AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | मोदी- शाह यांनी लक्ष घालून कारवाईचा अतिरेक थांबवावा; भुजबळांचे थेट दिल्लीश्वरांना साकडे

छगन भुजबळ म्हणाले की, आम्ही सगळे एकत्रच आहोत. कुणावर कारवाई झाली तरी आम्ही एकत्र आहोत. यूपीएच्या बाहेर अनेक घटकपक्ष आहेत. बिगर भाजप राज्यातील नेत्यांनी एकत्र यायला हवे. यूपीएचे नेते खूप आहेत. त्यांनी पवारासाहेबांचा उपयोग कसा करायचा ठरवले पाहिजे.

Video | मोदी- शाह यांनी लक्ष घालून कारवाईचा अतिरेक थांबवावा; भुजबळांचे थेट दिल्लीश्वरांना साकडे
पालकमंत्री छगन भुजबळ यांनी नाशिकमध्ये माध्यमांशी संवाद साधला.
| Edited By: | Updated on: Mar 31, 2022 | 4:12 PM
Share

नाशिकः भाजपच्या नेत्यांना नोटीस पाठवली की, राज्य सरकारकडून अत्याचार होतोय म्हणून कांगावा केला जातो. मात्र, आम्ही काही कुठे बोलले की थेट कारवाई होते. आता या प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी लक्ष घालावे. हा अतिरेक थांबवावा, असे आवाहन मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केले. ते नाशिकमध्ये बोलत होते. काँग्रेस आणि नाना पटोले यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे प्रसिद्ध वकील सतीश उके यांच्या घरी आज ईडीने धाड टाकली. उके यांचे सकाळपासून चौकशी सुरू होती. त्यानंतर आता ईडीने सतीश उके (Satish Uke) यांना ताब्यात घेतले आहे. सतीश उके हे नाना पटोले यांचे वकील आहेत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या सांगण्यानुसार ही सर्व कारवाई होत आहे, असा आरोप उके यांच्या कुटुंबीयांनी केलाय. विशेष म्हणजे लोहिया प्रकरण तसेच निमगडे हत्याकांडप्रकरणी उके हे वकील आहेत. या कारवाईवरून पुन्हा एकदा सरकार विरुद्ध विरोधक अशी खडाजंगी पाहायला मिळतेय. या साऱ्या प्रकरणाचा संदर्भ घेत भुजबळांनी हे आवाहन केले.

काय म्हणाले भुजबळ?

मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, भाजपच्या नेत्यांना नोटीस पाठवली की, राज्य सरकारकडून अत्याचार होतोय म्हणून कांगावा केला जातो. मात्र, आम्ही काही कुठे बोलले की थेट कारवाई होते. त्यांच्याच पक्षातले हर्षवर्धन पाटील सारखे लोक सांगतात की, मानसिक त्रास आणि शारीरिक त्रास दिला जातोय. आता मतदानाच्या पेटीतून जनता त्यांचे मत मांडेल. भाजपच्या समजदार नेत्यांनी याचा विचार करावा, असा इशाराही भुजबळांनी दिला.

लोणीकरांच्या धमक्या सुरू…

भुजबळ म्हणाले की, भाजपचे नेते बबन लोणीकर महावितरण अधिकाऱ्यांना धमक्या देत आहेत. खरे तर विरोधी पक्षातील लोकांना नोटीस दिली, तरी हा अन्याय आहे. आता या प्रकरणात स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी लक्ष घालावे, हा अतिरेक थांबवावा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

आम्ही सगळे एकत्रच…

छगन भुजबळ म्हणाले की, आम्ही सगळे एकत्रच आहोत. कुणावर कारवाई झाली तरी आम्ही एकत्र आहोत. यूपीएच्या बाहेर अनेक घटकपक्ष आहेत. बिगर भाजप राज्यातील नेत्यांनी एकत्र यायला हवे. यूपीएचे नेते खूप आहेत. त्यांनी पवारासाहेबांचा उपयोग कसा करायचा ठरवले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

इतर बातम्याः

शिवसेना नेते यशवंत जाधवांनी ‘मातोश्री’ला दिलेल्या 2 कोटी रुपयांची यादीच मिळाली; जाधव म्हणतात, ही तर माझी आई…!

पर्यावरण मंत्र्यांना अंधारात ठेवून वादग्रस्त उड्डाणपुलाला घाईघाईत मान्यता; नाशिकमध्ये पुन्हा आंदोलन धुमसणार!

Special Report | देशातल्या सर्वात मोठ्या लेखकाची ख्यातनाम प्रकाशकांकडून लूट; कोण फोडणार पुस्तकांचा तुरुंग?

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.