AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राणेंकडून नवी डेडलाईन, “केंद्रात आणि राज्यात भाजपच येणार, ठाकरे सरकार कोसळणार”

नारायण राणे यांनी पुन्हा एकदा पुढच्या काही महिन्यांमध्ये ठाकरे सरकार कोसळेल, असा दावा केला आहे (Narayan Rane said Thackeray Government will collapse after march 2021).

राणेंकडून नवी डेडलाईन, केंद्रात आणि राज्यात भाजपच येणार, ठाकरे सरकार कोसळणार
नारायण राणे
| Updated on: Dec 28, 2020 | 7:53 PM
Share

सिंधुदुर्ग : महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून भाजप नेते नारायण राणे (Narayan Rane) वारंवार हे सरकार पडणार, अशा प्रकारचं वक्तव्य करत आले आहेत. गेल्या महिन्यात राणे यांनी भाजपकडून ऑपरेशन लोटस राबविलं जात असल्याचा दावा केला होता. त्यानंतर त्यांनी आज पुन्हा ठाकरे सरकार कोसळणार, असं वक्तव्य केलं आहे. याबाबत त्यांनी डेडलाईनदेखील जाहीर केली आहे. 2021 च्या मार्च महिन्यानंतर ठाकरे सरकार कोसळेल, असा दावा त्यांनी केला आहे. याशिवाय हे सरकार कोसळल्यानंतर भाजपचं बहुमताचं भक्कम सरकार स्थापन होईल, असं त्यांनी सांगितलं आहे (Narayan Rane said Thackeray Government will collapse after march 2021).

“येत्या 2021 च्या मार्च महिन्यानंतर महाराष्ट्रात भाजपचं सरकार सत्तेवर येणार. केंद्रातही भाजप आणि महाराष्ट्रातही भाजप सरकार सत्तेवर येणार. सिंधुदुर्गाचे पालकमंत्री आणि खासदार टेंपररी असून ते लवकरच लाँग रजेवर जाणार”, असा दावा राणेंनी केला आहे. त्याचबरोबर चिपी विमानतळ आपणच सुरु करणार, अशी प्रतिक्रिया त्यांनी चिपी विमानतळ पाहणी दौऱ्यानंतर दिली (Narayan Rane said Thackeray Government will collapse after march 2021).

भाजपचे सरकार पाडण्याचे अद्यापही प्रयत्न सुरु?

महाविकास आघाडी सरकार स्थापन होऊन एक वर्षापेक्षा अधिक काळ झाला आहे. गेल्या नऊ महिन्यांपासून महाराष्ट्रात कोरोनाचं संकट आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून अनेक उपाययोजना करण्यात आल्या. मात्र, या कालावधीत विरोधक आणि सरकार यांच्यात अनेकवेळा कलगीतुरा रंगला. नारायण राणे यांनी अनेकवेळा हे सरकार कोसळेल, असा दावा केला. तर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी हे सरकार पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करेल, असा विश्वास व्यक्त केला.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपण सरकार पाडण्यासाठी कोणतेही प्रयत्न करत नसल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे. पण महाविकास आघाडीच्या आंतर्गत कलहातून हे सरकार पडलं तर चांगलं पर्यायी सरकार स्थापन करु, अशी भूमिका त्यांनी अनेकवेळा मांडली आहे. मात्र, दुसरीकडे नारायण राणे यांच्याकडू भाजप सरकार स्थापन होण्यासाठी ऑपरेशन लोटस सुरु असल्याचं वक्तव्य करण्यात आलं आहे. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीला एक वर्ष लोटल्यानंतरही भाजपचा सत्ता स्थापनेचा प्रयत्न सुरु आहे का? असा प्रश्न सर्वसामान्यांकडून उपस्थित केला जातोय.

विधानपरिषतदेच्या बारा जागांचं काय होणार?

विधानपरिषदेच्या राज्यपाल निर्देशित आमदारांच्या नियुक्त्या अद्यापही झालेल्या नाहीत. महाविकास आघाडीतील तीनही पक्षांकडून 12 आमदारांची यादी तयार आहे. ही यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पाठवण्यात आली आहे. मात्र अद्याप यावर शिक्कामोर्तब झालेला नाही. विशेष म्हणजे महाविकास आघाडी सरकारकडून याबाबत दोन वेळा विचारणा करण्यात आली आहे. मात्र अद्याप यावर राज्यपालांनी काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. यामागे नेमकं काय कारण असू शकतं, ते अद्याप समोर आलेलं नाही. मात्र, राजकीय वर्तुळात विविध तर्क वितर्क लढविले जात आहेत. भविष्यात ठाकरे सरकार कोसळले आणि त्याला पर्याय म्हणून भाजप सरकार स्थापन करण्यात यशस्वी झाले तर त्या विधानपरिषदेच्या बाराही जागांवर भाजपला ताबा मिळू शकतो. त्यामुळे या जागांसाठी राज्यपालांकडून अद्यापही मंजुरी देण्यात आलेली नाही की काय? अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहेत.

हेही वाचा : ईडी पुरावे असल्याशिवाय चौकशी करत नाही, त्यांनी पीएमसी बँकेत गैरव्यवहार केले : नारायण राणे

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.