निवडणूक विजयाच्या वर्षपूर्तीदरम्यान सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा, मालेगावात एमआयएमच्या आमदारासह दहा जणांवर गुन्हा

मालेगावात आमदार मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांच्यासह दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे

निवडणूक विजयाच्या वर्षपूर्तीदरम्यान सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा, मालेगावात एमआयएमच्या आमदारासह दहा जणांवर गुन्हा

मालेगाव : विधानसभा निवडणूक विजयाची वर्षपूर्ती साजरी करुन सार्वजनिक (MIM MLA Mufti Mohammad Ismail) ठिकाणी जल्लोष केल्याने आमदार मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांच्यासह दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे (MIM MLA Mufti Mohammad Ismail).

मालेगावात शनिवारी सायंकाळी मुशावरत चौकात आमदार मुफ्ती यांनी कार्यकर्त्यांसह केक कापून आनंद साजरा केला होता. कोरोना संसर्गामुळे सार्वजनिक ठिकाणी गर्दी करुन एकत्रित कार्यक्रम घेण्यास मनाई आहे. मात्र, तरीही विधानसभा निवडणूक विजयाची वर्षपूर्ती जल्लोष करण्यात आला.

यादरम्यान, मास्क न लावणे, रहदारीला अडथळा निर्माण करणे आणि जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी आमदार मुफ्ती, रिजवान खान, मोह्ममद आमिन फारुख, डॉ. खालिद परवेज, अब्दुल्ला मुफ्ती इस्माईल, जाहिद मेम्बर, अतहर अश्रफी, खालिद सिकंदर, मसूद शाहिद आणि नियाज अहमद यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक रवींद्र देशमुख अधिक तपास करत आहे.

मुफ्ती मोहम्मद या एमआयएमच्या आमदार असून यांनी विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस आमदार आफिस शेख यांचा सुमारे 38 हजार मतांनी पराभव केला होता.

MIM MLA Mufti Mohammad Ismail

संबंधित बातम्या :

मुख्यमंत्र्यांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्याला राजकोटमधून अटक, नागपूर पोलिसांची कारवा

अंत्यसंस्कारावेळी गळ्यावरील व्रण उघड, सासूच्या हत्येचा थरारक उलगडा

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *