शिवजयंतीला पोलिसांवर दगडफेक करणाऱ्या आरोपींची नाशकात धिंड

अटकेतील आरोपींची नाशिकमधील देवळाली परिसरात धिंड काढण्यात आली (Nashik Shivjayanti Police attack)

शिवजयंतीला पोलिसांवर दगडफेक करणाऱ्या आरोपींची नाशकात धिंड
Crime-News
Follow us
| Updated on: Feb 23, 2021 | 10:59 AM

नाशिक : पोलिसांवर दगडफेक करणाऱ्या आरोपींची धिंड काढण्यात आली. नाशिकमधील देवळाली परिसरात धिंड काढण्यात आली. देवळाली परिसरात शिवजयंतीच्या रात्री दगडफेक करण्यात आली होती. या घटनेत दोन पोलिस कर्मचारी जखमी झाले होते. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. अटकेतील आरोपींची नाशिकमधील देवळाली परिसरात धिंड काढण्यात आली. (Nashik Shivjayanti Police attack)

शिवजयंतीला दगडफेक

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने देवळाली पोलिस हद्दीत कर्तव्यावर असताना संसरी येथील चारणवाडी येथील एका इसमाबरोबर भांडण होऊन ते पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आले, यावेळी चारणवाडी येथील सोनू जाधव हातात दगड घेऊन आला आणि अमोल जाधवला म्हणाला की पोलीस नाईक आहेर यांच्या डोक्यात दगड घाल, अशी फिर्याद पोलीस नाईक पंढरीनाथ आहेर यांनी दिली.

आरोपींनी जीवे ठार मारण्याची धमकीही दिली. दगड डोक्यास लागल्याने आहेर यांच्यासह पोलीस शिपाई मनोहर साळुंखे यांच्या डोक्याला गंभीर जखम झाली. त्यांना उपचारासाठी देवळाली कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.

कोणावर कारवाई?

या प्रकरणी चारणवाडी येथून संशयित आरोपी शंकर सुरेश देवकर, श्रावण माने,  रोहित कुसमाडे, दीपक नलावडे, गुंडाप्पा देवकर यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले, तर उर्वरित नऊ आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. सर्व आरोपींविरुद्ध पोलीस उपनिरीक्षक संदेश पाडवी यांनी कलम 307, 353 332, 333 ,141, 143,147 148,149, 120 ब आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम 135 प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

कडेकोट पोलीस बंदोबस्त

यापूर्वीही समाजकंटकांना पांगवण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला होता. या घटनेची गंभीर दखल घेत पोलीस उपायुक्त विजय खरात विजय खरात आणि सहाय्यक पोलीस आयुक्त समीर शेख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष चंद्र देशमुख आणि सहायक पोलिस निरीक्षक राहुल मोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश गीते यांनी शहरात बंदोबस्त ठेवला होता.

(Nashik Shivjayanti Police attack)

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.