नारायण राणेंनी ‘ती’ गोष्ट पुस्तकात लिहायला नको होती : शरद पवार

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष नारायण राणे यांच्या आत्मचरित्राच्या (Narayan rane Marathi autobiography) प्रकाशन कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एक किस्सा सांगितला.

नारायण राणेंनी 'ती' गोष्ट पुस्तकात लिहायला नको होती : शरद पवार
Follow us
| Updated on: Aug 16, 2019 | 9:00 PM

मुंबई : महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष नारायण राणे यांच्या आत्मचरित्राच्या (Narayan rane Marathi autobiography) प्रकाशन कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एक किस्सा सांगितला. राणेंनी शिवसेना सोडल्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन पर्याय त्यांच्यासमोर होते, यावेळी काँग्रेसची निवड कशी केली आणि ती योग्य ठरली का, याबाबत पुस्तकात (Narayan rane Marathi autobiography) लिहायला नको होतं, असंही शरद पवार मिश्कील शैलीत म्हणाले.

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या झंझावात या पुस्तक प्रकाशन (Narayan rane Marathi autobiography) कार्यक्रमाला शरद पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मंत्री विनोद तावडे, आशिष शेलार, राष्ट्रवादीचे रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती होती.

अन्याय सहन न करणारा स्वभाव असल्यामुळे नारायण राणे यांनी शिवसेना सोडली. पण त्यांनी एक गोष्ट पुस्तकात लिहायला नको होती. ती म्हणजे काँग्रेसमध्ये जाऊ की राष्ट्रवादीमध्ये असे दोन पर्याय त्यांच्यासमोर होते. ही गोष्ट कुणाला माहित नाही. शेवटी त्यांनी चिठ्ठ्या लिहिल्या आणि त्यातली एक चिठ्ठी उचलली आणि ती काँग्रेसच्या नावाची होती. आता ही चूक होती की घोडचूक यावर मी काही बोलणार नाही, असा टोलाही शरद पवारांनी लगावला.

राणेंचं आत्मचरित्र 192 पानांचं, चर्चा फक्त ‘पान क्र. 81’चीच!

एक नेता म्हणूनही शरद पवारांनी राणेंच्या कामाचं कौतुक केलं. महाराष्ट्रात अर्थसंकल्पावर बोलणारे दोनच नेते होते. एक म्हणजे शेतकरी कामगार पक्षाचे उद्धवराव पाटील आणि दुसरे नारायण राणे. राणेंना मुख्यमंत्री म्हणून पाच वर्षांचा पूर्ण कार्यकाळ मिळायला हवा होता, असंही शरद पवार म्हणाले.

आत्मचरित्रात अनेक गौप्यस्फोट 

राणेंचं आत्मचरित्र याअगोदर इंग्रजीत प्रसिद्ध झालं होतं. आता हे पुस्तक मराठीतही (Narayan rane Marathi autobiography) वाचता येणार आहे. नारायण राणे यांनी ‘No Holds Barred’ नावाचं आत्मचरित्र लिहून, राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडवून दिली होती. नारायण राणेंच्या आत्मचरित्राची (Narayan rane Marathi autobiography) सुरुवातच ‘जर्नी टू नारायण राव’ अशी आहे. एकूण 12 प्रकरणांमधून गौप्यस्फोट, दावे आणि आठवणींना उजाळा देण्यात आला आहे.

नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर एकप्रकारे तिक्ष्ण प्रहार केलेत. 2002 मध्ये आघाडी सरकार पाडण्याचा प्लॅन फसला, असा दावाही राणेंनी केला. सरकार स्थापनेसाठी शिवसेनेकडून अनेक प्रयत्न करण्यात आले. त्यातला एक प्रयत्न 2002 साली झाला. 2002 मध्ये दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडेंसह उद्धव ठाकरेंनी आघाडी सरकार पाडण्याचा प्रयत्न केला. पण हा प्रयत्न अयशस्वी झाला, असं त्यांनी म्हटलंय.

नारायण राणेंनी आपल्या आत्मचरित्रात राज ठाकरेंबद्दलही गौप्यस्फोट केला आहे. “2005 मध्ये शिवसेना सोडल्यानंतर काही दिवसांनी राज ठाकरे माझ्याकडे आले. उद्धव ठाकरेंमुळं आपण त्रासलो असून नवा पक्ष स्थापन करु”, असा प्रस्ताव राज ठाकरेंनी माझ्यासमोर ठेवला. मात्र, “राज ठाकरेंबरोबर मी काम केलेलं आहे. त्यांची कामाची पद्धत मला माहित आहे, त्यामुळे पुन्हा ठाकरेंसोबत काम करु शकत नाही.” असेही राणेंनी आत्मचरित्रात म्हटले आहे.

संबंधित बातम्या :

उद्धव ठाकरेंमुळे शिवसेना सोडावी लागली, राणेंचा आत्मचरित्रात खुलासा

राणेंचा ‘पावरगेम’! पुस्तक प्रकाशनला शरद पवार प्रमुख पाहुणे, मुख्यमंत्र्यांना मात्र वेळ नाही

उद्धव ठाकरेंमुळे शिवसेना सोडावी लागली, राणेंचा आत्मचरित्रात खुलासा

Non Stop LIVE Update
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?.
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला.
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका.
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?.