AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धक्कादायक, माजी विद्यार्थ्याने महिला प्रोफेसरलाच प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, नको ते व्हिडिओ बनवले अन्..महाराष्ट्रातली घटना

महाराष्ट्रात एक धक्कादायक घटना घडली आहे. कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना ओळख झालेली. नंतर त्या विद्यार्थ्यानेच चक्क प्राध्यापिकेला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं.

धक्कादायक, माजी विद्यार्थ्याने महिला प्रोफेसरलाच प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, नको ते व्हिडिओ बनवले अन्..महाराष्ट्रातली घटना
Nashik
| Updated on: Oct 06, 2026 | 10:54 AM
Share

पवन येवले प्रतिनिधी : विद्यार्थी आणि शिक्षक हे गुरु-शिष्याचं नातं आहे. पण काही अपवाद असतात. अशावेळी हे नातं वेगळ्या वळणावर जातं. अशीच एक धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडली आहे. एका विद्यार्थ्याने चक्क आपल्या प्राध्यापिकेलाच प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना या विद्यार्थ्याची प्राध्यापिकेसोबत ओळख झाली. पुढे प्राध्यापिकेची दुसऱ्या महाविद्यालयात बदली झाली. त्यावेळी हा माजी विद्यार्थी पुन्हा संपर्कात आला. त्याने गोडीगुलाबीने बोलून प्राध्यापिकेला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. पण एकदिवस त्याचा खरा चेहरा समोर आला. चेतन राजारम ओढे राठोड असं या संशयित आरोपीचं नाव आहे. चेतनने प्राध्यापिकेला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. तिच्याकडे पाच लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली.

नाशिकच्या गंगापूर पोलिस ठाण्यात चेतन राजारम ओढे राठोड या माजी विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. चेतन प्राध्यापिकेला फोन करायचा. तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढल्यानंतर बोलता, बोलता त्याने व्हिडिओ कॉलवर अश्लील व्हिडिओ स्क्रीन रेकॉर्ड केले. नंतर त्यावरुनच त्याने ब्लॅकमेल केलं. ब्लॅकमेल करत 5 लाखांची खंडणी उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या माजी विद्यार्थ्यांवर गंगापूर पोलिस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान कायदा आणि अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.

सहलीला येण्यासाठी दबाव

प्राध्यापिकेच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेतला. सोशल मीडिया कॉलद्वारे महिलेचे अश्लील खासगी व्हिडिओ स्क्रीन रेकॉर्ड करत ब्लॅकमेल केलं. चेतन प्राध्यापिकेवर आठवड्याभरासाठी महाराष्ट्राबाहेर सहलीला येण्यासाठी दबाव टाकत होता. पण तिने नकार दिला. त्यावेळी त्याचं खरं रुप समोर आलं. त्याने त्याच्याकडची व्हिडिओ रेकॉर्डिंग,चॅट्स व्हायरल करण्याची धमकी दिली. त्याशिवाय त्याने पाच लाख रुपये मागितले. अखेर प्राध्यापिकेने गंगापूर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.

Follow Us
MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्यावरून गोपीचंद पडळकरांचा रोहित पवारांवर...
MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्यावरून गोपीचंद पडळकरांचा रोहित पवारांवर घणाघात; थेट म्हणाले...
पेपरफुटी प्रकरणात मोठी घडामोड! विवेक भिमनवारांचा राजीनामा मुख्यमंत्र्य
पेपरफुटी प्रकरणात मोठी घडामोड! विवेक भिमनवारांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे? रोहित पवारांचा खळबळजनक दावा
पुणे MPSC आंदोलनातून पोलिसांनी हटवल्या LED स्क्रीन, 80 विद्यार्थ्यांना
पुणे MPSC आंदोलनातून पोलिसांनी हटवल्या LED स्क्रीन, 80 विद्यार्थ्यांना नोटिसा
मुंबईतील बेकायदा फ्लेक्सवर महापालिकेचा दणका; आता जाहिरातींसाठी नवे...
मुंबईतील बेकायदा फ्लेक्सवर महापालिकेचा दणका; आता जाहिरातींसाठी नवे नियम काय?
इंडिया आघाडीच्या आंदोलनाचं आयोजन मात्र, मित्र पक्षाचा सहभाग नाही;
इंडिया आघाडीच्या आंदोलनाचं आयोजन मात्र, मित्र पक्षाचा सहभाग नाही; पक्षाने मांडली स्पष्ट भूमिका
प्रसिद्ध अभिनेत्रीने घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट, नेमकं कारणही...
प्रसिद्ध अभिनेत्रीने घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट, नेमकं कारणही आलं समोर
कार्यक्रमादरम्यान मोठा गोंधळ! अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी...
कार्यक्रमादरम्यान मोठा गोंधळ! अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आर्ध्यातच थांबवलं भाषण, नेमकं काय घडलं?
संसद ते निवडणूक आयोग! ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात इंडिया आघाडीचा महा
संसद ते निवडणूक आयोग! ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात इंडिया आघाडीचा महामोर्चा, जय्यत तयारी
राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण; म्हणाले, ‘ते...
राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण; म्हणाले, ‘ते विधान दिशाभूल करणारं...
कल्याणमध्ये भरधाव कारचा थरार; संतप्त नागरिकांनी केली तोडफोड
Kalyan : कल्याणच्या सहजानंद चौकात भरधाव कारचा थरार; संतप्त नागरिकांनी केली तोडफोड, नेमकं काय घडलं?