Nashik Corona | वैद्यकीय अधिकाऱ्यासह अख्खे आरोग्य केंद्र कोरोनाबाधित, दोन दिवस ठोकणार टाळे!

| Updated on: Jan 25, 2022 | 2:57 PM

सध्या जिल्ह्यात रुग्णांच्या संख्येत वाढ होत असली तरी बहुतांश जणांना ओमिक्रॉनची (Omicron) बाधा झाल्याने हॉस्पिटमध्ये दाखल होण्याचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला आहे.

Nashik Corona | वैद्यकीय अधिकाऱ्यासह अख्खे आरोग्य केंद्र कोरोनाबाधित, दोन दिवस ठोकणार टाळे!
Corona
Follow us on

नाशिकः नाशिकमध्ये (Nashik) कोरोना (Corona) रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यातही निफाड तालुक्यातील नैताळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णांवर उपचार करणारे बहुतांश आरोग्य कर्मचारी कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यामुळे आरोग्य केंद्राला दोन दिवस टाळे ठोकण्यात आले आहे. सध्या जिल्ह्यात रुग्णांच्या संख्येत वाढ होत असली तरी बहुतांश जणांना ओमिक्रॉनची (Omicron) बाधा झाल्याने हॉस्पिटमध्ये दाखल होण्याचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला आहे. शिवाय जिल्ह्यात कोरोनाची तिसरी लाटही आगामी काळात खूप काही तीव्र येईल, ही शक्यता मावळली आहे.

16 हजार 987 रुग्ण

नाशिक जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या सध्याही जास्तच आहे. सध्या महापालिका क्षेत्रासह नाशिक, निफाड, सिन्नर आणि दिंडोरीमध्ये कोरोना रुग्ण झपाट्याने वाढत असल्याचे समोर येत आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील 4 लाख 25 हजार 918 कोरोना बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीत 16 हजार 987 रुग्णांवर उपचार सुरू आहे. तसेच आत्तापर्यंत 8 हजार 783 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यातच निफाड तालुक्यातील नैताळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णांवर उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांसह 80 % आरोग्य कर्मचारी कोरोना बाधित झाल्याचे समोर आले. त्यामुळे हे केंद्र दोन दिवस बंद राहणार असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी यांनी दिली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र स्वच्छ करून सॅनिटाइजेशन केले जात आहे.

तरीही मोठा दिलासा

नाशिकमध्ये कोरोना लसीकरण आणि टेस्टिंगसाठी विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. जिल्ह्यातील रुग्णसंख्या वाढत असली, तरी दररोज रिकव्हर होणाऱ्या रुग्णांची संख्याही मागील दोन लाटांच्या तुलनेत चांगली आहे. त्यामुळे मृत्युदरही कमी आहे. मात्र, वाढती रूग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी लसीकरण व टेस्टींगची विशेष मोहीम राबवून त्यांवर संबंधित यंत्रणांमार्फत दैनंदिन सनियंत्रण ठेवले जाईल. दोन ते अडीच पटींनी लसीकरण व टेस्टींगचे प्रमाण वाढविण्यात येणार आहे. बालकांच्या मधील संक्रमणाची आत्तापर्यंतची टक्केवारी ही केवळ 10 टक्के एवढीच असल्याने जिल्हा प्रशासनाने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, बालकांच्या आरोग्याशी कुठल्याही शाळा प्रशासनाने व स्थानिक स्वराज्य संस्थांनी तडजोड न करता शाळा सुरू करताना बारकाईने नियंत्रण व निरीक्षणाची आवश्यकता आहे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

इतर बातम्याः

Nashik MHADA | म्हाडा भूखंडात कोट्यवधींचा घोटाळा; मंत्री आव्हाडांचा सलग 2 ट्वीटमधून बॉम्बगोळा!

Nashik | ऑनलाईन शिक्षणाने मारले, 11 वीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या; 2 महिन्यांतली तिसरी घटना

National Children’s Award | 14 किलोमीटर खाडी 4 तास 9 मिनिटांत पोहून पार; ‘स्वयंम’च्या यशाने पंतप्रधानही भारावले…!