AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nashik Corona | कोरोना रुग्णसंख्या कमी, मृत्यू थांबले, पण निर्बंधाचा फास कधी होणार सैल?

नाशिक जिल्ह्यात सध्या कोरोना रुग्णांची संख्या अतिशय कमी आहे. तिसरी लाट येण्याची शक्यता नाही. मृत्यू थांबले आहेत, पण जिल्ह्यातील कोरोना निर्बंध कायम आहेत. त्यामुळे विवाह सोहळ्यापासून ते राजकीय कार्यक्रमही अवघ्या पन्नास टक्के उपस्थितीत पार पाडावे लागत आहेत.

Nashik Corona | कोरोना रुग्णसंख्या कमी, मृत्यू थांबले, पण निर्बंधाचा फास कधी होणार सैल?
प्रातिनिधिक छायाचित्र.
| Updated on: Mar 09, 2022 | 7:05 AM
Share

नाशिकः नाशिक (Nashik) जिल्ह्यात कोरोनाच्या दोन्ही लाटांनी हाहाकार माजवला. ऑक्सिजनसाठी लोक रस्त्यावर रांगेत उभे राहिले. कित्येकांनी तडफडून प्राण सोडले. मात्र, सध्या कोरोना रुग्णांची संख्या अतिशय कमी आहे. तिसरी लाट येण्याची शक्यता नाही. मृत्यू थांबले आहेत, पण जिल्ह्यातील कोरोना (Corona) निर्बंध कायम आहेत. त्यामुळे विवाह सोहळ्यापासून ते राजकीय कार्यक्रमही अवघ्या पन्नास टक्के उपस्थितीत पार पाडावे लागत आहेत. हे निर्बंध लागू राहण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे नागरिकांनी लसीकरणाकडे (Vaccination) फिरवलेली पाठ आहे. हे लसीकरण कधी वाढणार, त्यासाठी प्रशासन काही सक्तीची पावले उचलणार का, हे पाहावे लागेल.

नेमके प्रकरण काय?

राज्यातील ज्या जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेणाऱ्या नागरिकांचे प्रमाण 90 टक्के आहे, तर दुसरा डोस घेणाऱ्यांचे प्रमाण 70 टक्के आहे, त्या जिल्ह्यांचे निर्बंध राज्य सरकारने मागे घेतले आहेत. त्यानुसार राज्यातील मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, भंडारा, नागपूर, वर्धा, गोंदिया, चंद्रपूर जिल्ह्यातील निर्बंध मागे घेण्यात आले आहेत. मात्र, नाशिक जिल्ह्याचे लसीकरणाचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे येथील निर्बंध कधी सैल होणार, याकडे नागरिकांचे लक्ष आहे.

नाशिकचे लसीकरण किती?

2011 च्या जनगणेनुसार कोरोना लसीकरण लाभार्थ्यांची संख्या ही साडेचौदा लाख आहे. त्यापैकी 13 लाख 55 हजार 668 लोकांनी पहिला डोस घेतलाय. तर यापैकी 10 लाख 32 हजार 162 नागरिकांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. नाशिक महापालिका हद्दीचा विचार केला, तर पहिला डोस घेतलेल्या व्यक्तींची संख्या ही 93 टक्के आणि दुसरा डोस घेतलेल्या व्यक्तींची संख्या ही 71 टक्के आहे. मात्र, जिल्ह्याच्या ग्रामीण भागात हे प्रमाण कमी आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्याचे निर्बंध अजूनही कायम आहेत.

मृत्यू थांबले, रुग्ण घटले

नाशिक जिल्ह्यात सुरू असलेले कोरोना मृत्यूचे सत्र सध्या थांबले आहे. आतापर्यंत कोरोनामुळे नाशिकच्या ग्रामीण भागात 4 हजार 304 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून 4 हजार 105, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रातून 364 व जिल्हा बाहेरील 126 अशा एकूण 8 हजार 899 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे जिल्ह्यातील रुग्णही घटले आहेत. सध्या 216 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीण मध्ये 97.50 टक्के, नाशिक शहरात 98.46 टक्के, मालेगावमध्ये 97.34 टक्के, तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण 98.43 टक्के तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण 98.08 इतके आहे.

इतर बातम्याः

Nashik | उद्योजकाच्या घरावर दरोडा; बाळाच्या मानेवर सुरा ठेवून 50 तोळे सोने लुटले, महिलांचे तोंड चिकटपट्टीने बंद!

नाशिक – दिंडोरी सिटी बस सुरू; गामीण भागात वाढवला विस्तार, मार्ग काय राहणार?

मालेगाव महापालिकेचे प्रताप; पोलीस मैदानाच्या सरकारी जागेची इदगाह ट्रस्टला खिरापत

पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप.
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा.
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही.
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब.
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत.
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका.
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?.
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य.
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.