AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nashik Police Station | 7 पोलीस ठाण्यांना नव्या इमारती; कोठे अन् कधीपर्यंत होणार काम?

नाशिक जिल्ह्यातील पोलीस विविध पोलीस स्टेशनच्या अतिशय जुन्या इमारतीच्या जागी नवीन इमारती तयार करण्याबाबत प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सबंधित यंत्रणेला दिल्या होत्या.

Nashik Police Station | 7 पोलीस ठाण्यांना नव्या इमारती; कोठे अन् कधीपर्यंत होणार काम?
नाशिक शहर उपनगर पोलीस ठाण्याला नवीन इमारत मिळणार आहे.
| Updated on: Feb 09, 2022 | 10:43 AM
Share

नाशिकः अखेर नाशिकमध्ये (Nashik) जीर्ण आणि गलितगात्र झालेल्या 7 पोलीस ठाण्यांच्या (Police Station) इमारती नव्या होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या विशेष प्रयत्नांतून नाशिक जिल्ह्यातील या पोलीस ठाण्यांच्या नूतन इमारतींच्या बांधकामास मंजुरी मिळाली आहे. याबाबत गृह विभागाचा निर्णय नुकताच पारित करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सात पोलीस स्टेशनला सुसज्य इमारती मिळणार असून, पोलीस यंत्रणेला सुरळीतपणे कामकाज करण्यास अधिक मदत होणार आहे. शिवाय सध्या भेडसावत असलेल्या कार्यालयाच्या समस्या यामुळे मार्गी लागणार आहेत. त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांनीही या निर्णयाचे स्वागत केले आहे.

प्राधान्यक्रम ठरवून निर्णय

नाशिक जिल्ह्यातील पोलीस विविध पोलीस स्टेशनच्या अतिशय जुन्या इमारतीच्या जागी नवीन इमारती तयार करण्याबाबत प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सबंधित यंत्रणेला दिल्या होत्या. त्यानुसार शासन स्तरावर प्राधान्यक्रम ठरवून पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील सात पोलीस स्टेशनच्या इमारतींच्या बांधकामास मंजुरी देण्यात आलेली आहे. यामध्ये जिल्ह्यातील सटाणा पोलीस स्टेशन, नाशिक शहर उपनगर पोलीस स्टेशन, सुरगाणा पोलीस स्टेशन, बाऱ्हे पोलीस स्टेशन सुरगाणा, रमजानपुरा पोलीस स्टेशन मालेगाव, लासलगाव पोलीस स्टेशन व येवला शहर पोलीस स्टेशन या एकूण सात पोलीस स्टेशनचा समावेश आहे.

कधीपर्यंत मिळणार निधी?

जिल्ह्यातील अतिशय जुन्या झालेल्या इमारतीमध्ये पोलीस यंत्रणेला कामकाज करण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यादृष्टीने आता जिल्ह्यातील सात पोलीस स्टेशनला पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून नवीन सुसज्य इमारती उपलब्ध होणार आहे. या इमारतींच्या बांधकामास शासन स्तरावरून निधीची तरतूद होणार असून, लवकरच या इमारतींच्या कामांना सुरुवात होणार आहे. त्यामुळे पोलीस ठाण्यांसाठी सुसज्य इमारती निर्माण होऊन यंत्रणेला काम करणे अधिक सोयीचे होणार आहे. दरम्यान, या निर्णयाचे पोलीस कर्मचाऱ्यांनी स्वागत केले आहे. इतर जीर्ण इमारतीच्या ठिकाणीही लवकर नवे ठाणे उभारावे, असे आवाहनही केले आहे.

येथे नव्या इमारती

– सटाणा

– नाशिक शहर उपनगर

– सुरगाणा

– बाऱ्हे

– रमजानपुरा

– लासलगाव

– येवला

इतर बातम्याः

भोगी विषयांचा सोहळा; घोरपडीचे गुप्तांग, साळिंदराच्या काट्याची पूजा भांडारात विक्री, राज्यव्यापी कनेक्शन

Nashik | महापालिकेच्या कोषागार विभागात घोटाळा, नियमित भरण्यावरच डल्ला, नेमके प्रकरण काय?

Lata Mangeshkar | चैतन्याची परी, सांध्यपर्वातील वैष्णवी, हृदयामधल्या निशिगंधाचे फूल; लतादीदींच्या आठवणींचा मोहक कोलाज!

कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.