सुटीचा आनंद घेण्यासाठी फिरायला गेले, तरुणाची ही सुटी शेवटची ठरली

काही मित्र दुचाकीने फिरायला गेले होते. फिरण्याच्या नादात एका युवकाने दुचाकी थेच कारवर चालवली. यात दुचाकी तसेच कारचे मोठे नुकसान झाले.

सुटीचा आनंद घेण्यासाठी फिरायला गेले, तरुणाची ही सुटी शेवटची ठरली
Follow us
| Updated on: Aug 15, 2023 | 7:36 PM

नांदेड : देशात स्वातंत्र्यदिनानिमित्त आनंदाचे वातावरण होते. ध्वजारोहण करून बरेच लोकं हे बाहेर फिरायला गेले होते. पर्यटनस्थळांवर गर्दी झाली होती. काही लोकांनी रस्त्यावर आनंद व्यक्त केला. काही तरुण दुचाकी चालवून तिरंगा हातात घेऊन फिरत होते. यामुळे काही ठिकाणी दुर्घटनासुद्धा घडल्या. अशीच एक दुर्घटना नांदेडमध्ये (Nanded) घडली. काही मित्र दुचाकीने फिरायला गेले होते. फिरण्याच्या नादात एका युवकाने दुचाकी थेच कारवर चालवली. यात दुचाकी तसेच कारचे मोठे नुकसान झाले. शिवाय युवकाचा जागीच मृत्यू झाला.

दुचाकी कारवर आदळली

स्वातंत्र्य दिनाची सुट्टी असल्याने आठ ते दहा दुचाकीवरुन काही मित्र फिरायला निघाले होते. त्यातील एकाची भरधाव दुचाकी कारवर आदळली. यात एका युवकाचा मृत्यू झाला. आज दुपारी नांदेड शहरातील पश्चिम वळण रस्त्यावरील पुलावर ही घटना घडली. 26 वर्षीय रोहित मुदिराज असं मृत तरुणाचं नाव आहे.

रोहित काँग्रेस पदाधिकाऱ्याचा मुलगा

रोहित हा भरधाव वेगाने दुचाकी चालवत होता. यावेळी समोरून येणाऱ्या कारला दुचाकी धडकली. डोक्याला मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघात एवढं भीषण होतं की कारचा आणि दुचाकीचा काही भाग चुराडा झाला होता. मयत रोहित मुदिराज हा काँग्रेस पदाधिकारी व्यकंट मुदिराज यांचा मुलगा होता. तसेच माजी नगरसेविकेचा नातू होता. स्वातंत्र्यदिनानिमित्त आनंदाचे वातावरण होते. परंतु, दुर्घटना घडल्यामुळे आनंदावर विरजण पडले. रोहितसारखा तरणाताठा युवक गेला. त्यामुळे सुटीचा आनंद व्यवस्थित घेणे गरजेचे आहे.

भाजपातर्फे इंदापूरमध्ये तिरंगा बाईक रॅली

भाजपच्या वतीने इंदापूरमध्ये आज इंदापूर शहरातून तिरंगा बाईक रॅली काढण्यात आली. भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या दिनी हर घर तिरंगा अभियानांतर्गत रॅली काढण्यात आली. भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली रॅली निघाली होती. विशेष बाब म्हणजे या रॅलीमध्ये असंख्य युवकांचा समावेश होता. रॅलीच्या माध्यमातून माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे शक्तिप्रदर्शन केले असल्याचे बोलले जात आहे.

Non Stop LIVE Update
प्रसिद्ध बासरीवादक राकेश चौरसिया यांचा 'नक्षत्र पुरस्कारानं' गौरव
प्रसिद्ध बासरीवादक राकेश चौरसिया यांचा 'नक्षत्र पुरस्कारानं' गौरव.
WITT : पुष्पा सुपरस्टार अल्लू अर्जुनला नक्षत्र सन्मान; म्हणाला...
WITT : पुष्पा सुपरस्टार अल्लू अर्जुनला नक्षत्र सन्मान; म्हणाला....
अम्मा 'ॲनिमल' पाहू नको... खुशबू सुंदर यांच्या मुली असं का म्हणाल्या?
अम्मा 'ॲनिमल' पाहू नको... खुशबू सुंदर यांच्या मुली असं का म्हणाल्या?.
प्रसिद्ध संगीतकार वी सेल्वागणेश यांना TV9 चा 'नक्षत्र सन्मान'
प्रसिद्ध संगीतकार वी सेल्वागणेश यांना TV9 चा 'नक्षत्र सन्मान'.
'एका व्यक्तीकडून एवढं कसं धाडस होतंय...सरकार..,' काय म्हणाले अजित पवार
'एका व्यक्तीकडून एवढं कसं धाडस होतंय...सरकार..,' काय म्हणाले अजित पवार.
पहिला चित्रपट ते सिनेसृष्टीतील कस होत करीअर? बघा रवीना टंडन Exclusive
पहिला चित्रपट ते सिनेसृष्टीतील कस होत करीअर? बघा रवीना टंडन Exclusive.
... तर अर्धी इंडस्ट्री नष्ट होईल, नेपोटिझमवर रवीना टंडन हिचा खोचक टोला
... तर अर्धी इंडस्ट्री नष्ट होईल, नेपोटिझमवर रवीना टंडन हिचा खोचक टोला.
वडिलांची इच्छा होती मी सैनिक बनाव.., अनुराग ठाकूरांना काय व्हायच होतं?
वडिलांची इच्छा होती मी सैनिक बनाव.., अनुराग ठाकूरांना काय व्हायच होतं?.
विरोधकांच्या पत्रातलं एक वाक्य जरा मनोरंजनासारखे - देवेंद्र फडणवीस
विरोधकांच्या पत्रातलं एक वाक्य जरा मनोरंजनासारखे - देवेंद्र फडणवीस.
युवा बॅडमिंटनपासून ते खास क्रिकेटपटूपर्यंत या खेळाडूंना नक्षत्र सन्मान
युवा बॅडमिंटनपासून ते खास क्रिकेटपटूपर्यंत या खेळाडूंना नक्षत्र सन्मान.