नाशिक : नाशिकमध्ये महापालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात (Nashik Zakir Hussain Hospital) ऑक्सिजनची गळती (Oxygen Tank Leak) झाली आहे. ऑक्सिजनचा पुरवठा न झाल्याने 22 रुग्णांना त्यांचा जीव गमवावा लागला आहे. यात 11 महिला आणि 11 पुरुषांचा समावेश आहे. या दुर्घटनेतील मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या घटनेतील मृताच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख रुपये देण्यात येणार आहे. (Nashik Zakir Hussain Hospital Oxygen Tank Leak tragedy)