क सवलत आता 31 मार्चपर्यंत

    मालमत्ता खरेदीवरील मुद्रांक शुल्क सवलत आता 31 मार्चपर्यंत, 1 जानेवारी ते 31 मार्च 2021 पर्यंत 1.5 टक्के सवलत, बांधकाम व्यवसायाला चालना देण्यासाठी मुद्रांक शुल्क सवलत, हजारो मालमत्ता खरेदीदारांना होणार फायदा, 3 टक्के मुद्रांक शुल्क सवलत 31 डिसेंबर 2020 पर्यंत

  • 23 Dec 2020 07:39 AM (IST)

    नागपूर जिल्ह्यात ॲाक्सिजनची मागणी 50 टक्क्यांनी घटली

    नागपूर जिल्ह्यात ॲाक्सिजनची मागणी 50 टक्क्यांनी घटली, सप्टेंबरमधील 60 टन ॲाक्सीजनची मागणी आली 30 टनवर, ॲाक्टोबरपासून कोरोना रुग्णसंख्या घटल्याने ॲाक्सिजनची मागणी कमी झाली, नागपूर जिल्ह्यात सध्या 4057 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण, ॲक्टिव्ह रुग्ण कमी झाल्याने घटली ॲाक्सीजनची मागणी

  • 23 Dec 2020 07:02 AM (IST)

    भाजप आमदार राम सातपुते यांच्या लग्न सोहळ्याची चौकशी होणार

    पुण्याचे भाजप आमदार राम सातपुते यांच्या लग्न सोहळ्याची चौकशी होणार, लग्नसोहळ्यात कोरोना नियमावलीचे उल्लंघन झाले असल्याची माहिती, अलंकार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीवन जगदाळे यांना चौकशी करण्याचे आदेश, त्यांच्याकडून याबाबतचा अहवाल मिळाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार, सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांची माहिती

  • 23 Dec 2020 07:01 AM (IST)

    नागपुरातही रात्री 11 वाजेपासून नाईट कर्फ्यू लागू, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मनपा आयुक्तांचे आदेश

    नागपुरातही रात्री 11 वाजेपासून नाईट कर्फ्यू लागू, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नाईट कर्फ्यू, नाईट कर्फ्यूच्या अंमलबजावणीसाठी पोलीस रस्त्यावर, रात्री 11 ते सकाळी 6 पर्यंत नाईट कर्फ्यू, नागपूर महानगरपालिका आयुक्तांनी जारी केले आदेश

  • 23 Dec 2020 06:30 AM (IST)

    अकोल्यात उभ्या इंडिका कारला आग, कार पूर्णपणे जळून खाक

    अकोला ते अकोट रोडवर वनी वारुळा फाट्याजवळ एका इंडिका कारला रात्रीच्या सुमारास अचानक आग लागली, ही आग कशामुळे लागली याची माहिती मिळू शकली नाही, या आगीमुळे कार पूर्णपणे जळून खाक झाली, ही कार कुठली आणि कुणाची आहे याची माहिती अद्याप पर्यंत मिळाली नाही, मात्र या आगीमुळे कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले

  • 23 Dec 2020 06:28 AM (IST)

    साताऱ्यात रिक्षा चालकाचं नियंत्रण सुटून अपघातात, 2 जण गंभीर जखमी

    सातारा तालुक्यातील डबेवाडी गावच्या हद्दीत रिक्षा चालकाच्या नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात 2 जण गंभीर जखमी झाले आहेत, मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास सातारा शहरातून बोगदा मार्गे आलेल्या रिक्षा चालकाचे रिक्षावरील नियंत्रण सुटल्याने रिक्षा 25 फुट खोल ओढ्यात कोसळली, या रिक्षाचालकासह आणखी एक प्रवासी प्रवास करत होता, अचानक हा अपघात घडल्याने डबेवाडी ग्रामस्थांनी जखमींना बाहेर काढले आणि तात्काळ खाजगी रुग्णालयात दाखल केले

  • 23 Dec 2020 06:26 AM (IST)

    शहापूर मध्ये थंडीचा कडाका वाढला, तापमान 15 अंश सेल्सिअसवर

    शहापूर मध्ये थंडीचा कडाका वाढला, वातावरणात गारवा निर्माण झाल्याने शहापूरमध्ये कडाक्याची अंडी पडली असून पारा घसरला आहे, तपमान हे 15 अंश सेल्सिअसवर पोहोचलं आहे, कडाक्याची थंडी पडल्याने बच्चे कंपनी थंडीत कुडकूडली असून अंग उब मिळण्यासाठी जागोजागी शेकोटी पेटलेल्या दिसत आहेत

Published On - Dec 23,2020 11:33 PM

Follow us
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.