Nashik Corona : बेड मिळत नसल्याने काल ऑक्सिजन सिलेंडरसह आंदोलन, आज त्याच कोरोना रुग्णाचा मृत्यू

Nashik Corona Update नाशिक महापालिकेत ऑक्सिजन सिलेंडरसह आंदोलन करणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू

Nashik Corona : बेड मिळत नसल्याने काल ऑक्सिजन सिलेंडरसह आंदोलन, आज त्याच कोरोना रुग्णाचा मृत्यू
नाशिक महापालिकेसमोर कोरोना रुग्णानं ठिय्या आंदोलन केलेलं


नाशिक: राज्यात कोरोना विषाणू संसर्गाची दुसरी लाट आल्याचं चित्र आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका मोठ्या शहरांना बसल्याचं दिसून आलं आहे. वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणेतील त्रुटी समोर आणणाऱ्या घटना समोर येत आहेत. नाशिक महापालिकेत ऑक्सिजन सिलेंडरसह बुधवारी आंदोलन करणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. रुग्णालयात बेड मिळत नसल्यानं महापालिका मुख्यालयात रुग्णानं आंदोलन केलं होतं. (Nashik corona patient who protest yesterday at municipal corporation office for bed died in midnight )

बुधवारी सांयकाळी आंदोलन

नाशिक महापालिका क्षेत्रातील हॉस्पिटलमध्ये बेड मिळावा यासाठी कोरोनाबाधितानं आंदोलन केलं होते. बुधवारी संध्याकाळी महापालिका मुख्यालयात रुग्णानं ऑक्सिजन सिलेंडरसह ठिय्या मांडला होता. संबंधित कोरोना रुग्णाच्या आंदोलनानं महापालिका परिसरात खळबळ माजली होती. आंदोलनानंतर पालिका प्रशासनानं त्या रुग्णाला बिटको रुग्णालयात रुग्णालायात दाखल केलं होतं. महापालिका प्रशासनानं ऑक्सिजन बेडसह आंदोलन करणाऱ्या व्यक्तीला बिटको रुग्णालयात दाखल केलं होतं. मध्यरात्री बिटको रुग्णालयात संबंधित रुग्णाचा मृत्यू झाला.

आंदोलनासाठी महापालिकेत आणणारांवर गुन्हा

कोरोनाबाधित रुग्णाला आंदोलन करण्यासाठी महापालिकेत आणणाऱ्या व्यक्तींवर पालिकेकडून कारवाई होणार आहे. बेड मिळत नसल्याने संबंधित रुग्णाला महापालिकेत आणणाऱ्या व्यक्तींवर सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भाजी बाजारात नियमांचा फज्जा

भाजी बाजारात जाण्यासाठई 5 रुपये शुल्क आकरण्यात येत होते. ही पावती घेण्यासाठीही नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. पावती घेण्यासाठी नागरिकांनी भली मोठी रांग लावली होती. त्यावेळी सोशल डिस्टन्सिंगचे तीन तेरा वाजल्याचं दिसून आलं. गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पलिकेनं भाजी बाजारात प्रवेशासाठी शुल्क आकारणीचा निर्णय घेतला होता. पण त्याचा उलटाच परिणाम पाहायला मिळाला.

देवळा तालुक्यात 10 दिवस जनता कर्फ्यू

नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यात 1 एप्रिलपासून 10 दिवस जनता कर्फ्यूची घोषणा करण्यात आली आहे. देवळा तालुक्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढल्यानं सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत हा निर्णय घेण्यात आलाय. कोरोनाची साखळी खंडीत करण्यासाठी जनता कर्फ्यूचा निर्णय घेतला गेलाय. जनता कर्फ्यू दरम्यान अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकानं आणि आस्थापना पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहेत. किराणा दुकानंही बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय.

संबंधित बातम्या:

ऑक्सिजन सिलेंडर घेऊन कोरोना रुग्णाचा महापालिकेसमोर ठिय्या, बेड मिळत नसल्याने आंदोलनाची वेळ!

बाजारपेठेत खरेदीला जाणा-या ग्राहकांवर टोल, मनपा आणि पोलिंसानी अनोखी शक्कल का लढवली?

 

(Nashik corona patient who protest yesterday at municipal corporation office for bed died in midnight )

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI