अंत्यसंस्कारावेळी गळ्यावरील व्रण उघड, सासूच्या हत्येचा थरारक उलगडा

गोंदियात शुल्लक कारणातून सुनेने सासूची गळा आवरून हत्या (Mother In Law Murder) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

अंत्यसंस्कारावेळी गळ्यावरील व्रण उघड, सासूच्या हत्येचा थरारक उलगडा

गोंदिया : गोंदियात शुल्लक कारणातून सुनेने सासूची गळा आवरून हत्या (Mother In Law Murder) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी आरोपी सुनेला अटक करण्यात आली आहे (Mother In Law Murder).

गोंदिया जिल्ह्याच्या आमगाव पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या तीगावात सुनेने आपल्या 68 वर्षीय सासूची हत्या केल्याने एकच खळबळ उडाली. डिलेश्वरी बारेवार असं या सुनेचं नाव आहे.

आमगाव तालुक्याच्या तीगावात राहणाऱ्या 23 वर्षीय डिलेश्वरीने आपल्या 68 वर्षीय सासू तिरणबाई याची 23 आक्टोबरच्या रात्री गळा आवरून हत्या केली. मात्र, ही बाब तेव्हा उघडकीस आली नाही.

तिरणाबाई यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी नदीवर घेऊन जात असताना घराच्या लोकांनी त्यांची आंघोळ घातली. तेव्हा तिरणाबाईच्या गळ्यावर काही वळ त्यांच्या मुलीला दिसले. आपल्या आईचा मृत्यू नैसर्गिक नसून त्यांची हत्या झालेच मुलीच्या लक्षात आले.

त्यानंतर तिने तत्काळ याची माहिती याची माहिती आमगाव पोलिसांना दिली. 25 ऑक्टोबरला सासूच्या मृतदेहाचे छावविच्छेदन करण्यात आले. तसेच पोलिसांनी चौकशीदरम्यान सुनेला याबाबत विचारणा केली. तेव्हा तिने सासूची गळा आवळून हत्या केल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपी सुनेविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून तिला अटक केली.

Mother In Law Murder
संबंधित बातम्या :

क्षुल्लक कारणावरुन सासूची गळा आवळून हत्या, गोंदियातील धक्कादायक घटना

पुणे-बंगळुरु महामार्गावर खासगी बसमधून 3 कोटी 64 लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *