Video : विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांचा आदिवासी गाण्यावर ठेका, पाच पांडवांचे मुखवटे घालून नृत्य…

दिंडोरी : राजकारणी मंडळी म्हटलं की त्यांच्या मागे असणाऱ्या कामाचा व्याप पाहता त्यांना इतर गोष्टींचा आनंद घ्यायला वेळ मिळतो की नाही, असा अनेकांना प्रश्न पडतो. पण काही राजकारणी मंडळी आपल्या रोजच्या कामातून थोडा वेळ काढून आनंद लुटतात. असाच एक व्हीडिओ सध्या पाहायला मिळत आहे. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी दिंडोरीत डान्स केला. त्यांच्या या डान्सची […]

Video : विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांचा आदिवासी गाण्यावर ठेका, पाच पांडवांचे मुखवटे घालून नृत्य...
नरहरी झिरवळ
| Edited By: | Updated on: May 08, 2022 | 5:15 PM

दिंडोरी : राजकारणी मंडळी म्हटलं की त्यांच्या मागे असणाऱ्या कामाचा व्याप पाहता त्यांना इतर गोष्टींचा आनंद घ्यायला वेळ मिळतो की नाही, असा अनेकांना प्रश्न पडतो. पण काही राजकारणी मंडळी आपल्या रोजच्या कामातून थोडा वेळ काढून आनंद लुटतात. असाच एक व्हीडिओ सध्या पाहायला मिळत आहे. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी दिंडोरीत डान्स केला. त्यांच्या या डान्सची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. नरहरी झिरवळ (Narhari Zirwal) यांनी पाच पांडवांचे मुखवटे घालून नृत्य केलं. दिंडोरीच्या बोपेगाव येथे सुरू असलेल्या बोहडा उत्सवात विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ सहभागी झाले. तिथे त्यांनी डोक्यावर पांडवाचे मुखवटे घालून आदिवासी नृत्य (Adiwasi Dance) केलं.

नरहरी झिरवळ यांचा आदिवासी डान्स

विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी दिंडोरीत डान्स केला. त्यांच्या या डान्सची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. नरहरी झिरवाळ यांनी पाच पांडवांचे मुखवटे घालून नृत्य केलं. दिंडोरीच्या बोपेगाव येथे सुरू असलेल्या बोहडा उत्सवात विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ सहभागी झाले. तिथे त्यांनी डोक्यावर पांडवाचे मुखवटे घालून आदिवासी नृत्य केलं.

दिंडोरी तालुक्यातील बोपेगाव बोहडा उत्सव सुरू असून त्यात विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ केवळ सहभागीच झाले नाही तर त्यांनी संबळवर ठेका धरत आदिवासी नृत्य केले. त्यानंतर त्यांनी डोक्यावर पांडवाचे मुखवटे घेऊन नाचवले.

बोहडा हे ग्रामीण भागातील एक कला नृत्य असून अक्षयतृतीयेच्या पासून नाशिकच्या ग्रामीण भागात गावांमध्ये केले जाते. ग्रामीण भागातील हि परंपरा सांस्कृतिक प्रकार असून त्यास शुभ मानले जाते.बोहाड्याची परंपरा लोप पावत जात असताना आता तरुण पिढीला याबाबतीत माहिती होऊन ती परंपरा अखंडितपणे सुरू राहावे यासाठी तरुण पिढीला देखील हि वेशभूषा चढवून हे नृत्य आणि बोहडा सादर केला जातो.