रेशीम किलोमागे 5500 रुपयांवर, पण पैठणी अजूनही स्वस्तच; कारागीर आले अडचणीत

उमेश पारीक

| Edited By: |

Updated on: Nov 30, 2021 | 2:39 PM

सध्या रेशीमच्या किमती किलोमागे दोन हजारांनी महागल्या आहेत. मात्र, पैठणी साड्याच्या किमती जैसे थे आहेत. त्यामुळे कारागीर प्रचंड अडचणीत आहेत.

रेशीम किलोमागे 5500 रुपयांवर, पण पैठणी अजूनही स्वस्तच; कारागीर आले अडचणीत
येवल्याची पैठणी.

लासलगावः साऱ्यांच्या लाडाची, विशेषतः महिला वर्गांना प्रचंड आवडणारी आणि लग्न सोहळ्यात तोरा मिरवणाऱ्या पैठणी या महावस्त्राला लागणारा कच्चा माल अर्थातच रेशीम. सध्या रेशीमच्या किमती किलोमागे दोन हजारांनी महागल्या आहेत. मात्र, पैठणी साड्याच्या किमती जैसे थे आहेत. त्यामुळे कारागीर प्रचंड अडचणीत आहेत.

रेशीम उत्पादन कमी

येवल्याच्या जगप्रसिद्ध पैठणी करता लागणारा कच्चामाल म्हणजे रेशीम. पैठणीसाठी लागणारे रेशीम हे बेंगळुरू येथून येत असते. मात्र, मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने तेथील रेशीम उत्पादनावर परिणाम झाला आहे. परिणामी रेशीमचे उत्पादन यंदा कमी झाले आहे. त्यामुळे बाजारपेठेत रेशीमच्या किमती महागल्या आहेत, अशी माहिती पैठणीच्या कच्च्या मालाचे विक्रेते अमर खानापुरे यांनी दिली. त्याचा फटका विणकर कारागिरांना बसला आहे. त्यांना जास्त किमतीत रेशीम खरेदी करावे लागते आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात त्याचा परिणाम पैठणी साड्यांच्या किमतीवर नक्कीच होणार आहे.

किलोमागे 5500 रुपये

पैठणी विणकर राहुल माळोकर आणि मनोज दिवटे म्हणाले की, आम्हाला पैठणी तयार करण्याकरिता रेशीम हा कच्चामाल लागत असतो. यापूर्वी आम्ही रेशीम 3500 रुपये किलो भावाने खरेदी करत होतो. मात्र, आता हे रेशीम महाग झाले असून, ते आम्हाला 5500 रुपये किलो भावाने खरेदी करावे लागत आहे. त्यामुळे आमच्या उत्पन्नावर त्याचा परिणाम होत आहे. कच्चामाल रेशीम महाग झाले आहे. मात्र, पैठणीच्या भावामध्ये वाढ न झाल्याने त्याचा फटका विणकरांना बसत आहे. शासनाने याची दखल घेत आम्हाला मदत द्यावी, अशी मागणी पैठणी कारागीर करीत आहेत.

अवकाळी फटका

यंदा देशभर पावसाने थैमान घातले. अजून काही भागात पाऊस सुरूच आहे. त्यात उत्तर महाराष्ट्र, कोकण, मुंबई, मराठवाडा, नाशिच, धुळे, नंदुरबार जिल्ह्यात सध्याही पाऊस हजेरी लावण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे खरिपाचे मोठे नुकसान झाले. नाशिक जिल्ह्यातच कांद्याचे पीक मातीमोल झाले. आता त्याचा फटका रेशीम उत्पादनालाही बसला आहे. त्यामुळेच येत्या काळात महावस्त्र पैठणीच्या किमती मात्र नक्की वाढू शकतात. यात शंकाच नाही.

इतर बातम्याः

साहित्य संमेलनातच लसीकरणाचा मांडव, लस न घेतलेल्यांना जागेवरच डोस; शाळांचा निर्णय 10 डिसेंबरनंतर

आनंदवार्ताः नाशिक – कल्याण रेल्वेने सुस्साट, डिसेंबरमध्ये लोकलची चाचणी, नववर्षाचे गिफ्ट मिळणार?

हे वागणं बरं नव्हं : उत्तर महाराष्ट्रासह मराठवाडा, मुंबई, कोकणात पावसाचा अंदाज; विचित्र वातावरणामुळे गारठा वाढणार

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI