नगरसेवकानंतर आता नाशिक झेडपीचे गट 12 ने वाढणार; सदस्यसंख्या 85 होणार

नाशिक महापालिकेतील नगरसेवकसंख्या 122 वरून 133 वर नेल्यानंतर आता नाशिक जिल्हा परिषदेचे गट 12 ने वाढून सदस्यसंख्या 85 होणार असल्याचे समजते.

नगरसेवकानंतर आता नाशिक झेडपीचे गट 12 ने वाढणार; सदस्यसंख्या 85 होणार
Zilla Parishad, Nashik.

नाशिकः नाशिक महापालिकेतील नगरसेवकसंख्या 122 वरून 133 वर नेल्यानंतर आता नाशिक जिल्हा परिषदेचे गट 12 ने वाढून सदस्यसंख्या 85 होणार असल्याचे समजते. सध्या जिल्हा परिषदेत 73 सदस्य आहेत. आता नवीन गटामध्ये निफाड तालुक्यात 2 आणि नाशिक, दिंडोरी, नांदगाव, चांदवड, येवला, सिन्नर, इगतपुरी, मालेगाव या तालुक्यात प्रत्येक ठिकाणी 1 गट वाढण्याची शक्यता आहे. जिल्हा प्रशासनाने याबाबत चाचपणी सुरू केली आहे. त्यात सुरगाणा व कळवण या तालुक्यांमध्ये दोन गट वाढणार असल्याचे समजते.

मंत्रिमंडळाचा निर्णय

जिल्हा परिषदांची सदस्यसंख्या वाढवण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेत त्याला मान्यता दिली आहे. राज्य मंत्रिमंडळाची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आता प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये किमान सदस्यसंख्या ही 55 असणार आहे. यापूर्वी ही संख्या 50 अशी होती. याबाबत येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात विधेयक मांडण्यात येणार आहे. त्यात महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 मधील कलम 9 (1) मध्ये सुधारणा केली जाणार आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेची सदस्यसंख्या कमीत कमी 55 आणि जास्तीत जास्त 85 ठेवण्यात येणार आहे.

असे वाढतील गट

आता नाशिक जिल्हा परिषदेचे गट 12 ने वाढणार आहेत. तर सदस्यसंख्या 85 होणार असल्याचे समजते. सध्या जिल्हा परिषदेत 73 सदस्य आहेत. सध्या मालेगाव तालक्यात 7 गट आहेत. सिन्नर, येवला, दिंडोरीत 6 गट आहेत. इगतपुरीत 5 गट आहेत. चांदवड, नांदगाव, नाशिक तालुक्यात 4 गट आहेत. या ठिकाणी प्रत्येकी एक गट वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. निफाड तालुक्यात 10 गट असून येथे लोकसंख्येनुसार 2 गट वाढणार असल्याचे समजते. राज्य निवडणूक आयोग जिल्ह्यातील निर्वाचन गटांतून थेट निवडणुकीद्वारे निवडून द्यायच्या सदस्यांची संख्या निश्चित करणार आहे.

नगरसेवक संख्याही वाढलीय

नाशिक महापालिकेतील नगरसेवकांची संख्याही 122 वरून थेट 133 वर नेण्यात आली आहे. तसा निर्णय यापूर्वीच झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. नाशिकमध्ये 2012 साली झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 2011 च्या जनगणनेचा आधार घेण्यात आला. त्यानंतर यावर्षी होणारी जनगणना कोरोनामुळे झाली नाही. त्यामुळे जुन्या जनगणनेनुसार प्रभाग रचना करण्याचे काम सुरू आहे. या काळात शहराच्या लोकसंख्येत साधारणतः साडेतीन चार लाखांची वाढ झाली. सध्या अंदाजे 30 लाखांच्या घरात लोकसंख्या असल्याचे समजते. त्यामुळे शहरात 151 नगरसेवक असावेत, असा प्रस्ताव पाठवण्यात आला होता. मात्र, त्याऐवजी नगरेसवकांची संख्या 122 वरून 133 अशी करण्यात आली आहे.

इतर बातम्याः

नाशिक जिल्ह्यात 464 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू; एका रुग्णाचा मृत्यू

रेशीम किलोमागे 5500 रुपयांवर, पण पैठणी अजूनही स्वस्तच; कारागीर आले अडचणीत

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI