AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nashik Tourism | नाशिकसाठी पर्यटन विकास प्राधिकरण; 3 टप्प्यांत काम, आदित्य ठाकरेंनी काय दिल्या सूचना?

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले की, पुढील आठवड्यात साहसी, धार्मिक व आरोग्य या तीन टप्प्यातील पर्यटनाचा विकासाबाबत बैठकीचे आयोजन करण्यात येईल. तसेच पर्यटन विषयक प्रलंबित प्रकल्प लवकरत लवकर मार्गी लावली जातील.

Nashik Tourism | नाशिकसाठी पर्यटन विकास प्राधिकरण; 3 टप्प्यांत काम, आदित्य ठाकरेंनी काय दिल्या सूचना?
आदित्य ठाकरे यांनी आढावा बैठक घेतली.
| Updated on: Jan 29, 2022 | 11:55 AM
Share

नाशिकः नाशिक (Nashik) जिल्ह्यात अनेक प्रकारचे पर्यटन क्षेत्र आहेत. देशातील व राज्यातील लोकांना धार्मिक पर्यटन सोबत इतर पर्यटनाची माहिती होण्यासाठी नाशिकला पर्यटन जिल्हा (Tourism district) बनवण्यासाठी सर्वंकष प्रयत्न करू. तसेच साहसी, धार्मिक व आरोग्य पर्यटनाच्या विकासाबाबत लवकरच बैठकीचे आयोजन करण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केले आहे. बोट क्लब येथे आयोजित नाशिक जिह्याची पर्यटन विषयक आढावा बैठक झाली. यावेळी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) बोलत होते. बैठकीला नगरविकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, कृषिमंत्री दादाजी भुसे, खासदार हेमंत गोडसे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, पर्यटन संचालनालय मुंबईचे संचालक मिलिंद बोरीकर, पर्यटन संचालनालय नाशिकच्या उपसंचालक मधुमती सरदेसाई, उपजिल्हाधिकारी नितीन मुंडावरे, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक जगदीश चव्हाण, महानगरपालिका उपायुक्त मनोज घोडे-पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी किरण जोशी इतर अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकाऱ्यांचे सादरीकरण

जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी यावेळी सादरीकरणाद्वारे नाशिक जिल्ह्यातील विविध पर्यटन विषयक माहिती दिली. यामध्ये कृषी पर्यटन, साहसी पर्यटन, इको टुरीझम, वायनरी पर्यटन, वैद्यकीय पर्यटन, धार्मिक पर्यटन, ऐतिहासिक इत्यादी विषयी माहिती दिली. तसेच जिल्ह्यातील शाश्वत व पुरक विकासासाठीची शक्तीस्थळे, जिल्ह्यातील पर्यटनासाठीचे संभाव्यक्षेत्रांची माहिती यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना दिली. त्यावर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले की, पुढील आठवड्यात साहसी, धार्मिक व आरोग्य या तीन टप्प्यातील पर्यटनाचा विकासाबाबत बैठकीचे आयोजन करण्यात येईल. तसेच पर्यटन विषयक प्रलंबित प्रकल्प लवकरत लवकर मार्गी लावली जातील, असेही ठाकरे यांनी यावेळी सांगितले आहे.

पर्यटन विकास प्राधिकरण

पर्यटन विकासाची विविध पर्यटन स्थळांवर काम करताना त्या पर्यटन स्थळाची मालकी ही जलसंपदा, वनविभाग, पुरातत्व विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था, धार्मिक ट्रस्ट यांची असते. त्यामुळे आंतर विभाग समन्वयासाठी जिल्हा पातळीवर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली ‘पर्यटन विकास प्राधिकरण’ निर्माण करण्याच्या दृष्टीने विचार करण्यात येईल. त्यांची नियुक्ती करण्यात येत असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. पुढील पन्नास वर्षाचा विचार करून नाशिक जिल्ह्याचा पर्यटनांचा शाश्वत विकासावर भर देण्यात येईल. तसेच इको टुरिझम, धार्मिक पर्यटन व पर्यटन स्थळी मुलभूत सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे ठाकरे यांनी सांगितले.

इतर बातम्याः

Nivruttinath | 800 वर्षांपूर्वी संजीवन समाधी, यशापासून निवृत्ती, ज्ञानेश्वर माऊलींचे गुरू; संत निवृत्तीनाथांची यात्रोत्सवानिमित्त अनोखी ओळख!

Wine Capital Nashik | नाशिक वाईन कॅपिटल कसे झाले; ऐतिहासिक ‘पिंपेन’ची कशी झाली सुरुवात?

Nashik | नाशिक क्लायमेट ॲक्शन प्लॅन सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या, काय होणार लाभ?

तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.