AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तर या कारणामुळेच ठाकरे गटात उभी फूट, शिंदेंच्या बड्या नेत्याने सगळं सांगून टाकलं!

एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करून थकले आहेत. आता डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यावर टीका केली जात आहे. ते घाबरले आहेत. मी त्यांना समजू शकतो. श्रीकांत शिंदे हे देशपातळीवर प्रस्थापित होत आहेत, त्यांचे नेतृत्व आंतरराष्ट्रीय स्तरावर पाहायला मिळत आहे, अशी स्तुती नरेश म्हस्के यांनी श्रीकांत शिंदे यांची केली.

तर या कारणामुळेच ठाकरे गटात उभी फूट, शिंदेंच्या बड्या नेत्याने सगळं सांगून टाकलं!
uddhav thackerayImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 19, 2026 | 3:45 PM
Share

Naresh Mhaske : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पक्षात आता दुसऱ्यांदा मोठी फूट पडली आहे. त्यांच्या पक्षाचे एकूण सहा खासदार शिंदे गटात जाणार आहेत. कायदेशीर प्रक्रियांचा अभ्यास करूनच त्यांच्या पक्षप्रवेशाची घोषणा केली जाणार आहे. सध्या बंडखोर खासदारांनी आपल्या सहीचे पत्र लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना सोपवल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, या पक्षफुटीमुळे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत चांगलेच आक्रमक झालेआहेत. त्यांनी बंडखोरांना फोडून काढा असे आपल्या पक्षाच्या शिवसैनिकांना सांगितले आहे. राऊतांच्या या भाषेनंतर एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे नेते राऊत यांच्यावर सडकून टीका करत आहेत. शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी तर राऊतांची मानसिक स्थिती बिघडली आहे, अशी बोचरी टीका केली. तसेच ठाकरे यांच्या खासदारांनी साथ का सोडली, यावरही त्यांनी भाष्य केलंय.

म्हणून खासदार फुटले

संजय राऊत हे उद्धव ठाकरे यांना काँग्रेससोबत घेऊन गेले. त्यामुळेच उद्धव ठाकरे संपले आहेत. आता राऊतांनी राष्ट्रवादीने काँग्रेसमध्ये विलीन व्हायला पाहिजे, असा सल्ला दिला. या सल्ल्यामुळे शिवसैनिक घाबरले आहेत. आपली शिवसेनादेखील (ठाकरे गट) काँग्रेसमध्ये विलीन करतात की काय, अशी भीती ठाकरे गटाच्या शिवसैनिकांना लागली आहे. म्हणूनच हे शिवसैनिक उद्धव ठाकरे यांची साथ सोडत आहेत, असा हल्लाबोल नरेश म्हस्के यांनी केला.

कोरोना काळात उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते, तेव्हा….

तसेच किती दिवस त्यांच ऐकणार तुम्ही, त्यांनी तुमचं पूर्ण वाटोळ केलं, असंही म्हस्के उद्धव ठाकरे यांना उद्देशून म्हणाले.कोरोना काळात उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते. ते मुख्यमंत्री असताना घरातच होते. ते काय रक्ताचं पाणी करणार. ते शेतकऱ्यांच्या बांधावर कधी गेले असे विचारत ते शिवसैनिकांच्या सुख दु:खात कधी गेले याचे जरा पुरावे देण्याचे आव्हान नरेश म्हस्के यांनी केले.

श्रीकांत शिंदे देशपातळीवरील प्रस्थापित नेतृत्त्व

ठाकरेंच्या खासदारांना वेगवेगळ्या ऑफर दिल्या जात आहेत, असा आरोप केला जातोय. यावरही नरेश म्हस्के यांनी उत्तर दिले आहे. एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करून थकले आहेत. आता डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यावर टीका केली जात आहे. ते घाबरले आहेत. मी त्यांना समजू शकतो. श्रीकांत शिंदे हे देशपातळीवर प्रस्थापित होत आहेत, त्यांचे नेतृत्व आंतरराष्ट्रीय स्तरावर पाहायला मिळत आहे, अशी स्तुती नरेश म्हस्के यांनी श्रीकांत शिंदे यांची केली.

Follow Us
शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग
Drone In Farm | शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग, व्हिडिओ बघाच
पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
Rohit Pawar | पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम; शेतकऱ्यांसाठी 50 हजारांची मदत अन्...
महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
Sanjay Raut | महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... संजय राऊतांचा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल
मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या...
Radhakrishna Vikhe Patil | मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या संसदेत मिळवलं स्थान
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम