नारायण राणे, छान भुजबळ शिवसेनेत यायला तयार होते, पण… भरत गोगावलेंचा मोठा गौप्यस्फोट, राज ठाकरेंचाही उल्लेख
कॅबिनेट मंत्री भरत गोगावले यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर नारायण राणे आणि छगन भुजबळ यांना शिवसेनेत प्रवेश देण्यास रोखल्याचा गंभीर आरोप केला आहे. २०१४ मध्ये याबाबत प्रयत्न झाले होते, पण उद्धव ठाकरे यांनी ते थांबवले. गोगावले यांनी राज ठाकरे यांच्याशीही संबंध असलेल्या घटनेचा उल्लेख केला आहे.

“नारायण राणे आणि छान भुजबळ हे सुद्धा शिवसेनेत येणार होते. २०१४ ला प्रयत्न सुद्धा झाले होते. पण उद्धव ठाकरे यांनी कुणाचं काय ऐकल माहीत नाही, त्यामुळे ते सगळं थांबलं”, असा गंभीर आरोप कॅबिनेट मंत्री भरत गोगावले यांनी केला. यावेळी त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबद्दलही उल्लेख केला.
भरत गोगावले यांनी नुकतंच टीव्ही 9 मराठीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी नारायण राणे, छगन भुजबळ, राज ठाकरेंच्या पुन्हा शिवसेनेत येण्याबद्दल वक्तव्य केले. नारायण राणे आणि छान भुजबळ हे सुद्धा शिवसेनेत येणार होते २०१४ ला तेव्हा प्रयत्न सुद्धा झाले होते पण उद्धव ठाकरे यांनी कुणाचं काय ऐकल माहीत नाही त्यामुळे ते सगळं थांबल. जर भुजबळ आणि राणे एकत्र झाले असते आणि शिवसेनेत आले असते पक्षाची ताकद वाढली असती पण त्यावेळी सुद्धा उद्धव ठाकरे यांच्या कानात कोणी काय बोलल माहीत नाही आणि तो पण प्लान गेला, असे भरत गोगावले म्हणाले.
नारायण राणेंचे कोकणात वर्चस्व
आम्ही जेव्हा मातोश्रीवर ये जा करायचो, तेव्हा नारायण राणेंचे काही मित्रमंडळी आणि आमच्या काही चर्चा व्हायच्या. सर्व काही ठरलं होतं. नारायण राणे जर येत असतील तर त्यांना घ्यावं, असं आमचं म्हणणं होतं. त्यांचं कोकणात महाराष्ट्रात एक वेगळं वळ आहे. मुख्यमंत्री असताना त्यांनी अनेकांना मदत केली. त्यांना माणणारा एक वर्ग आहे. त्यामुळे आपण आणखी स्ट्राँग होऊ. या अनुषंगाने आमच्या शिवसैनिकांचे म्हणणं होतं. पण काय कुठे माती शिंकली हे माहिती नाही, असेही गोगावलेंनी सांगितले.
बाळासाहेबांची शिवसेना जर वाचवायची असेल तर
जेव्हा उद्धव ठाकरे आजारी होते, तेव्हा राज ठाकरे स्वत: गाडी चालवत त्यांना लिलावतीला घेऊन गेले. तिथून त्यांना घरीही आणलं. या सर्व गोष्टी आहेत. आम्हाला तेव्हाच वाटत होतं की हे जुळणं गरजेचे आहे. तेव्हा जुळलं असतं तर ते चांगलंच झालं असतं. पण तेव्हाही जुळून दिलं नाही. त्यामुळे हा सर्व खटाटोप झाला. बाळासाहेबांची शिवसेना जर वाचवायची असेल तर एकनाथ शिंदेंच्या रुपाने आपल्याला एकत्र येणं गरजेचे आहे. मी पक्ष सोडलेला नाही. दुसरा पक्ष जॉईन केलेला नाही. आम्ही बाळासाहेबांच्या नावाने पक्ष स्ट्राँग करुन पुढे जात आहोत. पक्षाचं चिन्ह, नाव मिळालं, सर्व मिळालंय, तेच घेऊन आम्ही पुढे चाललो आहोत, असेही भरत गोगावलेंनी म्हटले.
