AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुम्ही कुणाचीही तोंडं फोटोला चिपकवली तरी मला फरक पडत नाही, लढा चालूच ठेवणार, चित्रा वाघ पुन्हा कडाडल्या

"तुम्ही मला कितीही त्रास दिला, माझे आणखी काही फोटो मॉर्फ करुन व्हायरल केले, कुणाचीही तोंडं फोटोला चिपकवली तरी मला काहीच फरक पडत नाही", अशा शब्दात भाजप नेत्या चित्रा वाघ कडाडल्या Chitra Wagh reaction on Morph Photo

तुम्ही कुणाचीही तोंडं फोटोला चिपकवली तरी मला फरक पडत नाही, लढा चालूच ठेवणार, चित्रा वाघ पुन्हा कडाडल्या
Chitra Wagh Morph Photo
| Updated on: Feb 26, 2021 | 9:28 PM
Share

नाशिक : “तुम्ही मला कितीही त्रास दिला, माझे आणखी काही फोटो मॉर्फ करुन व्हायरल केले, कुणाचीही तोंडं फोटोला चिपकवली तरी मला काहीच फरक पडत नाही. मी माझा लढा चालूच ठेवणार आहे. हे मला ‘टीव्ही 9 मराठी’च्या माध्यमातून सांगायचं आहे”, अशा शब्दात भाजप नेत्या चित्रा वाघ कडाडल्या. चित्रा वाघ यांचे मॉर्फ केलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोत चित्रा वाघ आणि वनमंत्री संजय राठोड एकत्र दिसत आहेत. या फोटोंवरुन चित्रा वाघ यांनी ‘टीव्ही 9 मराठी’सोबत बोलताना आपली भूमिका मांडली (Chitra Wagh reaction on Morph Photo).

फोटो मॉर्फ करणाऱ्यांना सडेतोड उत्तर

“माझे खासगी फोटो काढून मॉर्फ करुन तुम्ही काय साध्य करणार आहात? किंवा तुम्हाला काय साध्य करायचंय? मिनिटामिनिटाला फोन करुन मला त्रास दिला जातोय. मला काम करता येत नाहीय. या संदर्भात सर्व सीजींपासून डीजीपर्यंत सर्वांना फोटो पाठवले आहेत. इतका त्रास देण्याचं काय कारण आहे?”, असा सवाल चित्रा वाघ यांनी केला. त्याचबरोबर “तुम्ही माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न करताय. पण जोपर्यंत पूजाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही बोलतच राहणार”, अशा शब्दात चित्रा वाघ यांनी त्याचा फोटो मॉर्फ करणाऱ्यांना उत्तर दिलं (Chitra Wagh reaction on Morph Photo).

‘तक्रारीसाठी पोलिसांशी बोलणं झालं’

“मॉर्फ फोटोंची तक्रार करण्यासाठी मुंबई पोलिसांसोबत माझं बोलणं झालं आहे. त्यांनी मला एफआयआर करण्याचा सल्ला दिलाय. पण मी सध्या प्रवासात आहे. जोपर्यंत मी पोलीस ठाण्यात तक्रार करत नाही तोपर्यंत मला त्रास सहन करावा लागणार आहे’, असं चित्रा वाघ यांनी सांगितलं.

‘पूजा चव्हाण प्रकरणातील खरी गोष्ट लोकांसमोर आणायला हवी’

“महाराष्ट्रात अन्यायाविरोधात आवाज उठवायचा की नाही? आज खरंतर जे काम पोलिसांनी करुन पूजा चव्हाण प्रकरणातील खरी गोष्ट लोकांसमोर आणायला हवी ते काम पूर्ण करण्यात येताना दिसत नाही. या प्रकरणात पोलीस आणि सरकार यांची भूमिका पूर्णपणे संदिग्ण आहे. त्यामुळे आम्हाला ज्या गोष्टी मिळत आहेत त्या गोष्टी दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय”, असं चित्रा वाघ म्हणाल्या.

‘यात पूजाची बदनामी काय?’

“पूजासाठी न्याय मागणं यामध्ये तिची बदनामी आलीच कुठे? तिचा लॅपटोप, फोटो आमच्याकडे नाहीत. तिचा मोबाईल, लॅपटॉप पुण्याच्या पोलिसांकडे आहेत. आम्ही कुठे करतोय बदनामी? ज्या ऑडिओ क्लिप पुढे आल्या आहेत त्याबाबत बोलायचं नाही का? त्यामध्ये महाराष्ट्राच्या एका मंत्र्याचं नाव आहे. यामध्ये कुठली बदनामी?”, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

“मी वारंवार सांगतेय, यामध्ये बदनामीचा प्रश्नच येत नाही. तुमच्या मुलीचा आज मृत्यू झालाय. त्यानंतर ज्या गोष्टी समोर आल्या आहेत त्याचा जाब आम्ही विचारणार नाही का? त्याचा संदर्भ थेट तुमच्या मुलीशी आहे. म्हणून तुमच्या मुलीचं नाव सारखं येतंय. म्हणून आम्ही विचारतोय. हे पोलिसांचं काम आहे. त्यांनी पुढे येऊन या सगळ्या गोष्टींची स्पष्टता केली असती तर आम्हाला काय गरज होती विचारायची”, असं चित्रा वाघ म्हणाल्या.

‘आणखी आक्रमक होणार’

“मला काहीच फरक पडत नाही. जितक्या पद्धतीने मला त्रास द्याल तितकं आम्ही आणखी आक्रमक होऊन काम करु. कारण आमचं हे काम पोलिसांनी आणि सरकारने केलं असतं तर निश्चितच आम्हाला बोलायची गरज नसती. आम्ही जे जे प्रश्न उपस्थित केलेत त्याचं तरी उत्तर द्या. आहे का पोलीस आणि सरकारकडे याचं उत्तर? तुम्ही आम्हालाच अशा पद्धतीने टार्गेट करण्याचा प्रयत्न केलाय”, अशा खणखणीत शब्दात चित्रा वाघ यांनी आपली भूमिका मांडली.

हेही वाचा : चित्रा वाघ यांचा संजय राठोडांसोबत मॉर्फ फोटो, आक्षेपार्ह फोटोवरुन मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडे तक्रार

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.