AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खजाना आहे आपल्याकडं खजाना, …अन् सुषमा अंधारेंनी अशोक खरात सोबत दीपक केसरकरांचे ते सर्व फोटो दाखवले

आता शिवसेना शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांच्या देखील अडचणी वाढण्याची शक्यता आहे. त्यांचे अशोक खरातसोबतचे काही फोटो समोर आले आहेत. सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषदेमध्ये हे फोटो दाखवले आहेत.

खजाना आहे आपल्याकडं खजाना, ...अन् सुषमा अंधारेंनी अशोक खरात सोबत दीपक केसरकरांचे  ते सर्व फोटो दाखवले
Sushma Andhare Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 27, 2026 | 4:58 PM
Share

राज्यात सध्या अशोक खरात प्रकरण चांगलंच गाजत आहे. अशोक खरात याच्याविरोधात एका महिलेनं तक्रार दाखल केली होती, त्यानंतर त्याचे एक -एक कारनामे समोर येण्यास सुरुवात झाली आहे.  या प्रकरणानं राज्यभरात मोठी खळबळ उडाली आहे. अशोक खरात सध्या पोलीस कोठडीमध्ये असून, न्यायालयानं त्याला 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान अशोक खरात सोबत अनेक राजकीय नेत्यांचे फोटो समोर आले आहेत. त्यामुळे आता या नेत्यांच्या अडचणी देखील वाढल्या आहेत. रुपाली चाकणकर यांनी आधीच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. तर दुसरीकडे आता शिवसेना शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांच्या देखील अडचणी वाढण्याची शक्यता आहे. त्यांचे अशोक खरातसोबतचे काही फोटो समोर आले आहेत.

या सर्व पार्श्वभूमीवर आज शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेतली, या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी दीपक केसरकर यांचे काही फोटो दाखवून अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.  केसरकरांच्या चौकशीची मागणी एसआयटीकडे केली आहे. चाकणकर आणि केसरकरांचे कॉल रेकॉर्ड तपासावेत, केसरकरांचा खरातसोबत नेमका काय संबंध आहे? असा सवाल यावेळी अंधारे यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान अंधारेंनी या पत्रकार परिषदेमध्ये दीपक केसरकर यांच्यासोबतच भाजपचे मंत्री अतुल सावे आणि  हेमंत गोडसे यांचे देखील फोटो दाखवले आहेत.  यामध्ये रुपाली चाकणकर यांच्या देखील काही फोटोंचा समावेश आहे.

सुषमा अंधारे यांनी अशोक खरात याच्यासोबत दीपक केसरकर यांचे काही फोटो दाखवले आहेत. या फोटोमध्ये चाकणकर देखील दिसत आहेत. हे फोटो पत्रकार परिषदेमध्ये दाखवताना चाकणकर एमआयडीसीच्या चेअरमन होत्या का? असा सवालही अंधारे यांनी केला आहे. तसेच आपण केसरकरांच्या चौकशीची मागणी एसआयटीकडे केली असल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे. या प्रकरणावरून अंधारे यांनी मुख्यमंत्र्यांवर देखील निशाणा साधला आहे. 2024 साली अशोक खरात याच्या बंदुकीच्या परवान्याचं नुतनीकरण कोणी केलं? असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?