AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नीट पेपरफुटीचा मास्टरमाईंड कशी करायचा फसवणूक? कोणं होतं टार्गेट? शुभम खैरनारची संपूर्ण कुंडली समोर

नाशिकच्या शुभम खैरनारने SR Education Consultancy च्या माध्यमातून NEET पेपरफुटीचे रॅकेट कसे चालवले, याचे सविस्तर तपशील समोर आले आहेत. राजस्थान पोलीस आणि नाशिक कनेक्शनचा पूर्ण आढावा.

नीट पेपरफुटीचा मास्टरमाईंड कशी करायचा फसवणूक? कोणं होतं टार्गेट? शुभम खैरनारची संपूर्ण कुंडली समोर
neet exam
| Updated on: May 14, 2026 | 8:46 AM
Share

देशभर गाजत असलेल्या वैद्यकीय प्रवेश परीक्षा नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणाने संपूर्ण देश ढवळून निघाला आहे. आता या प्रकरणाचे धागेदोरे नाशिकपर्यंत येऊन पोहोचले आहेत. राजस्थान पोलिसांनी केलेल्या तपासात नाशिकमधील शुभम खैरनार या तरुणाचे नाव मुख्य आरोपी म्हणून समोर येत आहे. आता शुभम खैरनार याने शिक्षणाच्या नावाखाली फसवणुकीचे जाळे कसे विणले होते, याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे.

ब्रँडिंगच्या नावाखाली जाळे

संशयित आरोपी शुभम खैरनार नाशिकमधील अत्यंत गजबजलेल्या आणि उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या कॅनडा कॉर्नर परिसरातून आपला कारभार चालवत होता. त्याने या ठिकाणी SR Education Consultancy नावाने आलिशान कार्यालय थाटले होते. गेल्या २ ते ३ वर्षांपासून या कार्यालयातून वैद्यकीय आणि अभियांत्रिकी प्रवेशासाठी मार्गदर्शन देण्याचे काम करत होता. SR Education Consultancy चे ऑफिस अत्यंत मोक्याच्या ठिकाणी असल्याने त्याला पालकांचा विश्वास संपादन करणे त्याला सोपे गेले.

त्याने फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सॲप ग्रुप्सच्या माध्यमातून १०० टक्के ॲडमिशनची हमी देणारी मोहीम राबवली होती. विशेष म्हणजे, ग्रामीण भागातील श्रीमंत शेतकरी आणि व्यापाऱ्यांची मुले त्याच्या मुख्य निशाण्यावर होती. शुभम खैरनार हा गेल्या दोन ते तीन वर्षांपासून या क्षेत्रात होता. त्याने केवळ नाशिकच नव्हे, तर उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांशीही संपर्क साधला होता.

होतकरू विद्यार्थ्यांना सवलत देण्याचे आमिष दाखवून तो मध्यमवर्गीय पालकांना आकर्षित करत असे. प्रत्यक्षात ही सवलत नसून मोठ्या रक्कमेची सौदेबाजी असायची, असा संशय आहे. तसेच प्रवेशाच्या नावाखाली तो विद्यार्थ्यांची मूळ कागदपत्रे स्वतःकडे जमा करून घेत असे, जेणेकरून नंतर पालकांना त्याच्या तावडीतून सुटता येणार नाही. NEET, JEE आणि CET परीक्षांची सविस्तर माहिती मिळेल, अशी जाहिरात त्याने केली होती.

राजस्थान पोलिसांचा नाशिकमध्ये तळ?

राजस्थान पोलिसांनी शुभम खैरनारला ताब्यात घेतल्यानंतर आता त्याचे बँक खात्यांचे व्यवहार आणि कॉल डिटेल्स (CDR) तपासले जात आहेत. या प्रकरणात नाशिकमधील काही नामांकित क्लास चालकांचे किंवा इतर कन्सल्टंट्सचेही हितसंबंध गुंतले आहेत का? याचा शोध घेतला जात आहे. लवकरच राजस्थान पोलिसांचे एक पथक तपासासाठी पुन्हा नाशिकमध्ये येण्याची शक्यता आहे.

पालकांमध्ये चिंतेचे वातावरण

या कारवाईनंतर ज्या पालकांनी शुभमच्या कन्सल्टन्सीमार्फत आपल्या मुलांचे प्रवेश निश्चित केले होते किंवा चर्चा केली होती, त्यांच्यात भीतीचे वातावरण आहे. नाशिक पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनेही (EOW) या प्रकरणाची समांतर चौकशी करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे. या प्रकरणाच्या सखोल चौकशीत आणखी काही धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून, नाशिक पोलिसांकडून तपासाची व्याप्ती वाढवली जाण्याची शक्यता आहे.

Follow Us
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू