नाणारवरुन शिवसेनेतच जुंपली, स्थानिक आमदार-खासदारांच्या मतांनी सेनेच्या भूमिकेबाबत संभ्रम

शिवसेनेचे राजापूरचे आमदार राजन साळवी यांनी नाणार प्रकल्प राबविण्याबाबत अनुकुलता दर्शवलेली असतानाच शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी मात्र साळवी यांचे विधान खोडून काढले आहे. (vinayak raut clarification on Nanar Oil Refinery project)

नाणारवरुन शिवसेनेतच जुंपली, स्थानिक आमदार-खासदारांच्या मतांनी सेनेच्या भूमिकेबाबत संभ्रम
Follow us
| Updated on: Dec 23, 2020 | 7:13 PM

सिंधुदुर्ग: नाणार प्रकल्पावरून शिवसेनेतच मतभेद असल्याचं आढळून आले आहे. शिवसेनेचे राजापूरचे आमदार राजन साळवी यांनी नाणार प्रकल्प राबविण्याबाबत अनुकुलता दर्शवलेली असतानाच शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी मात्र साळवी यांचे विधान खोडून काढले आहे. नाणार प्रकल्पाचा विषय संपला आहे. हा प्रकल्प सुरू होणार नाहीच, असं विनायक राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे नाणारवरून शिवसेनेतच मतभेद असल्याचं दिसून आल्याने स्थानिकांमध्ये मात्र संभ्रम निर्माण झाला आहे. (vinayak raut clarification on Nanar Oil Refinery project)

90 टक्के स्थानिकांनी मोबदला स्वीकारल्याने जैतापूर प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्याच धर्तीवर नाणार प्रकल्पात स्थानिकांचा विरोध मावळला तर महाविकास आघाडी पुढचा निर्णय घेईल, असं राजन साळवी यांनी म्हटलं होतं. त्यामुळे नाणारवरून शिवसेना बॅकफूटवर आल्याची जोरदार चर्चा रंगली होती. विरोधकांनीही शिवसेनेच्या या भूमिकेचं स्वागत केलं होतं. तर, स्थानिकांनी शिवसेनेच्या या बदलत्या भूमिकेवर संताप व्यक्त केला होता. त्यामुळे विनायक राऊत यांना पुढे येऊन सारवासारव करावी लागली आहे. स्थानिक जनतेचा नाणार प्रकल्पाला विरोध असल्यामुळे या प्रकल्पाचा विषय कायमचा संपला आहे. हा प्रकल्प पुनश्च होणार नाही. तशी स्वप्ने कुणीह पाहू नये, अशी सारवासारव राऊत यांनी केली होती.

ते माझे वैयक्तिक मत

राजन साळवी यांच्या वक्तव्यावरून शिवसेनेतही खळबळ उडाली आहे. शिवसेनेला अडचणीत आणणारं वक्तव्य केल्याने साळवी यांना शिवसेनेतून समज देण्यात आल्याचं बोललं जात आहे. विनायक राऊत यांची प्रतिक्रिया आल्यानंतर साळवी यांनी लगेचच आपल्या भूमिकेबाबत स्पष्टीकरण दिलं. नाणारबाबत मी मांडलेली भूमिका ही माझी वैयक्तिक भूमिका आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवसेना आणि महाविकास आघाडीशी त्याचा कोणताही संबंध नाही, असं साळवी यांनी म्हटलं आहे.

शिवसेनेची चाचपणी?

दरम्यान, राजन साळवी यांनी नाणारबाबत अनुकुल भूमिका घेऊन शिवसेनेने या प्रकल्पाबाबत स्थानिकांची मानसिकता काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला असावा, असा अंदाज राजकीय विश्लेषक वर्तवत आहेत. साळवी यांनी नाणार प्रकल्पाचं समर्थन केल्यानंतर विरोधकांनी त्याचं स्वागत केलं. साळवी यांच्या विधानावर स्थानिकांच्या तेवढ्या तीव्र प्रतिक्रिया उमटल्या नाहीत. त्यानंतर राऊत यांनी साळवी यांच्या विधानाला विरोध करून या मुद्द्याला हवा दिली. हा सर्व प्रकार स्थानिकांची मानसिकता समजून घेण्यासाठीच घडवून आणली असावा, असं जाणकार सांगतात. साळवींसारखा ज्येष्ठ नेता कोणतंही वक्तव्य हवेत करणार नाही. तसेच वाचाळ बडबड करणं किंवा हवेतील विधान करण्याबाबत साळवी प्रसिद्धही नाहीत. ते नेहमीच गंभीरपूर्वक मते मांडत असतात आणि पक्षाची लाईनच मांडत असतात. त्यामुळे त्यांचं हे विधान म्हणजे नाणारसाठी शिवसेनेकडून केली जात असलेली चाचपणी असल्याचंही बोललं जात आहे. (vinayak raut clarification on Nanar Oil Refinery project)

संबंधित बातमी:

प्रताप सरनाईकांच्या नावे 112 सातबारे; पुरावे घेऊन किरीट सोमय्या थेट ED कार्यालयात

शिवसेनेसोबत कायम राहायचंय, स्थानिक‌ पातळीवर जमवून घ्या, अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सूचना

भाजप आमदार देवयानी फरांदे यांचा आरोपीच्या समर्थनार्थ मोर्चा, नाशिकमध्ये गुन्हा दाखल

(vinayak raut clarification on Nanar Oil Refinery project)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.