आमदार दिलीप बनकरांच्या अडचणीत वाढ, पुत्राच्या शाही विवाह सोहळ्याच्या चौकशीचे आदेश

आमदार पुत्राच्या शाही विवाह सोहळ्या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करावी, असे आदेश विभागीय आयुक्तांनी पोलिसांना दिले आहेत.

आमदार दिलीप बनकरांच्या अडचणीत वाढ, पुत्राच्या शाही विवाह सोहळ्याच्या चौकशीचे आदेश

नाशिक : नाशिकचे आमदार दिलीप बनकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे (Dilip Bankar Son Wedding). आमदार पुत्राच्या शाही विवाह सोहळ्या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करावी, असे आदेश विभागीय आयुक्तांनी पोलिसांना दिले आहेत. त्याशिवाय, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे आता पोलिसांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागून आहे (Dilip Bankar Son Wedding).

गेल्या दोन दिवसांपासून कारवाई बाबत पोलीस आयुक्त आणि जिल्ह्याधिकारी यांच्याकडून टोलवाटोलवी सुरु असल्याचं चित्र होतं. मात्र, आता थेट विभागीय आयुक्तांनी पोलिसांना कारवाईचे आदेश दिल्याने आमदार दिलीप बनकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

नेमकं प्रकरण काय?

राष्ट्रवादीचे आमदार दिलीप बनकर यांच्या मुलाच्या लग्नात सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडालेला पाहायला मिळाला. राष्ट्रवादीचे आमदार दिलीप बनकर यांच्या मुलाच्या लग्नात मोठी गर्दी झालेली पाहायला मिळाली. कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचा या लग्न सोहळ्यात बोजवारा उडाल्याचं चित्र समोर आलं. या लग्नसोहळ्याला राष्ट्रवादीचे आमदार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) , अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal), लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारीसुद्धा उपस्थित होते. या लग्न सोहळ्याला मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती (Dilip Bankar Son Wedding).

निफाडचे राष्ट्रवादी आमदार दिलीप बनकर यांच्या मुलाच्या विवाह सोहळ्यात हजारोंच्या संख्येने वऱ्हाडी मंडळी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यासह विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्तांसह अनेक शासकीय अधिकारी ही उपस्थित होते. नाशिक शहरातील बालाजी लॉन्समध्ये हा विवाह सोहळा झाला असून, सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाची पुरती पायमल्ली करण्यात आली.

या लग्न सोहळ्यात कोरोना प्रतिबंधात्मक नियमांची पायमल्ली करण्यात आली असून, सोशल डिस्टन्सिंग न पाळता लोक एकमेकांच्या अगदी जवळ उभे राहिल्याचे पाहायला मिळालं.

Dilip Bankar Son Wedding

संबंधित बातम्या :

Solapur | भाजप नेते शहाजी पवार यांच्या मुलीच्या लग्नात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

पदवीधर निवडणुकीच्या मेळाव्यात नेत्यांचा उदंड उत्साह, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

Temple Reopen | कुठे अलोट गर्दी, तर कुठे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा, नियम धाब्यावर बसवत भाविक दर्शनासाठी मंदिरात

शिर्डी साईबाबा मंदिरात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा, सरकारी नियमांची ऐसीतैशी

निवडणूक विजयाच्या वर्षपूर्तीदरम्यान सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा, मालेगावात एमआयएमच्या आमदारासह दहा जणांवर गुन्हा

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI