AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धुळ्यात अमरिशभाई पटेल यांचं निर्विवाद वर्चस्व; सहाच्या सहा जागांवर दणदणीत विजय

भाजप नेते अमरिशभाई पटेल यांचंच धुळ्यात वर्चस्व असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे. शिरपूर पंचायतीच्या सहा गणांच्या सर्वच्या सर्व जागांवर भाजपने विजय मिळवला आहे. (bjp won 6 seats in shirpur panchayat samiti election)

धुळ्यात अमरिशभाई पटेल यांचं निर्विवाद वर्चस्व; सहाच्या सहा जागांवर दणदणीत विजय
Amrish Patel
| Edited By: | Updated on: Oct 06, 2021 | 11:29 AM
Share

धुळे: भाजप नेते अमरिशभाई पटेल यांचंच धुळ्यात वर्चस्व असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे. शिरपूर पंचायतीच्या सहा गणांच्या सर्वच्या सर्व जागांवर भाजपने विजय मिळवला आहे. त्यामुळे शिरपूरमध्ये अमरिशभाई पटेल यांचे वर्चस्व अधोरेखित झालं आहे.

धुळ्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान झाले होते. या निवडणुकीत धुळ्यात एकूण 65 टक्के मतदान झाले. त्यात शिरपूर तालुक्यात 57.12 टक्के मतदान झाले होते. धुळ्यात प्रचंड मतदान झाले असले तरी शिरपूर येथील निकालांवर संपूर्ण राज्याचं लक्ष वेधलं गेलं होतं. पंचायत समितीच्या सहा गणांवर भाजप वर्चस्व कायम राखणार की महाविकास आघाडीच्या प्रयोगासमोर भाजप निष्प्रभ ठरणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. मात्र, अमरिशभाई पटेल यांच्या अचूक नियोजनामुळे भाजपने सहापैकी सहा जागा जिंकल्या आहेत. महाविकास आघाडीसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

धुळ्यात भाजपला बहुमत

जिल्हा परिषदेच्या 15 आणि पंचायत समितीच्या 30 जागांसाठी मतदान प्रक्रिया जाहीर झाली. त्यापैकी एका गटात शिवसेनेचा उमेदवार आणि दोन पंचायत समिती गणात बिनविरोध निवडणूक पार पडली. त्यामुळे प्रत्यक्ष 14 जिल्हा परिषद गट आणि 28 पंचायत समिती गणात मतदान झालं आहे. धुळे जिल्हा परिषदेवर भाजपची सत्ता होती. जिल्हा परिषदेच्या एकूण 56 जागांपैकी भाजपकडे 27 झागा आहेत. तर शिवसेनेकडे 2, राष्ट्रवादी काँग्रेसकडे 3 आणि काँग्रेसकडे 6 जागा आहेत. या अटीतटीच्या निवडणुकीत भाजपने सत्ता राखली आहे.

काँग्रेस कडवं आव्हान देणार?

भाजपला जिल्हा परिषदेवर सत्ता मिळवण्यासाठी अवघ्या दोन जागांची आवश्यकता आहे. असं असतानाही त्या जागाही महाविकास आघाडी भाजपला मिळू देणार नाही, असा दावा काँग्रेस प्रदेश कार्यकारिणीचे कार्याध्यक्ष आणि धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांनी केलाय. इतकंच नाही तर ज्या अपक्षांनी भाजपला सत्ता स्थापन करण्यासाठी पाठिंबा दिला होता ते देखील यावेळी भाजपचा पाठिंबा काढून घेतील, असंही कुणाल पाटील यांनी म्हटलंय.

अमरिश पटेल यांची कारकीर्द

अमरिश पटेल हे उत्तर महाराष्ट्रातील काँग्रेसचे महत्वपूर्ण नेते होते. त्यांनी मंत्रिपदही भूषवले होते. धुळे नंदुरबार जिल्ह्यातील काँग्रेसच्या निर्णय प्रक्रियेत त्यांना महत्त्वपूर्ण स्थान होते. 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी त्यांनी काँग्रेसचा राजीनामा देत भाजपात प्रवेश केला.

>> 1985 -शिरपूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष >> 1990 -शिरपूर विधानसभा मतदारसंघातून आमदार >> 1995 – शिरपूर विधानसभा मतदारसंघातून आमदार >> 2000 – शिरपूर विधानसभा मतदारसंघातून आमदार >> 2005 – शिरपूर विधानसभा मतदारसंघातून आमदार >> 2009 -धुळे नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधानपरिषदेवर >> 2015 – धुळे नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधानपरिषदेवर सदस्य >> 2019 मध्ये काँग्रेस सोडली, आता 2020 मध्ये भाजपच्या तिकीटावरही विजयी

संबंधित बातम्या:

शिवसेना दसरा मेळावा ऑनलाईन होणार नाही, उद्धव ठाकरेंचं ‘नियोजन’ संजय राऊतांनी सांगितलं!

Maharashtra ZP and Panchayat Samiti Election Results 2021 LIVE: जिल्हा परिषद-पंचायत समितीचा निकाल, गुलाल कुणाचा?, राज्याचं लक्ष!

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पोलीस शिपाई पदाच्या 720 जागांसाठी भरती, लेखी परीक्षा 23 ऑक्टोबरला

bjp won 6 seats in shirpur panchayat samiti election

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.