Nanded | नांदेडमध्ये रिंदाचे 50 साथीदार? पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन, हरियाणा अतिरेक्यांच्या कनेक्शनमुळे मोहीम वेगात

काल पासून पोलिसांनी तीन पथकांद्वारे रिंदाच्या नांदेड येथील शेतात पाहणी केली. तसेच त्याच्या संपर्कातील सदस्याच्या घरांची झडती घेण्यात आली.. या झडतीत काही तलवारी मिळाल्याची माहिती मिळत हाती आली आहे तसेच पोलिस साथीदारांच्या हालचालीवर लक्ष ठेवून आहेत..

Nanded | नांदेडमध्ये रिंदाचे 50 साथीदार? पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन, हरियाणा अतिरेक्यांच्या कनेक्शनमुळे मोहीम वेगात
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 07, 2022 | 2:26 PM

नांदेड : हरियाणात पकडलेल्या बब्बर खालसा अतिरेक्यांचे नांदेड कनेक्शन (Nanded Terrorist connection) उघड झाल्यानंतर नांदेड पोलीसांनी कोम्बिंग ऑपरेशन (combing operarion) सुरू केलं आहे. हरियाणा पोलिसांनी यापूर्वी नांदेडला शस्त्रसाठा पुरवठा झाल्याची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी (Nanded police) हे कोम्बिंग ऑपरेशन सुरू केले आहे… पाकिस्तानात असलेल्या हरविंदर सिंग रिंदा याचे नांदेड मध्ये 50 सदस्य असल्याची माहिती येथील पोलीस अधीक्षकांनी दिली होती… काल पासून पोलिसांनी तीन पथकांद्वारे रिंदाच्या नांदेड येथील शेतात पाहणी केली. तसेच त्याच्या संपर्कातील सदस्याच्या घरांची झडती घेण्यात आली.. या झडतीत काही तलवारी मिळाल्याची माहिती मिळत हाती आली आहे तसेच पोलिस साथीदारांच्या हालचालीवर लक्ष ठेवून आहेत…

शुक्रावरी रात्रीपासून कोम्बिंग ऑपरेशन

गुरुवारी हरियाणा राज्यातील करनाल पोलिसांनी चार दहशतवाद्यांना पकडल्यानंतर ते शस्त्रसाठा घेऊन नांदेडमध्ये येत असल्याची माहिती उघड झाली. या पार्श्वभूमीवर नांदेड पोलिसांनी शहरातील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या संशयितांची झाडाझडती घेण्यास सुरुवात केली आहे. तसेच शुक्रवारी रात्रीपासूनच पोलिसांनी शहरात कोम्बिंग ऑपरेशन सुरु केले आहे. अद्याप कितीजणांना पोलिसांनी ताब्यात घेतले? काही शस्त्रसाठा मिळाला याचं विवरण पोलिसांनी दिलं नाही…हरियाणात पकडलेल्या चार सदस्यांच्या चौकशी साठी नांदेड पोलिसांचे एक पथक हरियाणा कडे रवाना झाले आहे… दरम्यान एटीएसने देखील या प्रकरणात आता चौकशी सुरू केल्याची माहिती पुढे येत आहे.

महाराष्ट्रात घातपाताचा डाव?

हरियाणातील करनाल पोलिसांनी गुरुवारी गुरमित, अमनदीप, परमिंदर आणि भूमींदर या चार दहशतवाद्यांना पकडलं. त्यांच्याकडून अनेक हत्यारं, दारूगोळा जप्त करण्यात आला. मूळ पंजाबमधील आता पाकिस्तानात वास्तव्यास असलेल्या दहशतवादी रिंधाच्या सांगण्यावरून हे दहशतावादी शस्त्रास्त्रांचा साठा नांदेडमध्ये आणण्याच्या प्लॅनमध्ये होते, असा पोलिसांना संशय आहे. तसेच याद्वारे महाराष्ट्रात घातपाताचा त्यांचा डाव असावा, असाही अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. यापूर्वीदेखील नांदेडमध्ये शस्त्रसाठा पोहोचलेला असू शकतो, या संशयातून पोलीस रिंधाचे कनेक्शन असलेल्या सर्व आरोपींची झाडा-झडती घेत आहेत.

Non Stop LIVE Update
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.