AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nashik IT Company Scandal : मोठी बातमी ! फरार निदा खानचा पती पोलिसांच्या ताब्यात, मुंब्र्यात काय घडलं ?

नाशिक TCS मधील कर्मचाऱ्यांच्या लैंगिक शोषण आणि जबर धर्मांतरणाच्या प्रकरणाने वेग घेतला आहे. मुख्य आरोपी HR निदा खान अजूनही फरार असून, पोलिसांनी तिच्या पतीला अटक केली आहे. या प्रकरणात 8 जणांना अटक झाली असून, ATS ने चौकशीत प्रवेश करत अधिक गंभीर बाजू उघड केली आहे. व्हॉट्सअॅप ग्रुपमधून धर्मांतरणाचा कट उघड झाला असून, डिजिटल पुराव्यांवर तपास सुरू आहे.

Nashik IT Company Scandal : मोठी बातमी  ! फरार निदा खानचा पती पोलिसांच्या ताब्यात, मुंब्र्यात काय घडलं ?
निदा खान अद्याप फरार
| Updated on: Apr 18, 2026 | 9:34 AM
Share

नाशिकच्या आयटी हबमध्ये सध्या टीसीएस कंपनीतलं प्रकरण जोरात गाजत असून सगळीकडे याच केसची चर्चा आहे. कंपनीतील कर्मचाऱ्यांचं लैंगिक शोषण करून त्यांच्यावर धर्मांतरासाठी दबाव आणल्याचा आरोप असून याप्रकरणात आत्तापर्यंत 8 जणांना अटक करण्यात आली आहे. मात्र या केसमधील प्रमुख सूत्रधार, एचआर निदा खान ही अद्याप फरार असून पोलिसांना सातत्याने गुंगारा देत आहे. तिने अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केल्याची माहितीदेखील समोर आली आहे. दरम्यान याच प्रकरणात आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. फरार निदा खान हिचा पती मोईन खान याला पोलिसांनी मुंब्रा येथून ताब्यात घेतलं आहे. निदा मात्र सातत्याने लोकेशन बदलत असून पोलिसांना गुंगारा देत आहे. याप्रकरणी ATS कडून देखील आणखी दोन जण ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान निदा खान हिच्या शोधासाठी SIT ची 3 पथकं मागावर आहेत. ती मुंब्रा येथे लपली असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तेथे रेकी करत छापा टाकला होता, मात्र ती आधीच तेथून फरार झाली होती. मात्र पोलिसांनी तिचा पती, मोईन खान याला ताब्यात घेतलं. मुंब्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ताब्यात घेऊन पोलिसांनी त्याची चौकशी केली. निदाबद्दलही विचारणा करण्यात आली होती, तेव्हा निदा खान नातेवाईकांकडे गेल्याची माहिती तिच्या पतीने दिली. मात्र त्आ नातेवाईकांचे घर आणि फोन बंद असल्याने, अद्यापही निदाचा शोध लागलेला नाही. दुसरीकडे निदाने अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला आहे. वकिलांच्या माध्यमातून अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी ती प्रयत्न करत असतानाच पोलीस तिच्या मागावर आहेत.तिच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज नाशिक कोर्टात सुनावणीची शक्यता आहे.

नाशिक टीसीएस प्रकरणात एटीएसची पहिली एन्ट्री

टीसीएस कंपीनीतील लैंगिक शोषण आणि धर्मांतरण प्रकरणात एटीएसची पहिली एन्ट्री झाली आहे. नाशिकमध्ये दोघांची तीन तास कसून चौकशी करण्यात आली. रजा मेनन, शफी शेख यांना ताब्यात घेतलं होतं. निदा खान कनेक्शनवर संशय अधिक गडद झाला असून, दिल्ली ब्लास्ट आरोपीशी लिंक आहे का याचाही तपास सुरू आहे. त्यांना आंतरराष्ट्रीय कॉल, फंडिंगबाबत प्रश्न विचारण्यात आले होते. दरम्यान या दोघांना आज न्यायालयात हजर केलं जाणार असून एटीएस चौकशीमुळे प्रकरणाला नवे गंभीर वळण मिळालं आहे.

व्हॉट्सॲप ग्रुपमधून धर्मांतर कट उघड

नाशिकमध्ये टीसीएस प्रकरणात SIT तपास वेगात सुरू असून व्हॉट्सअॅप ग्रुपमधून धर्मांतर कट उघड झाल्याची माहिती समोर आली आहे. आत्तापर्यंत ज्या आरोपींना अटक करण्यात आली आहे, त्या आरोपींचे मोबाईल, लॅपटॉप जप्त करून क्लोनिंग करण्यात आलं. त्यांच्या चॅटिंगमधून संशयास्पद संवाद समोर आले आहेत. या प्रकरणातील पीडितांना फसवण्यासाठी ग्रुपचा वापर केल्याचा संशय असून डिजिटल पुरावेच आता संपूर्ण प्रकरणाचे सत्य उघडेल, असा अंदाज आहे.

Follow Us
मराठा विद्यार्थ्यांनो खुशखबर! भरलेली शैक्षणिक फी परत मिळणार; सरकारची..
मोठी बातमी! मराठा विद्यार्थ्यांनो खुशखबर! भरलेली शैक्षणिक फी परत मिळणार; सरकारची मोठी घोषणा
भावनिकदृष्ट्या चुकीचा, पण... ठाकरे गट सोडण्यावर ओमराजेंचा मोठा खुलासा
Omraje Nimbalkar | भावनिकदृष्ट्या चुकीचा, पण राजकीयदृष्ट्या योग्य! ठाकरे गट सोडण्यावर ओमराजेंचा मोठा खुलासा
तुम्ही खात असलेली मिठाई अशी बनते? मैदा पायाने तुडवल्याचा धक्कादायक....
तुम्ही खात असलेली मिठाई अशी बनते? मैदा पायाने तुडवल्याचा धक्कादायक VIDEO व्हायरल!
रोहित पवार म्हणजे छोटा संजय राऊत; म्हणत प्रसाद लाडांनी उडवली खिल्ली
Prasad Lad | रोहित पवार म्हणजे छोटा संजय राऊत; म्हणत प्रसाद लाडांनी उडवली खिल्ली
आमचे खासदार फुटले नाहीत; स्वतःला बाजारात विकायला उभे राहिले
आमचे खासदार फुटले नाहीत; स्वतःला बाजारात विकायला उभे राहिले –राऊतांचा संतापजनक दावा
50 कोटी घेऊन केलेलं बंड म्हणजे क्रांती नाही!; राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
Sanjay Raut On Shiv Sena Crisis | 50 कोटी घेऊन केलेलं बंड म्हणजे क्रांती नाही!; शिवसेना वर्धापन दिनी संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
मुंबई थांबली! BEST कर्मचाऱ्यांच्या संपामुळे लाखो प्रवासी अडचणीत
Best Bus Employee Strike | मुंबई थांबली! BEST कर्मचाऱ्यांच्या संपामुळे लाखो प्रवासी अडचणीत, बस सेवा पूर्ण ठप्प
ना ठाकरे... ना शिंदे! बाळासाहेबांचा फोटो टाकून त्या खासदारांनी वाढवला
ना ठाकरे... ना शिंदे! बाळासाहेबांचा फोटो टाकून त्या खासदारांनी वाढवला मोठा सस्पेन्स
वारसा विचारांचा, हीरक महोत्सव शिवसेनेचा; ठाकरे-शिंदे काय बोलणार?
वारसा विचारांचा, हीरक महोत्सव शिवसेनेचा; वर्धापन दिनी ठाकरे-शिंदे काय बोलणार?
आता आणखी काय घडणार? पुन्हा शिंदे गटातील नेत्याने दिली हिंट... यह तो
आता आणखी काय घडणार? पुन्हा शिंदे गटातील नेत्याने दिली हिंट... यह तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है