AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nashik Election | अखेर नाशिक महापालिकेवर प्रशासक; पण निवडणूक कधी होणार?

महापालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेवरील हरकतींची संख्या मोठी आहे. त्यामुळे शिफारशींचा अहवाल सादर करण्याची मुदत राज्य निवडणूक आयोगाने तीन दिवसांनी वाढवून पाच मार्चपर्यंत नेली आहे.

Nashik Election | अखेर नाशिक महापालिकेवर प्रशासक; पण निवडणूक कधी होणार?
Nashik Municipal Corporation.
| Edited By: मनोज कुलकर्णी | Updated on: Mar 03, 2022 | 3:21 PM
Share

नाशिकः नाशिक (Nashik) महापालिकेची (municipal corporation) निवडणूक (election) विहित वेळेच्या आत होत नसल्याने अखेर नगरविकास विभागाने प्रशासकाची नियुक्ती केलीय. त्यानुसार येणाऱ्या 14 मार्चपासून प्रशासक म्हणून महापालिका आयुक्त कैलास जाधव हे कामकाज पाहणार आहेत. विद्यमान महापौर आणि उपमहापौरांची मुदत येत्या 15 मार्चला संपतेय. सध्या प्रभाग रचनेच्या हरकती आणि आक्षेपावर सुनावणी पूर्ण झाली आहे. या सुनावणीचे व्हिडिओ चित्रीकरणही करण्यात आले आहे. यावरचा अहवाल निवडणूक आयोगाकडे सादर केला जाणार आहे. त्यानंतर अंतिम आराखडा जाहीर केला जाणार आहे.

अहवालास मुदतवाढ

महापालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेवरील हरकतींची संख्या मोठी आहे. त्यामुळे शिफारशींचा अहवाल सादर करण्याची मुदत राज्य निवडणूक आयोगाने तीन दिवसांनी वाढवून पाच मार्चपर्यंत नेली आहे. या मुदतवाढीचा परिणाम अंतिम प्रभाग रचनेच्या प्रसिद्धीवर होणार असल्याने नाशिक महापालिकेची अंतिम प्रभाग रचना आठवडाभर लांबणीवर पडणार आहे. त्यामुळे 15 मार्चपर्यंत महापालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर होऊ शकते.

अशी झाली प्रभाग रचना…

महापालिकेच्या 133 जागांसाठी 3 सदस्यीय पद्धतीने 44 प्रभागांच्या कच्च्या रचनेचा आराखडा तयार करण्यात आला आहे. नाशिकमध्ये सुरुवातीला म्हणजे 26 ऑगस्ट रोजी निवडणूक आयोगाने एक सदस्यीय प्रभाग रचनेसाठी कच्चा आराखड्याचे काम करण्याचे आदेश दिले होते. मात्र, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत तीन सदस्यीय प्रभाग रचना झाली. त्यानुसार या कामात पुन्हा बदल झाला. आता नगरसेवकांची संख्याही 122 वरून 133 वर नेण्यात आली. त्यामुळे या कामात पुन्हा बदल करावा लागला.

एक प्रभाग 33 हजारांचा

पूर्वीच्या नियोजनानुसार साधरणतः 36 हजार लोकसंख्येचा एक प्रभाग होता. मात्र, नगरसेवकांची संख्या वाढल्यानंतर आता एका प्रभागाची लोकसंख्या 33 हजारांच्या घरात असेल. त्यामुळे कच्च्या प्रभाग रचनेचे काम पुन्हा करावे लागले. प्रभाग रचना तयार करताना प्रत्येक प्रभागानुसार निवडणूक आयोगाचे अधिकारी आणि महापालिकेचे अधिकारी यांच्यात चर्चा झाली. त्यात चतुःसीमा, रस्ते, नदी-नाले याच्या नियमांचे पालन झाले आहे का, हे तपासण्यात आले. नाशिकमधील काही प्रभागांमध्ये ब्लॉक जुळवणीबाबतचे आक्षेप होते. ते सुद्धा ध्यानात घेतले. त्यानंतर प्रभागरचना अंतिम करण्यात आली.

करेक्ट कार्यक्रम

महापालिकेतील काही मातब्बर नगरसेवकांनी त्यासाठी खेळी केली असून, आपल्या सोयीनुसार वार्डांची रचना केली आहे आणि आपल्याला अडथळे ठरणाऱ्या स्वकीयांचे पत्ते कट करून त्यांचा करेक्ट कार्यक्रम केल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे ही सारी चर्चा नगरसेवकांत सुरू आहे. सध्याच्या प्रभाग क्रमांक 11 मधील कामगारनगर हा परिसर महात्मानगरला जोडण्यात आल्याचे समजते. असे प्रकार इतर ठिकाणीही झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे इच्छुकांमध्ये संताप आहे.

अशी होणार निवडणूक…

– त्रिसदस्यीय पद्धतीने प्रभाग

– आता 133 नगरसेवक

– एकूण प्रभाग 44

– 43 प्रभाग 3 सदस्यीय

– 1 प्रभाग 4 सदस्यीय

पक्षीय बलाबल

– भाजप – 66 (एका नगरसेवकाचे निधन. सध्या 64)

– शिवसेना – 35 (सध्या 33)

– राष्ट्रवादी – 6

– काँग्रेस – 6

– मनसे – 5

– अपक्ष – 4

इतर बातम्याः

चर्चा तर होणारच: केंद्रीय मंत्री भागवत कराडांच्या दौऱ्याचे नाशिकमध्ये ‘कुर्रर्रर’ राजकीय नाट्य…!

कापडणीस पिता-पुत्राचा 4 जणांनी केला मर्डर; नाशिकमधील शेअर्स कंपनीच्या मॅनेजरचा सहभाग

चिन्मय, पूजा, सिद्धार्थला सुविचार गौरव पुरस्कार; जयंत पाटलांच्या हस्ते 10 मान्यवरांचा नाशिकमध्ये होणार सन्मान

Follow Us
व्हिडीओ पाहा, पोट धरून हसाल; मुंबई पोलिसांच्या तावडीतून कॉक्रोच पळाले
Viral Video | व्हिडीओ पाहा, पोट धरून हसाल; मुंबई पोलिसांच्या तावडीतून कॉक्रोच पळाले
संध्याकाळी 6 वाजता राहुल गांधींची खासदारांसोबत बैठक,
संध्याकाळी 6 वाजता बैठक, पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेरील आंदोलनानंतर कॉंग्रेसची पुढील रणनीती काय?
मी फक्त भारताच्या बाजूने... सुव्रत जोशींची पोस्ट चर्चेत
Suvrat Joshi | मी फक्त भारताच्या बाजूने... सुव्रत जोशींची पोस्ट चर्चेत; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला समर्थन
मोठी बातमी! CJPच्या आंदोलनानंतर केंद्रात मोठ्या हालचाली, अमित शहा...
मोठी बातमी! CJPच्या आंदोलनानंतर केंद्रात मोठ्या हालचाली, अमित शहा घेणार लोकसभा अध्यक्षांची भेट
आसाममध्ये महापूराचं संकट कायम; 24 तासांत मृतांचा आकडा 31 वर
Assam Flood | आसाममध्ये महापूराचं संकट कायम; 24 तासांत मृतांचा आकडा 31 वर
एका हाताने पोलिस व्हॅन रोखली! मुंबईच्या तरुणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल
Viral Video | एका हाताने पोलिस व्हॅन रोखली! मुंबईच्या तरुणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल
मंत्रीपदासाठी थेट पक्षच बदलता येत नाही; CM फडणवीसांचं नाव घेत...
मंत्रीपदासाठी थेट पक्षच बदलता येत नाही; CM फडणवीसांचं नाव घेत शिंदेंचा नेता स्पष्टच म्हणाला
MPSC कडून निवड पद्धतीत मोठा बदल, अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होण्याआधी..
MPSC कडून निवड पद्धतीत मोठा बदल, आता अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होण्याआधी...काय बदलणार?
राहुल गांधींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं थेट आव्हान, तुम्ही....
Devendra Fadnavis| राहुल गांधींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं थेट आव्हान, तुम्ही पळकुटेपणा...
विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर लक्ष द्यायला हवं! शरद पवारांची...
Sharad Pawar | विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर लक्ष द्यायला हवं! शरद पवारांची पंतप्रधान मोदींना थेट विनंती