Nashik| ध्वजदिन निधी संकलनाचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शुभारंभ; माजी सैनिकांच्या पाल्यांचा गौरव

नाशिक जिल्ह्यातील सैनिकांचे प्रलंबित प्रकरणांबाबत आवश्यक ती कार्यवाही करून ती प्रकरणे वेळेत निकाली काढण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत, असे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाच्या कार्यक्रमात सांगितले.

Nashik| ध्वजदिन निधी संकलनाचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शुभारंभ; माजी सैनिकांच्या पाल्यांचा गौरव
नाशिकमध्ये सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाच्या कार्यक्रमात जिल्हाधिकाऱ्यांनी माजी सैनिकांच्या पाल्यांचा गौरव केला.
Follow us
| Updated on: Dec 07, 2021 | 4:55 PM

नाशिकः देशसेवेसाठी योगदान देणारे माजी सैनिक, वीरमाता, वीरपत्नी व त्यांच्या कुटुंबीयांचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्यासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध आहे. जिल्ह्यातील सैनिकांचे प्रलंबित प्रकरणांबाबत आवश्यक ती कार्यवाही करून ती प्रकरणे वेळेत निकाली काढण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत, असे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाच्या कार्यक्रमात सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाच्या आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी मांढरे बोलत होते. या कार्यक्रमास पोलीस अधीक्षक सचिन पाटील, पोलीस उपायुक्त अमोल तांबे, महानगर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश खाडे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी निवृत्त लेफ्टनंट कमांडर ओंकार कापले, कल्याण संघटक मार्तंड दाभाडे यांच्यासह इतर विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

शहिदांच्या वारसांना 5 एकर जमीन

जिल्हाधिकारी मांढरे म्हणाले की, युद्धात शौर्य पदक प्राप्त शहीद जवानांच्या वारसांना शासनाच्या धोरणानुसार प्रति कुटुंब 5 एकर जमीन देण्यात येते. त्यानुसार जिल्ह्यातील एकूण 10 अर्जांपैकी तीन शहीद जवानांच्या वारसांना जमीन वाटपाचा मालकी कब्जा देण्यात आला आहे. तसेच उर्वरित कुटुंबियाना जमीन देण्यासाठीची प्रक्रीया सुरू असून, ती लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी महसूल यंत्रणेमार्फत प्रयत्न करण्यात येत आहेत. याचप्रमाणे जिल्ह्यातील सैनिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी महिन्यातून एकदा आढावा बैठक घेवून प्रलंबित प्रकरणांचा जलद गतीने निपटरा करण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय आणि आजी माजी सैनिकांनी एकत्रित येवून समन्वयाने गट स्थापन करावा, अशा सूचनाही मांढरे यांनी यावेळी दिल्या.

स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती

देशप्रेमाच्या भावनेतून नाशिक जिल्ह्याने नेहमीच ध्वजदिन निधी संकलनात भरीव योगदान दिले असल्याची बाब गौरवास्पद आहे. शासकीय सेवेतील वाटचालीमध्ये सैनिकांचे कार्य हे नेहमीच प्रेरणा देण्याचे काम करते. जिल्हा सैनिक कार्यालय व निवृत्त सैनिक यांनी सांघिक भावनेतून जिल्ह्यातील निवृत्त सैनिक, शहीद कुटुंबियांच्या घरातील महिलांसाठी बचत गट व स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन यावेळी जिल्हाधिकारी मांढरे यांनी संबंधितांना केले. जिल्ह्याला शासनाकडून ध्वजदिन निधी संकलनासाठी गेल्यावर्षी 1 कोटी 29 लाख 48 हजार रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. जगावर कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असतांना देखील जिल्ह्यातील सर्वच घटकांनी या निधीसाठी संकलन करून दिलेल्या उद्दिष्टापैकी 85 टक्के इतका निधी संकलित केला आहे. दिलेल्या उद्दिष्टापैकी उर्वरीत 15 टक्के उद्दिष्ट आपण लवकरच पूर्ण करू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

कुटुंबामुळे सैनिकांना कामाची उभारी

जिल्हा पोलिस अधीक्षक सचिन पाटील म्हणाले, कुटुंबियांच्या पाठबळामुळे देशसेवेत असणाऱ्या सैनिकांना कामाची उभारी मिळते. त्यामुळे सैनिकांच्या देशसेवेच्या कार्यात त्यांच्या कुटुंबियांची भूमिका अतिशय महत्वाची आहे. ध्वजदिन निधी संकलनात शंभर टक्के उद्दिष्ट साध्य केलेल्या शासकीय विभागांचे अभिनंदन देखील यावेळी पोलिस अधीक्षक पाटील यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात शहिदांना श्रद्धांजली वाहून करण्यात आली. यानंतर जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी निवृत्त लेफ्टनंट कमांडर ओंकार कपाले यांनी प्रास्ताविकात ध्वजदिन निधीचे महत्व सांगून संकलित झालेल्या निधीचा विनियोग व माजी सैनिकांसाठी विविध कल्याणकारी योजना कशा राबविण्यात येतात याची माहिती दिली. या निधी संकलनात जिल्ह्यातील अनेक शासकीय कार्यालयांनी तसेच स्थानिक नागरिकांनी ध्वजदिन निधी संकलनात भरीव योगदान देवून, सहकार्य केले. त्यांचाही प्रातिनिधिक स्वरूपात जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

माजी सैनिकांच्या पाल्यांचा गौरव…

‘आयआयटी’ प्रवेशासाठी विशेष गौरव पुरस्कार 1. निशांत ज्ञानदेव खटाणे, रुपये 25 हजार धनादेश 2. प्रवीण शंकपाळ नारायण, रुपये 25 हजार धनादेश

इयत्ता 10 वी शालांत परिक्षेत यशासाठी विशेष गौरव पुरस्कार 1. स्नेहा किरण बोरसे (99.80 टक्के गुण),रुपये 10 हजार धनादेश 2. स्नेहल प्रवीण सौंदाणे (98.60 टक्के गुण), रुपये 10 हजार धनादेश 3. सुहानी गोपाळ अहिरे (97.20 टक्के गुण), रुपये 10 हजार धनादेश 4. सूरज मंगेश पवार (96.20 टक्के गुण), रुपये 10 हजार धनादेश 5. अनुष्का भूषण शेवाळे (94.60 टक्के गुण), रुपये 10 हजार धनादेश

इयत्ता 12 वी शालांत परीक्षेत यशासाठी विशेष गौरव पुरस्कार 1. खुशाल दादाभाऊ सोनवणे (96.75टक्के गुण), रुपये 10 हजार धनादेश 2. वैष्णवी राजाराम दळवी ( 96 टक्के गुण), रुपये 10 हजार धनादेश 3. .ऋषिकेश नरेश रेवंदिकर ( 90.67 टक्के गुण), रुपये 10 हजार धनादेश

इतर बातम्याः

OBC Reservation: केंद्राने राज्याला ओबीसीचा इम्पिरिकल डेटा द्यावा; सुप्रिया सुळेंची लोकसभेत मागणी

Photos | मॉडलिंगच्या क्षेत्रात सारा तेंडुलकरचा डेब्यू, पाहा सचिनच्या मुलीचा नवीन अवतार

Non Stop LIVE Update
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.