बाळासाहेबांचं नागरिकत्व हिसकावणाऱ्या काँग्रेसवाल्यांनो आरशात तोंड बघा : मोदी

औसा, लातूर :  देशद्रोह्यांबाबत मानवता दाखवणाऱ्या काँग्रेसवाल्यांनी शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नागरिकत्व हिसकावत, मतदानाचा हक्क काढून घेतला होता. त्यामुळे मानवता शिकवणाऱ्या काँग्रेसने स्वत:चं तोंड आरशात बघावं, असा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. लातूरमधील औसा इथं आज शिवसेना-भाजप युतीची जाहीर सभा आयोजित करण्यात आली. या सभेला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उपस्थित …

बाळासाहेबांचं नागरिकत्व हिसकावणाऱ्या काँग्रेसवाल्यांनो आरशात तोंड बघा : मोदी

औसा, लातूर :  देशद्रोह्यांबाबत मानवता दाखवणाऱ्या काँग्रेसवाल्यांनी शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नागरिकत्व हिसकावत, मतदानाचा हक्क काढून घेतला होता. त्यामुळे मानवता शिकवणाऱ्या काँग्रेसने स्वत:चं तोंड आरशात बघावं, असा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. लातूरमधील औसा इथं आज शिवसेना-भाजप युतीची जाहीर सभा आयोजित करण्यात आली. या सभेला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उपस्थित राहिले.

विश्वास हीच गेल्या 5 वर्षांची माझी कमाई आहे. सशक्त भारत बनवण्याचा संकल्प आम्ही समोर ठेवला आहे. एकीकडे आमची नीती आणि नियत आहे, दुसरीकडे विरोधकांचा दुटप्पीपणा आहे . मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालण्याचा आमचा प्रयत्न आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

काँग्रेसच्या जाहीरनाम्यात जम्मू काश्मीरमधील कलम 370 ला धक्का लावणार नाही असं म्हटलं आहे. पाकिस्तानलाही हेच हवं आहे. देशद्रोह्यांना शिक्षा देणार नाही असंही काँग्रेसने म्हटलं आहे. मात्र तो जाहीरनामा पाकिस्तान प्रेरित आहे. पाकिस्तानला देशद्रोह्यांचा पुळका आहे, असा हल्लाबोल नरेंद्र मोदींनी केला.

भर उन्हात सकाळी 9 पासून तळपत राहणाऱ्या जनतेची तपश्चर्या वाया जाऊ देणार नाही, विकासारुपी ती परत करेन.  तळपत्या उन्हात तुम्ही बसला आहात, ही तपस्या वाया जाऊ देणार नाही, विकासाच्या माध्यमातून व्याजासकट परत करेन, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

काँग्रेसकडून देशाला काहीच अपेक्षा नाही, मात्र शरद पवार तुम्ही पण? तुम्हाला शोभतं का? तुम्ही काँग्रेससोबत शोभत नाही, असं टीकास्त्र नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर सोडलं.

काँग्रेससह त्यांच्या महामिलावट सहकाऱ्यांनी देशाच्या सुरक्षेची अवस्था बिकट केली आहे. जम्मू-काश्मीरसाठी वेगळा पंतप्रधान हवा, अशी मागणी करण्यात येत आहे. त्यांच्या बाजूने काँग्रेस आहे. काँग्रेसकडून लोकांना अपेक्षा नाही मात्र, शरदराव तुम्हाला हे शोभतं का? असा सवाल यावेळी मोदींनी उपस्थित केला.

नरेंद्र मोदी लाईव्ह अपडेट

किसान क्रेडिट कार्डद्वारे विनाव्याज कर्ज मिळेल, अशी आमची जाहीरनाम्यातून घोषणा आहे – मोदी

शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट व्हावं, हेच आमचं ध्येय आहे – मोदी

काँग्रेसकडून देशाला काहीच अपेक्षा नाही, मात्र शरद पवार तुम्ही पण? तुम्हाला शोभतं का? तुम्ही काँग्रेससोबत शोभत नाही – मोदी

काँग्रेसच्या जाहीरनाम्यात ज्या गोष्टी, तेच पाकिस्तान बोलत आहे – मोदी

काँग्रेसवाल्यांनी बाळासाहेब ठाकरेंचा नागरिकत्व आणि मतदानाचा अधिकार हिसकावून घेतला होता

नक्षलवाद्यांवर प्रहार आणि आदिवासींपर्यंत विकास पोहोचवण्यासाठी आम्ही दिवस-रात्र मेहनत केली आहे

दहशतवाद्यांच्या अड्ड्यात घुसून ते उद्ध्वस्त करु , दहशतवाद्यांना घुसून मारु, हीच नव्या भारताची निती आहे

छत्रपती शिवरायांनी कणखर महाराष्ट्राची बांधणी केली, तशीच भारताची वाटचाल सुरु आहे – नरेंद्र मोदी

लातूर आणि आजूबाजूचा परिसर संकटाशी लढून पुन्हा उभं राहण्याची प्रेरणा देतो

तळपत्या उन्हात तुम्ही बसला आहात, ही तपस्या वाया जाऊ देणार नाही, विकासाच्या माध्यमातून व्याजासकट परत करेन

भर उन्हात सकाळी 9 पासून तळपत राहणाऱ्या जनतेची तपश्चर्या वाया जाऊ देणार नाही, विकासारुपी ती परत करेन – नरेंद्र मोदी लाईव्ह

लातूरमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी लाईव्ह, उद्धव ठाकरेंचा लहान भाऊ असा उल्लेख

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून लातुरात मराठी भाषेतून भाषणाला सुरुवात

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *