AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अशोक खरातला मोठा दणका, पोस्को अतंर्गत गुन्हा दाखल, रुपाली पाटील ठोंबरे यांची ती पोस्ट चर्चेत

अशोक खरात याच्या अडचणी आता आणखी वाढल्या आहेत. त्याच्याविरोधात आता पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावरून रुपाली पाटील ठोंबरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत रुपाली चाकणकर यांच्यावर पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे.

अशोक खरातला मोठा दणका, पोस्को अतंर्गत गुन्हा दाखल, रुपाली पाटील ठोंबरे यांची ती पोस्ट चर्चेत
Ashok Kharat Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 27, 2026 | 6:29 PM
Share

नाशिकचा भोंदुबाबा अशोक खरात याच्या अडचणी आता वाढतच आहेत. महिला अत्याचार प्रकरणात त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल झाले आहेत. दरम्यान आता अशोक खरात याच्यावर पोस्कोअतंर्गत देखील गुन्हा दाखल झाला आहे. अशोक खरात सध्या पोलीस कोठडीमध्ये असून, त्याला न्यायालयानं 29 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याची एसआयटीकडून देखील चौकशी सुरू आहे. दरम्यान अशोक खरात याच्यावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर पुन्हा एकदा रुपाली पाटील ठोंबरे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत रुपाली चाकणकर यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

नेमकं काय म्हणाल्या ठोंबरे? 

‘भोंदूबाबा 10वी नापास खरातने, शालेय विद्यार्थ्यांना सुद्धा सोडले नाही त्यांच्यावर त्याचे आई वडील बाहेर थांबून नराधमाने अत्याचार केला.पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल . राज्य महिला आयोग चाकणकर तू संविधान पदावर बसून महाराष्ट्राचे माता भगिनी लेकरांचे कुटुंबाचे वाटोळे केले बाई. तात्काळ अटक झाली पाहिजे. तुझे चोचले पूर्ण करणाऱ्या लोकांसह 100 फटके मारून 1 मोजले पाहिजे.’ अशी पोस्ट रुपाली पाटील ठोंबरे यांनी केली आहे.

दरम्यान दुसरीकडे आज शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी देखील या प्रकरणात पत्रकार परिषद घेऊन महायुतीवर जोरदार हल्लाबोल केला आहे. सुषमा अंधारे यांनी या पत्रकार परिषदेमध्ये काही नेत्यांचे अशोक खरातसोबतचे फोटो दाखवले आहेत. यामध्ये भाजपचे मंत्री अतुल सावे आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांचा समावेश आहे. सुषमा अंधारे यांनी दीपक केसरकर आणि रुपाली चाकणकर यांचे अशोक खरात सोबत असलेले काही फोटो दाखवले आहेत. दीपक केसरकर यांची एसआयटी चौकशी करावी, दीपक केसरकर आणि चाकणकर यांचे कॉले रेकॉर्ड तपासावेत अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली आहे. दरम्यान खरात आणि केसरकर यांचा नेमका काय संबंध आहे? असा सवालही यावेळी त्यांनी  उपस्थित केला आहे. आता या प्रकरणात खरात याच्यावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाल्यामुळे त्याच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?