AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सर्वात मोठी बातमी ! आमदार बच्चू कडू यांना 2 वर्षाची शिक्षा, तुरुंगात जाणार?; काय आहे प्रकरण?

2017मध्ये बच्चू कडू यांनी दिव्यांगांच्या मागण्यांसाठी आंदोलन केले होते. महापालिकेत हे आंदोलन केलं होतं. या आंदोलनावेळी बच्चू कडू यांनी तत्कालीन महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्यावर हात उगारला होता.

सर्वात मोठी बातमी ! आमदार बच्चू कडू यांना 2 वर्षाची शिक्षा, तुरुंगात जाणार?; काय आहे प्रकरण?
bacchu kaduImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 08, 2023 | 3:09 PM
Share

चैतन्य मनिषा अशोक, टीव्ही 9 मराठी प्रतिनिधी, नाशिक : प्रहार संघटनेचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री बच्चू कडू यांच्या अडचणी वाढल्या आहेत. बच्चू कडू यांना दोन वर्षाचा कारावास ठोठावण्यात आला आहे. नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. त्यामुळे बच्चू कडू हे तुरुंगात जाणार की उच्च न्यायालयात दाद मागणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मात्र, कोर्टाच्या निकालामुळे बच्चू कडू यांची डोकेदुखी वाढली असून बच्चू कडू समर्थकांमध्येही घबराट पसरली आहे. 2017च्या एका प्रकरणात बच्चू कडू यांना ही शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

2017मध्ये बच्चू कडू यांनी दिव्यांगांच्या मागण्यांसाठी आंदोलन केले होते. महापालिकेत हे आंदोलन केलं होतं. या आंदोलनावेळी बच्चू कडू यांनी तत्कालीन महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्यावर हात उगारला होता. त्यामुळे बच्चू कडू यांच्याविरोधात सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सरकारी कामात अडथळा आणल्याचा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला होता. त्यानंतर हे प्रकरण कोर्टात गेलं. नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर बच्चू कडू यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी एक, तर सरकारी अधिकाऱ्याला अपमानित केल्याप्रकरणी एक अशी 2 वर्षांची शिक्षा बच्चू कडू यांना ठोठावण्यात आली आहे.

पर्याय काय?

कोर्टाने ही शिक्षा सुनावल्यानंतर आता बच्चू कडू यांच्याकडे अजूनही पर्याय शिल्लक आहेत. एक तर त्यांना तुरुंगवास भोगावा लागणार आहे. किंवा नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने ठोठावलेल्या शिक्षेविरोधात उच्च न्यायालयात दाद मागावी लागणार आहे. आज किंवा उद्याच बच्चू कडू यांच्या वकिलामार्फत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे बच्चू कडू काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

काय घडलं होतं?

बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली 24 जुलै 2017 रोजी नाशिक महापालिकेत आंदोलन करण्यात आलं होतं. या आंदोलनावेळी बच्चू कडू यांनी तत्कालिन पालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांची भेट घेतली होती. यावेळी कृष्णा आणि कडू यांच्यात शाब्दिक चकमक उडाली होती. त्यावेळी बच्चू कडू यांचा संयम सुटला आणि ते आयुक्तांच्या अंगावर धावून गेले होते. त्यांनी पालिका आयुक्तांना शिवीगाळही केली होती. त्यामुळे सुरक्षा रक्षकांनी धावत येत आयुक्तांना संरक्षण देत बाजूला काढले होते.

काय होत्या मागण्या?

बच्चू कडू यांनी दिव्यांगांच्या मागण्यांसाठी आंदोलन छेडले होते. दिव्यांगांसाठीचा तीन टक्के राखवी निधी खर्च केला जात नसल्याची बच्चू कडू यांची तक्रार होती. तसेच 1995चा अपंग पुनर्वसन कायदा सरकारने अंमलात आणला नसल्याचा आरोपही त्यांनी केला होता.

गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा
गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा.
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की...
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की....
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा.
भाजपकडून धंगेकरांची कोंडी? मुलगा अपक्ष निवडणूक लढणार; सुत्रांची माहिती
भाजपकडून धंगेकरांची कोंडी? मुलगा अपक्ष निवडणूक लढणार; सुत्रांची माहिती.
त्यांचा आणि आमचा काडीचाही संबंध नाही! अशोक चव्हाणांचं मोठं वक्तव्य
त्यांचा आणि आमचा काडीचाही संबंध नाही! अशोक चव्हाणांचं मोठं वक्तव्य.
ठाकरे बंधूंकडून पवारांच्या राष्ट्रवादीला फक्त 16 जागांचा प्रस्ताव?
ठाकरे बंधूंकडून पवारांच्या राष्ट्रवादीला फक्त 16 जागांचा प्रस्ताव?.
प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! आज लोकलचं वेळापत्रक बघूनचं घराबाहेर पडा
प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! आज लोकलचं वेळापत्रक बघूनचं घराबाहेर पडा.
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.