अन् अमरीश पटेलांनी जादूची कांडी फिरवलीच…!

धुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पोट निवडणुकीत अमरीश पटेल यांनी आपले वर्चस्व कायम राखले आहे. आज लागलेल्या निकालामध्ये शिरपूरमधले 6 पैकी 6 गण भाजपच्या ताब्यात मिळवण्यात ते यशस्वी ठरले आहेत.

अन् अमरीश पटेलांनी जादूची कांडी फिरवलीच...!
अमरीश पटेल
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: मनोज कुलकर्णी

Oct 06, 2021 | 11:35 AM

धुळेः धुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पोट निवडणुकीत अमरीश पटेल यांनी पुन्हा एकदा आपली जादूची कांडी फिरवत वर्चस्व कायम राखले आहे. आज लागलेल्या निकालामध्ये शिरपूरमधले 6 पैकी 6 गण भाजपच्या ताब्यात मिळवण्यात ते यशस्वी ठरले आहेत.

राज्यातल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पोट निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत आहेत. धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम आणि नागपूर जिल्हा परिषद आणि त्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांना पोटनिवडणुका, तसंच पालघर जिल्हा परिषद पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर होतोय. सकाळी साडे 9 वाजल्यापासून निकाल जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे. मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या निवडणुकीच्या निकालाकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. या निवडणुकीत राजकीय पक्षांचं भवितव्य ठरणार असून, अनेक राजकीय पक्षांनी या निवडणुकांसाठी जोरदार कंबर कसली आहे. ओबीसी आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर या पोटनिवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. त्या पार्श्वभूमीवर धुळ्यातल्या शिरपूरमध्ये तरी अमरीश पटेल यांनी आपले वर्चस्व कायम राखले आहे. त्यांनी सहा पैकी सहा गण भाजपकडे खेचून आणले आहेत.

भाजप प्रदेशाध्यक्षांच्या कन्या विजयी

धुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत गुजरात भाजप प्रदेशाध्यक्षांची कन्या जिल्हा परिषद निवडणुकीत धरती देवरे या लामकने गटातून विजयी झाल्या आहेत. धरती देवरे लामकने गटातून भाजप कडून निवडणूक लढवत होत्या. धरती देवरे या गुजरात भाजप प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांच्या कन्या आहेत. गेल्या वेळेस धरती देवरे बिनविरोध विजयी झाल्या होत्या.

अभिजित पाटील यांचा केला होता पराभव

धुळे नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पोटनिवडणुकीत भाजपच्या अमरिश पटेल यांनी यापूर्वीही आपला दबदबा सिद्ध केला आहे. अमरिश पटेल यांनी दणदणीत विजय मिळवत, महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजीत पाटील यांचा पराभव केला होता. अमरिश पटेल यांना 332 तर विरोधी उमेदवार अभिजीत पाटील यांना 98 मतं मिळाली होती. त्यामुळे अमरिश पटेल यांनी 234 मतांनी बाजी मारली होती. यापूर्वी त्यांनी 2009, 2015 आणि आता 2020 मध्ये विजय मिळवला आहे.

अमरिश पटेल यांची कारकीर्द

अमरिश पटेल हे उत्तर महाराष्ट्रातील काँग्रेसचे महत्वपूर्ण नेते होते. त्यांनी मंत्रिपदही भूषवले होते. धुळे नंदुरबार जिल्ह्यातील काँग्रेसच्या निर्णय प्रक्रियेत त्यांना महत्त्वपूर्ण स्थान होते. 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी त्यांनी काँग्रेसचा राजीनामा देत भाजपात प्रवेश केला.

1985 -शिरपूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष
1990 -शिरपूर विधानसभा मतदारसंघातून आमदार
1995 – शिरपूर विधानसभा मतदारसंघातून आमदार
2000 – शिरपूर विधानसभा मतदारसंघातून आमदार
2005 – शिरपूर विधानसभा मतदारसंघातून आमदार
2009 -धुळे नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधानपरिषदेवर
2015 – धुळे नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधानपरिषदेवर सदस्य
2019 मध्ये काँग्रेस सोडली, आता 2020 मध्ये भाजपच्या तिकीटावरही विजयी

इतर बातम्याः

परदेशातल्या शिक्षणासाठी आदिवासी विकास विभागाची शिष्यवृत्ती; काय आहे पात्रता, कसा करावा अर्ज?

काळजाचा थरकाप उडवणारा अपघात, भाजीने भरलेली पिकअप 35 फूट खोल दरीत कोसळली; नाशिक-मुंबई महामार्गावरली घटना


Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें